चोखियाचे घरी चोखियाची कांता । सोयरा तत्वतां नाम जीचें ॥१॥

बहु दिवस करी प्रपंच कारण । परी नव्हे संतान तिजलागीं ॥२॥

बैसोनियां एकांतीं आठवी पंढरीराणा । म्हणे कांवो नारायणा विसरलासी ॥३॥

आमुचीया कुळीं नाहीं वो संतान । तेणें वाटे शीण मना माझ्या ॥४॥

ऐकोनी पंढरीराव हासलासे मनीं । म्हणे ऐकें रुक्मिणी गोड एक ॥५॥

चोखियाची कांता चिंताक्रांत मनीं । संसारी असोनी उदास वृत्ती ॥६॥

पोटीं नाही मूल करी तळमळ । वंका म्हणे विठठल काय करी ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel