अक्षय मिलिंद दांडेकर
मी एक कलाकार आहे. मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. मी नाटकात ,टीव्ही सिरीयल मध्ये आणि सिनेमा यांच्यातून अभिनय करत असतो. माझ्याशी बोलायचे असल्यास तुम्ही मला instagram वर follow करू शकता. @akshay_milindd_dandekar
सापळा
Featured

अघोरी तांत्रिक लोकांचे जग नेहमीच अगम्य राहिले आहे. त्यामुळेच त्यांच्यातील एक जण तुम्हाला कधी गर्तेत ओढून नेईल हे देखील सांगणे कठीण आहे. प्रामाणिक व्यक्ती ओळखणे आज अवघड झाले आहे. विश्वास ठेवण्याआधी १०० वेळा विचार करा. तो एखादा सापळा असू शकतो. सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन या हेतूनेच या कथेचे वाचन करावे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कथेतील ठिकाणे, पात्र, यांची नावे यात काही साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि एक मनोरंजक कलाकृती म्हणून या कथेचा रसास्वाद घ्यावा. लहान मुलांनी किंवा मृदू आणि हळव्या मनाच्या व्यक्तींनी हि कथा वाचणे योग्य ठरणार नाही.

झोंबडी पूल
Featured

आमच्या गावाकडच्या रस्त्याची खासियत आहे. अंधारात चालायला लागलं कि पावलं जड होतात, तुमचा कोणीतरी पाठलाग करताय असं वाटतं. मधेच मानेजवळ कुणीतरी फुंकर घातलानी कि काय...? असं वाटायला लागतं. सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन या हेतूनेच या कथेचे वाचन करावे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कथेतील ठिकाणे, पात्र, यांची नावे यात काही साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि एक मनोरंजक कलाकृती म्हणून या कथेचा रसास्वाद घ्यावा. लहान मुलांनी किंवा मृदू आणि हळव्या मनाच्या व्यक्तींनी हि कथा वाचणे योग्य ठरणार नाही.

सोमण सरांचे भूत
Featured

हि कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. ठिकाणे आणि व्यक्तींची नावे अस्तित्वात असेलेल्या व्यक्ती आणि ठिकाणे यांच्या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग आहे. जर तुम्ही १९८० ते २००० दरम्यान कल्याणच्या प्रसिद्ध सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला कदाचित त्याचा अभिमान वाटणार नाही असे होणे शक्यच नाहीं. सुभेदार वाडा हायस्कूल ही कल्याणची नावाजलेली शाळा होती.कल्याणच्या सुभेदाराच्या शिवकालीन वाड्यात बालवाडी आणि प्राथमिक शाळा भरत असे तर वाड्याच्या मागच्या बाजूला हायस्कूलची भव्य वास्तू होती

अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
Featured

आपण खूप शूरवीर आहोत, भरपूर पराक्रम गाजवला आहे आणि म्हणूनच आपला बळी दिला जाणार आहे. हे समजून देखील धैर्य दाखवणाऱ्या चेतकची आणि त्याचा मित्र राजकुमार ऋषिकेश याची हि कथा आहे. त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम यांचे विविध कंगोरे निरनिराळ्या प्रसंगाच्या माध्यमातून मांडत असताना माझ्या डोळ्यात जसे पाणी आले तसे तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या कथेत बरेच ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ लेखनाचे स्वातंत्र्य घेऊन वापरण्यात आले आहेत परंतु हि कथा म्हणजे खरा ईतिहास आहे असे मानून चालू नये. हि कथा तुम्हाला कशी वाटते आणि तिच्यावर तुमचे अभिप्राय नक्की कळवा.

पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या
Featured

जेव्हा ते घराच्या दिशेने परत येत होते, तेव्हा त्यांनी पोफळीच्या झाडावरून खाली लटकलेला लांब केसांचा एक झुबका पहिला. झाडावरून लटकत असलेला जाडजुड लांब केसांचा झुबका पाहून त्यांना लगेच समजले की काही किरकोळ गोष्ट नाही.त्यांना आधी खूप भीती वाटली पण बुवा निःसंशयपणे खूप धैर्यवान व्यक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल. त्यांनी लगेच कोयता बाहेर काढला जो ते त्यांच्या कनवटीला अडकवून ठेवायचे. क्षणार्धात त्यांनी कोयत्याने लांब केसांच्या झुबक्याचे टोक कापले आणि तिथून पळ काढला. केस कोयत्याने कापताच त्यांना एक विचित्र आणि भयंकर किंचाळी ऐकू आली. त्यांच्या म्हणण्यानुसार ती किंचाळी इतकी जोरदार होती की तिच्यामुळे कानाचे पडदे फाटतील. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांना दरदरून घाम फुटला होतं. ते धापा टाकत टाकत घरात पळून आले आणि लगेच आत जाऊन दरवाजा बंद केला.

सुसाईड नोट
Featured

ती एक नेहमी सारखीच सामान्य रात्रच होती, पण तरीही का कुणास ठाऊक योगेशच्या मनात कुठल्यातरी अज्ञात भीतीने सारखी धाकधूक सुरु होती. अधून मधून त्याला कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे जाणवत होते. कोणाच्याही पावलांचा आवाज ऐकू येत नसला तरी एक काळे सावट आपल्या मागून येत आहे असे त्याला वाटत होते.

वेंडीगो
Featured

मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.

झुंजूमुंजू
Featured

धेनु चरती करती रानधावा कोकीळ वाजवी सुरेल पावा भल्या पहाटे झुंजूमुंजू झालं सुवर्णमय मग जग हे झालं

बेपत्ता पाय
Featured

त्याचे दोन्ही पाय कापलेले होते, तो साधारण सात आठ वर्षांचा होता, रंग गोरा दिसत होता पण चेहरा धुळीने माखलेला होता. लाल दिवा नव्वद सेकंदात हिरवा होणार होता. टिक टिक करून आकडे खाली लोटत होते… नव्वद…एकूणनव्वद.....ऐंशी. त्या मुलाला पाणी हवे होते. त्याने हातानेच खुणा करत विचारले. रिक्षावाल्याने त्याला त्याची बाटली दिली, त्याने आ करून घटाघट पाणी प्यायले आणि बाटली परत केली.

भूत्याचा वाडा
Featured

भूत्याचा वाडा म्हणजे एक रहस्यमयी वाडा! असे म्हणतात की एखादा माणूस एकदा तिथे गेला तर तो कधीच परत येत नाही. पण सोनियाला मात्र तिकडे जायचे आहे. त्या वाड्याचे अनाकलनीय गूढ उकलायचे आहे. कारण तिचे वडील डॉ.आशिष पेडणेकर संशोधनासाठी गेले होते, ते कधी परत आलेच नाहीत.

शेंद्री
Featured

सायन हॉस्पिटलचा तो रस्ता, अनेक बेवारस, भटक्या आणि उनाड पोरासोरांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. समजा त्या क्षणी रस्त्याच्या कडेला एखादा बेघर भिकारी भसाड्या आवाजात गाणं गात असता आणि हार्मोनियम वाजवत असता तरी एकवेळ मी ५-१० रुपयाचे नाणे त्याच्या समोर पसरलेल्या रुमालावर टाकले असते आणि त्याने त्याचे समाधान झाले असते. पण एक छोटासा मुलगा झोपायला जागा नाही म्हणून रडवेला झालेला पाहून माझे मन विषण्ण झाले कारण त्यावेळेस त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळलेच नाही.

वेलकम टू सायबेरियाड
Featured

मानवी मन ना विचित्र असतं! आपण आजवर काय अनुभवलं किंवा मिळवलं याचा त्याला चटकन विसर पडतो आणि जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा त्याला हव्यास असतो. इतरांकडे असेलेली गोष्ट आपल्याकडे का नाही याचा विषाद नेहमी असतो आणि मग त्या प्राप्त न झालेल्या गोष्टी मिळवण्याच्या कधी न संपणाऱ्या प्रवासाला मन निघतं.

