होउनी निश्चित हरुनियां चिंता । मग जाईं एकांता भजन करीं ॥१॥

संसार संभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साठी होइल तुझ्या ॥२॥

सेखीं विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील विषयडोहीं ॥३॥

शरीर सकळ मायेचाचि बांधा । यासी नाहीं कदा आराणूक ॥४॥

करिती तडातोडी अंतर्बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥५॥

मोलाची ते घडी अजते वायांवीण । न मिळे मोल धन देतां कुडी ॥६॥

जागा होईं करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel