धारप हे लिहिताना अतिशय तर्कसुंगत लिहत आणि आपल्या कथा शास्त्रीय पायावर आधारित ठेवत. त्यांची एक कथा अशी होती जयंत दोन भावंडे खेळता खेळात एक पेटीत अडकतात आणि बाहेर निघू शकत नाहीत. अतिशय हृदयस्पर्शी कथा होती ती.
एका कथेत एक बाई बाहेर आईसक्रीम आणायला निघते पण परत येते तर तिचे घर तिचे नसतेच मुळी मग समजते कि ती एका वेगळ्या पॅरलल जगांत पोचलीय. हा प्रकार भारतीय वाचकांसाठी नवीन होता.
" स्वप्नांचा राजा कथुलु" : इंग्रजीतील लोवक्राफ्ट हे लेखक भयकथांचे दादा मानले जातात. प्रत्यक्षांत लोवक्राफ्ट ह्यांची कथानके फारच सुमार दर्जाची होती आणि त्यांची पुस्तके कधी खपली हि नाहीत. पण त्यांची कल्पना शक्ती अफाट होती. त्यांच्या काही संकल्पनांना इतर लेखकांनी उचलून क्रेडिट देऊन आपलेसे केले. लोवक्राफ्ट ह्यांच्या कुंथुलू ह्या भुताला धारप ह्यांनी मराठीत आणले. कुंथुलू हा भूत नसून एक देव (किंवा दानव) आहे. तो अत्यंत पुरातन असून मानवाच्या ज्या काळ आणि स्पेस च्या संकल्पना आहेत त्या त्याला लागू नाहीत. तो अर्धा ऑक्टॉपास, अर्धा सिंह, अर्धा ड्रॅगन असा काहीसा आहे आणि त्याचे दर्शन घेणारा माणूसवेडा होतो. काही अगम्य कारणाने कुंथुलू पृथ्वीवर आहे आणि तो एका ध्रुवीय भागांत किती तरी खोलवर गाढ झोपेंत आहे. मानवी मनाला "भय" जे वाटते त्याचे कारण कुंथुलू असून आम्हाला रात्री जी स्वप्ने पडतात त्याचे कारण कुंथुलू आहे. कुंथुलू आणि इतर मानव ह्यांच्या मानसिक लहिरी स्वप्नात कधी कधी गुंफून पडतात.
कुंथुलू हा इतका प्रचंड विलक्षण विल्लन आहे कि जगातील शेकडो भाषांत त्याच्याबद्दल लिहिले गेले आहे. काही लोक असेही मानतात कि कुंथुलू खरा असून लोवक्राफ्ट ह्यांनी त्याला मानवी संस्कृतीत पुन्हा जागृत केले आहे.
खरे खोटे काहीही असो पण धारप ह्यांनी सर्वप्रथम ह्याला मराठी भयकथांत आणले.