आय लव्ह यु बट ....ऍज अ फ्रेंड
Featured

प्रशांतची झोप केव्हाच उडाली होती जेव्हा त्याने प्राचीला लाजत लाजत 143 असं म्हणून प्रपोज केलं होतं आणि प्राचीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की आय लव्ह यु टू बट..... ऍज अ फ्रेंड.

धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन
Featured

कदाचित त्या दिवशी माझे आंधळे पुत्रप्रेम मला माझ्या प्रथम पुत्राचा त्याग करण्याच्या योग्य कार्यात आडवे आलेच नसते तर हे सगळे महाभारत घडलेच नसते. फार प्रेमाने त्याचे नाव सुयोधन ठेवले होते? पण नक्की काय सुयोधन कि दुर्योधन?

थेंब पावसाचे
Featured

युनायटेड किंग्डम मध्ये प्लिमथला राहणारा कैवल्य चिपी विमानतळाच्या बाहेर येताच आश्चर्यचकित झाला. इतके दिवस परदेशात राहिल्याने भारतात जूनच्या सुमारास असही वातावरण असते हे तो साफ विसरलाच होता. त्याच्या अंगाची लाही लाही होत असल्यासारखी वाटत होती. त्याची सारखी चिडचिड होत होती.

रिसायकल्ड एंड युज्ड
Featured

रिसायकल्ड एंड युज्ड हि पराग आणि समीक्षा या विवाहित जोडप्याच्या नात्यावर आधारित लघु विज्ञानकथा आहे. निरनिराळ्या प्रलोभनाच्या प्रसंगात मानवी मन कसे व्यक्त होईल हे सांगणे हि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जनुकीय संशोधन या विषयावर संशोधन करत असताना प्रचंड गोपनीयता पाळली जाते. या गोपनीयतेचा कोणाला कसा फायदा उठवता येऊ शकेल ते सांगता येत नाही. या कथेतून निरनिराळ्या मानवी स्वभावांचे चित्रण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. हि कथा तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.

टपरी
Featured

आजही अनेक वेळा त्या रस्त्यावर टपरी वाला अण्णा दिसतो आणि त्याचे चार आणे वसूल करण्यासाठी हाका मारतो. पण मी कधीच गाडी थांबवत नाही.

उल्लालचे सरकार

सदर लघु कादंबरी हि संपूर्णपणे काल्पनिक असून हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. या गोष्टीतील पात्रांची, ठिकाणांची नावे यांच्यात काही साधर्म्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या वैय्यक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. वाचून पूर्ण झाल्यावर हि कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. बुक्सट्रकच्या सर्व वाचकांचे मनापासून आभार, आमची तुम्हाला विनंती आहे कि तुमच्या अधिकाधिक वाचक मित्रांपर्यंत या कथा पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा. ह्या कथा तुमच्या वाचक मित्रांना शेअर करा. धन्यवाद!

पेंडोरा बॉक्स
Featured

हि एक काल्पनिक विज्ञानकथा आहे हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. केवळ एक कल्पनाविलास या सदरातच वाचकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा.

जंजाळ
Featured

हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. केवळ एक कल्पनाविलास या सदरातच वाचकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा.

अकल्पित
Featured

दुसऱ्या जगातील माणूस शेफालीच्या प्रेमात पडतो तेव्हा तिच्या आयुष्यात काय उलथापालथ होते याची हि काल्पनिक विज्ञानकथा आहे.

गिनी पिग
Featured

एखाद्या जोखमीच्या वैज्ञानिक प्रयोगात मानवाचे शरीर वापरण्याऐवजी एक छोटासा उंदीर सदृश प्राण्यावर प्रयोग केला जातो त्या प्राण्याला गिनी पिग म्हणतात.