७७.

हातात इळादोरी कुठ निघाल मळंकरी

बंधु चातुर माझ, केळी उतरी येळापुरी.

७८.

जेवनाची पाटी माझ्या मानेला झाली जड

बंधु वाट मळ्याची अवघड.

७९

जेवनाची पाटी माझ्या मानेला झाली जड

बंधु वाट मळ्याची अवघड.

८०.

जेवनाची पाटी मी ठेविते धांवेवरी

घरधनी माझ , कुठ गेल्याती मळेकरी

८१.

जातीचा मर्‍हाठा , हिमतीन झाला माळी

ताईत बंधु माझा उसात लावी केळी.

८२.

माळ्याच्या मळ्यामंदी जाईशेवंती खुलत

बंधुजी येतो रस्त्यान डुलत .

८३.

लगीन न्हाई , मूळ कशाच मला आल

माझ्या बंधुजीच गुर्‍हाळ चालू झाल.

८४.

पहाटच्या पारामंदी , हाक हारोळी चिल्लाळाची

ताईत बंधु माझा, पाळ हानितो गुर्‍हाळाची.

८५.

लगनापरायास, गुर्‍हाळी तुझी हवा

बंधुजीचा घाना कातीव बैल नवा.

८६.

लगनापरास गुर्‍हाळाची हवा

चरकी जळे दिवा.

८७

बैलामंदी बैल पांखर्‍या दूध प्याला

सडका लावुन मळ्या नेला.

८८.

नंदांमंदी नंदी मल्ल्या नंदी अरेराव

धन्या , लाडक्या दाव लाव

८९.

बैलामंदी बैल हौशा किती शाना

धन्यावाचुन पानी पिईना.

९०.

गाडीच्या बैलानी शिवारी केला दंगा

धनी गावाला गेल सांगा

९१

मारक्या बैलाला भीतल सार गांव

धनी धाकुटा लावी दांव

९२

थोरल मार घर अंगन बिघाभर

हौशा बंधुजी बैलाला जागा कर

९३

गाडीच्या बैलाला रातरीची पडली चाल

गाडीवानाच डोळ लाल

९४.

गाडीचा बैल बघतो रागंरागं

हाती कासरा धनी मागं.

.९५

दुरुन ओळाखते गाडीच चक्कर

बैल न्हव , ती पाखर ,घरच्या गईअची वासर

९६.

गाडीच्या बैलानी घेतल आडरान

माझ भुक्याल गाडीवान

९७.

माझ्य़ा वाड्याम्होर , धुरळा कशाचा उठला.

नंदी गाडीचा सुटला

९८.

गाडिच्या गाडीवान नंदी तान्हेल गाडीचा

हौद खंडीला पान्याचा

९९.

शिवंच्या शेतवरी जोड नांगर कुनाच?

बैल डफळ्या वानाच.

१००.

गाडीची बैल माघारी बघत्यात

धन्या इसावा मागत्यात

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel