सिद्धेश्वर विलास पाटणकर
 
झी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
गंध मनाचा उडाला नभी
थेंब  बनूनी खाली कोसळली
तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
झिजूनी काय मिळवले, माऊली ?
चूल मोकळीच राहिली
हात जरी असले मदतीस हजार
तुझी चव मात्र आतच राहिली
उत्तरे न मिळती कोड्याची
सर्व दडले या अंतरी
मनी साठले भंगार सारे
अंगार बनूनी जाळी जीवा
ज्वाला जिथे तिथे पोहोचली
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा
आम्ही काशी नाही दाविली
उभी हयात चिंतेत गेली
चितेवरी ती लोपली
गेली मित्रा, सोडूनि आम्हा
कायमची माझी माऊली

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel