प्रभाकर फडणीस
पांडवांचा अज्ञातवास
Featured

महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.

पांडव विवाह

जरासंध आणि शिशुपाल वध

महाभारतातील शकुंतला

महाभारतातील देवयानी
Featured

आतां महाभारतांतील दुसरे उपकथानक पाहूया. हे कथानक कच, देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांचे आहे. या कथानकाने खाडिलकरांचे विद्याहरण व शिरवाडकरांचे ययाति-देवयानी हीं दोन नाटके व वि. स, खांडेकरांची गाजलेली ययाति कादंबरी या तीन प्रमुख व सुपरिचित साहित्य कृतीना जन्म दिला आहे. या लेखकानी महाभारतातील मूळ कथेमध्ये मोठे फेरफार केलेले दिसून येत नाहीत. या साहित्यकृतींमुळे ही कथा सुपरिचित आहे. त्यामुळे मूळ कथेची तपशीलवार उजळणी न करतां मला जाणवलेल्या काही खास गोष्टींचाच उल्लेख करणार आहे.

कृष्णशिष्टाई
Featured

महाभारताच्या मुख्य कथेशी बहुसंख्य भारतीय परिचित असतात. पांडव व कौरवांमध्ये द्यूत व अनुद्यूत होऊन पांडव दोन्हीत हरले व आपले राज्य कौरवांच्या हवाली करून त्याना बारा वर्षे वनवास अ एक वर्ष अज्ञातवास सोसावा लागला. त्यानंतर कौरवानी त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारले त्यामुळे अखेर दोन्हीमध्ये भीषण युद्ध झाले व कुळाचा संहार झाला. हे युद्ध टाळण्यासाठी पांडव अज्ञातवासातून प्रगट झाल्यापासून पुढील काही महिने समेटाचे अनेक प्रयत्न झाले. कृष्णाने कौरव दरबारात पांडवांचे बाजूने शिष्टाई केली ती त्यातील अखेरची घटना. त्या प्रयत्नांची ही कथा आहे.

जयद्रथवध
Featured

जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.

महाभारतातील कर्णकथा
Featured

महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे.यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे.

महाभारतातील स्फुट प्रकरणे
Featured

या लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.

नलदमयंती
Featured

महाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे आपल्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहेच

भीष्म
Featured

महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

अभिमन्युवध
Featured

अभिमन्यूचा वध ही भारतीय युद्धातील एक फार महत्त्वाची घटना आहे. कारण आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चिडून जाऊन अर्जुनाने जयद्रथाचा दुसऱ्या दिवशींच वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि दिवसभर जयद्रथाचे अर्जुनापासून संरक्षण करण्याचा कौरवांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते जयद्रथाला वाचवू शकले नाहीत. अर्जुनापुढे आपले कोणाचेच काही चालत नाही हे त्याना कळून चुकले. जयद्रथाच्या वधाबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे आतां त्याची पार्श्वभूमी असलेल्या अभिमन्यू वधाबद्दल लिहिणार आहे.

महाभारताबद्दल काही गैरसमजुती
Featured

महाभारताबद्दल काही गैरसमजुती काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो.

कृष्ण – कर्ण संवाद
Featured

कृष्णाने कर्णाला आपल्याबरोबर आपल्या रथावर घेऊन वाटेत त्याला ‘तूं कुंतीपुत्र आहेस म्हणून दुर्योधनाची बाजू सोडून दे व पांडवपक्षात ये’ असे आवाहन केले.मात्र ते कर्णाने नाकारले.या कृष्ण-कर्ण भेटीनंतर आठ दिवसानी कार्तिक अमावास्या होती व त्या दिवशी युद्ध सुरू झाले असे मानले जाते.

रामायण - बालकांड
Featured

बालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे ७७ सर्ग आहेत. त्यांत राम व त्याचे तीन बंधु यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे.आपणांस हे लेखन महाभारताप्रमानेच रुचेल अशी आशा आहे.

रामायण अयोध्याकांड
Featured

बालकांडाचे अखेरीस, राम, त्याचे बंधू, त्यांच्या नवीन वधू व सर्व कुटूंब अयोध्येला परत आले व लगेचच भरत व शत्रुघ्न केकय देशाला गेले असे म्हटले आहे. अयोध्याकाडाचा कथाभाग येथून पुढे सुरू होतो.

रामायण अरण्यकांड
Featured

अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे.

रामायण किष्किंधाकांड
Featured

किष्किंधाकांड या कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्‍यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्‍या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत.

थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम
Featured

रॉबर्ट कानिगेल नावाच्या लेखकाने १९९१ साली लिहिलेल्या रामानुजमच्या चरित्रावर हा लेख आधारलेला आहे. . रामानुजमच्या मृत्यूनंतर ७० वर्षानी एका अमेरिकन अभ्यासकाला त्याचे विस्तृत चरित्र लिहावेसे वाटले यातच त्याची थोरवी उघड होते

मसाडाचा वेढा
Featured

आपणा मराठी माणसाना किल्ला ह्या विषयाचे एक आकर्षण असते. आपल्या इतिहासात किल्ले, त्यांचे वेढे, तेथील लढे आणि त्यात गाजवलेल्या शौर्याच्या कथा आपल्याला भुरळ घालतात. महाराष्ट्रात इतर भारतापेक्षा जास्त प्रमाणावर किल्ले आहेत. मसाडा म्हणजेच ज्यूंच्या हिब्रू भाषेत किल्ला.

भाऊचा धक्का

मुंबईकराना भाऊचा धक्का हा शब्दप्रयोग सुपरिचित आहे. कोकणात जाणाराना तर तो जास्तच जिव्हाळ्याचा!

भारत आणि अणुशक्ति
Featured

भारताने गेल्या वर्षी अमेरिका व इतर काही राष्ट्रांबरोबर अणुशक्ति विषयाबाबत काही करार केले त्यानिमित्ताने बरींच राजकीय वादळे निर्माण झाली. काही शास्त्रीय स्वरूपाची माहिती समोर आली पण फारच थोड्या जणाना या बद्दल पुरेशी माहिती असते त्यामुळे वादविवाद राजकीय स्वरूपाचेच राहिले. या संदर्भात काही स्वत: अनुभवलेली व बहुतेक वाचनातून जमवलेली माहिती आपणासमोर मांडण्याचा विचार आहे. विषय जमेल तेवढा सुलभ करण्याचा प्रयत्न राहील.

महाभारताचा कालनिर्णय- भाग १
Featured

महाभारताचा कालनिर्णय हा एक विद्वानांचा दीर्घकाळ चाललेला विषय आहे. त्यातहि, घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काळ असे दोन प्रकार आहेत. अनेक शास्त्रांच्या सहायाने या विषयांचा अनेक शतके विचार झालेला आहे. गूगल मध्ये थोडा शोध घेतला तर अनेक शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणार्या जगभरातील अनेकानी १९२४ BCE ते ३१३७ BCE असे निरनिराळे निष्कर्ष काढलेले दिसतात.

द्रोण आणि पांडव

द्रोणाचार्य आणि पांडव यांचेमधील परस्पर संबंध गुंतागुंतीचे व बदलत गेलेले दिसून येतात. त्यांचा थोडा आढावा घेणार आहे.

महाभारतातील ‘कपट-द्यूत’

युधिष्ठिर आणि (दुर्योधनातर्फे) शकुनि यानी कौरव-दरबारात खेळलेले द्यूत व अनुद्यूत हा एक फार महत्वाचा प्रसंग आहे. शकुनीने प्रत्यक्षात काय कपट केले याचा खुलासा महाभारतात कोठेहि वाचावयास मिळत नाही! हे एक कोडेच आहे.

कथा शब्दकोषाची

शब्दकोष निर्मितीची रोचक कथा

महाभारताचा कालनिर्णय- भाग २

महाभारताचा कालनिर्णय हा एक विद्वानांचा दीर्घकाळ चाललेला विषय आहे. त्यातहि, घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काळ असे दोन प्रकार आहेत. अनेक शास्त्रांच्या सहायाने या विषयांचा अनेक शतके विचार झालेला आहे. गूगल मध्ये थोडा शोध घेतला तर अनेक शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणार्या जगभरातील अनेकानी १९२४ BCE ते ३१३७ BCE असे निरनिराळे निष्कर्ष काढलेले दिसतात.

कोयना प्रकल्पातील एक अनोखा उपक्रम

कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक बराच जुना जलविद्युत प्रकल्प आहे. ्त्या प्रकल्पाअन्तर्गत एक अगदी अनोखा असा नवीन रचनात्मक उपक्रम काही वर्षांपूर्वी यशस्वीपणे राबवण्यात आला. त्याबद्दल या लेखात माहिती देण्याचा विचार आहे

ख्रिश्चन नावाचा सिंह

मी हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचे ’ख्रिश्चन नावाचा सिंह’ हे शीर्षक आहे. ऍन्थनी (एस) बोर्क आणि जॉन रेंडॉल हे दोन तरुण मित्र व ख्रिश्चन नांवाचा त्यांचा सिंह यांच्यातील अजब प्रेमबंध व मैत्री यांची ही सत्यकथा आहे..

विविध कालगणना

विविध धर्मी लोकांच्या वर्षगणनेची देत असलेली माहिती कोणा एकाच पुस्तकावरून दिलेली नाही. निरनिराळ्या वेब-साइट्स वरून ती जमा केलेली आहे. त्यामुळे लेखकाचे नाव देता येत नाही. क्षमस्व!

महंमद पैगंबर

प्रेषित महंमद पैगंबर लेखक : बार्नबी रॉजरसन प्रकाशन वर्ष – २००३

एरी कॅनॉल

अमेरिकेत असताना एरी कॅनाल बद्दल एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचा विषय अगदीच अपरिचित पण कुतूहल चाळवणारा होता. नंतर कॉम्प्यूटर वर शोध घेतला तेव्हा दिसले कीं या विषयावर शेकडो पुस्तके लिहिलीं गेलीं आहेत! तेव्हाच माझ्या मनात आले कीं हा विषय वाचकांस आवडू शकेल. त्या हेतूने मग कांही टिपण्या तयार केल्या व माहिती जमा केली. त्या आधारावर हा लेख लिहिला आहें.

पहिली लढाऊ पाणबुडी

या लेखात मी आपणास जगातील पहिल्या लढाऊ पाणबुडीच्या इतिहासाबाबत सांगणार आहे...

फडणीसांच्या लेखणीतून

या पुस्तकात आपण मी लिहिलेले अनेक लेख वाचू शकणार आहात....हे पुस्तक तुम्ही सेव्ह करून ठेवलेत तर तुमच्या मोबाईल app वर तुम्हाला मी नवीन लेख लिहिल्यास नोटिफिकेशन मिळेल.. प्रभाकर फडणीस