बीज तसे अंकूर भासलिस, गुण घेउनि उठले ।
सकळ रुपाचें तेज सखु तुझ्या वदनीं एकवटलें ॥धृ०॥
मीपण मिरवुनि सदा नुरे जें नटपणांत नटलें ।
तुझे नटपणापुढें तयाचें मन संशय फिटले ।
किंचित्‌ न फुटे भ्रम अशा या वृत्ती संधींत ठसले ।
उभे थव्याचे थवे पाहुनी तुज ह्रदयीं चाठकले ॥१॥
अमरपुरीचा सुमुदाय तुझा ग नारी भाव दिसला तसा ।
साधुनी पाहतां हावभाव जिकडे डाव पावे (?) असा ।
फोडुनी चित्तांतील भाव बसविला आव न कळे असा ।
नाहीं याचा भंरवसा रसा नेशिल ह्रदय बहाली ॥२॥
येवढी चांगट असुन राखिले त्या वजन आपल्या ।
तिळतुल्य तव स्वरूप पाहुन तुज आपल्या ।
आधीं विषयवासना जयाच्या सर्वांगी तिपल्या ।
त्या पश्चात्तापाच्या योगें विरहित तप तिपल्या ।
तसेच तव सदगुणे दुर्बुद्धी समूळ खपल्या ।
मनशांतीच्या बळे कल्पना तूं रंगीच्या वपल्या (?) ॥३॥
निर्मळ गंगेचें नीर तसें मन स्थीर दिसलें तुझें ।
मधें मळाजळ समिर वाटतें क्षीर प्रियकर रसे ।
तद्वत तव देहास धीर बहुत गंभीर स्नेहरसें ।
होनाजी बाळा म्हणे, अशी पाहुं वृत्ती घाली असे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel