काहीजणांना निळावंती हा ग्रंथ थोर गणिततज्ञ भास्कराचार्यांनी लिहला असं वाटतं पण तसं नाही कारण भास्कराचार्यांचा ग्रंथ "निळावंती" नसुन "लिलावती" हा आहे. हा गणितविषयक ग्रंथ असुन भास्कराचार्यांची मुलगी लिलावती च्या नावावरुन आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित "सिध्दांत शिरोमणी" या ग्रंथाचा एक भाग आहे.
स्वामी विवेकानंदांचा मृत्यू कुठल्याही ग्रंथाच्या वाचनाने झाला नाही. त्यांनी स्वतःहून समाधी घेतली.
निळवंती ग्रंथावर भारत सरकारची बंदी नाही. अंधश्रद्धा प्रकारात मोडणाऱ्या पुस्तकावर सरकार बंदी आणू शकत नाही. गुढविद्यावर कोर्ट विश्वास ठेवत नसल्याने त्यांच्या पुस्तकावर निव्वळ मनोरंजन म्हणून पहिले जाते.
निळावंती ग्रंथा च्या वाचनाने सहा महिन्यात मृत्यू येतो किंवा वेड लागते. ह्यात काहीही तथ्य नाही. निळावंती ग्रंथाचा अभ्यास शेकडो लोकांनी केला असून अनेक शाहीर, तांत्रिक मंडळींनी हे पुस्तक वाचून आपले आयुष्य सुखांत घालवले आहे. तंत्र आणि मंत्र शास्त्रांत असा कुठलाही मंत्र नाही ज्याच्या वाचनाने माणसाला आपल्या इच्छेविरुद्ध मृत्यू येतो.
निळावंती ग्रंथाने पशु पक्ष्यांची भाषा येते. इथे थोडे तथ्य आहे. पशु पक्षी माणसा प्रमाणे हजारो शब्दांनी परिपूर्ण भाषेत बोलत नाहीत. मुळांत पशु पक्ष्यांना विकसित मेंदू नसतो त्यामुळे भाषा हे प्रकरण त्यांना मुळांतच जास्त जमत नाही तिथे माणूस आणि त्यांच्याशी काय संवाद साधणार ? पण त्यांची थोडी जुजबी अशी भाषा असते आणि प्रयत्नाने माणूस ती समजून तरी घेऊ शकतो.