जीव लावुनिया प्रीतीनें मजकडे पाहा हो । जरिपातळ मजला घ्या हो ॥धृ०॥

नूतन तनु ही आली रुतासी । पूर्ण कृपाळ मजकडे न पहासी । जन्मोजन्मीं तुझी होइन दासी । धरियलें उरासी मला, अतां दुर हां हो ? ॥१॥

हसतमुखानें सख्या क्षणभर बोला । पदरांत पडले बघा रत्न अमोला । नेशिन शालु, देह करीन हवाला । मारिते गळ्यासी मिठी, मला भोगा हो ॥२॥

बसा पलंगावर मला घेउन शेजारीं । कुच अपहस्तें चुरा अहो घरबारी । कुस्तिंत कवळुन धरा बांधुन स्वारी । मग शरण तुम्हांला येइन राग सोडा हो ॥३॥

मज कमळणीच्या फुला दृष्ट होइल कीं । वर खाली पाहातां मला दिस जाइल कीं । बसंती शालु दिला केली न्याहाल कीं । रामाचे गुण ऐकुनी संतुष्ट मनीं व्हा हो ।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel