-    कल्पना देशमुख
नवी मुंबई

हरित तृणांचे ऊन झेलत
दवबिंदूना साद घालत
टपोऱ्या थेंबांचे मोती उधळत
आला श्रावण आला श्रावण...||

रिमझिमतेचा मधुर नाद
उत्साह अन् सृजनतेची साथ
ठायीचे ठायी हिरवे यौवन
आला श्रावण आला श्रावण...||

वसुंधरेला सजवत फुलवत
तनामनात उल्हास जागवत
अमृत धारेने कर सिंचन
आला श्रावण आला श्रावण...||

भावभक्तीची जोड देऊन
दानधर्माचे महात्म्य सांगून
सणांची बरसात घेऊन
आला श्रावण आला श्रावण...||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel