गोविंद माधवजी इच्छा पूर्ण करा माझी ।
सीतापति रघुनाथ रावण वधून लंकापुरी ।
भक्त बिभीषण दान हें दिधले, दिधली कंचनपुरी ॥१॥
लवांकुशाच्या वेळे सीता गेली ऋषीच्या मठीं ।
चिरंजीव श्रीरामबाळे अरण्यांत एकटी ॥२॥
हरिश्चंद्र राजानें स्वप्नामधीं राज्य दीधलें ।
संपत संतत त्यागुन विश्वमित्रानें छळियलें ॥३॥
पुणें सिद्धनाथाचे सगनभाऊ कवीश्वर पुरा ।
दास रामजी ब्रीदअधिकारी गवळी कापे थरथरा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel