१.    काया

ओरबडली काया तिची
विवस्त्र तिजला केले
चिरडले विनय तिचे
अन घात करूनी गेले

इवलीशी चिमुकली होती ती
तिने काय केला असेल गुन्हा
नारिशक्तीचा विझवून दिवा
अपराध केला त्यांनी पुन्हा पुन्हा

भय वाटे फिरण्याचे आता
नजरेत दानव उतरले
अब्रूची झाली काहिली
तन पुरते तिचे थरथरले

शांत‌ करण्या दाह सारा
नाही जमले आसवांनाही
जळून गेले श्वासांचे घर
फक्त उरल्या जखमा काही

२. खिसा

रिकाम्या खिशाला
रुपया ही जड होतो
फाटलेल्या खिशाची
काय सांगू  तुम्हास महती

सुकाळ असो वा दुकाळ
एकसारखेच दिवस सगळे
भरझरी स्वप्नांतही माझ्या
रात्र उसवलेली होती

तुटलेल्या ताऱ्यानेही
फिरवली पाठ पाहून मला
सामर्थ्यही नाही उरले
पाहण्यास आता वरती

डोळ्यांत दाटले पाणी
ओठांत शब्दही विरले
संपली ‌मनषा सगळी
श्वासात श्वास अडती

३. आधार:


तुला आठवत...

कधी काळी माझ बोट धरुन
तू चालायला शिकलास...

आणि आज आमची जागा
दाखवायला ही नाही मुकलास...

चालताना पडू नयेस म्हणून
आधार म्हणून मागे चाललो...

आज वेगळा आधार मिळाला तुला
पण बेआधार जगतातून आम्ही हुकलो...

तुझ्या चुकांवर नेहमी पडदा घातला
आज आमच्या बिनचूक जगण्याला ही त्रस्त झालास...

तुझं तोतलं बोलणंही प्रिय होत आम्हाला
आमच्या सरळ बोलण्याला शाप तू म्हणालास...

कधी तुला एकटं सोडून जगलो नाही आम्ही
सोडून वृद्धाश्रमात आम्हाला मोकळा झालास...

होतो दयेचे सागर आम्ही
तू कोडगा वाळवंट होऊन गेलास...

तुला आठवलं तर बघ...

स्वप्नील प्रकाश धने
वैजापूर (औरंगाबाद)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to आरंभ: डिसेंबर २०१९


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
९६ कुळी मराठा