ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ भक्तपहातीसमस्त ॥ विठोजीम्हणेकळलास्वार्थ ॥ याज्ञानांजनाचा ॥१॥

कैसेंओळखलेंत्याज्ञाना ॥ समाधानतयाध्याना ॥ मनींनाठवेंमीतूंपणा ॥ समाधिखुणाज्ञानासी ॥२॥

मगम्हणेविठोजीदातार ॥ समाधीतुजनिरंतर ॥ आतांप्रस्थानकरींसाचार ॥ मजनिरंतरआठवीं ॥३॥

कैसेपरीपूर्णवोळलें ॥ आपण समाधिरूप झालें ॥ मनातेंमनसमरसलें ॥ विठ्ठलस्वरूपीं ॥४॥

दशमीप्रस्थानाचासमयो ॥ एकादशीजागर उच्छावो ॥ द्वादशीक्षीराब्धिमोहोत्सवो ॥ ज्ञानदेवेंकेला ॥५॥

त्रयोदशीम्हणेपांडुरंग ॥ कांहींनकरींगाउद्वेग ॥ अळंकापुरींसमाधीप्रसंग ॥ करींकरींलवलाह्यां ॥६॥

मातारुक्मिणीवाढीताटीं ॥ विठोजीम्हणेउघडीदृष्टी ॥ तुजमजआहे नित्यभेटी ॥ येईपंढरीये ॥७॥

नामाम्हणेज्ञान उदयो ॥ अळंकापुरींसिद्धसमयो ॥ परीविठ्ठलीं मुरालाभवो ॥ याज्ञानदेवाचा ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1