जो जो जो जो रे, श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे, श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

भक्तीतंतूचा मृदू शेला पांघरविते तूजला
जो जो जो जो रे, श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

प्रेमदोरीने पाळणा हालविते श्रीकृष्णा
जो जो जो जो रे, श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

एका जनार्दनी गायिला श्रीकृष्ण आळविला
जो जो जो जो रे, श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।

जो जो जो जो रे ।।धृ।।

जो जो जो जो रे ।।धृ।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel