( अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुचलेल्या आठ अति लघु कथा )

1 . आठ दिवस झाले , संचारबंदी लागू आहे . कुठे बाहेर पडता येत नाहीये  , भाजी पण संपलीय आता काय करायचं जेवायला ?
ती कपाळाला हात लावून बसली होती . तेवढ्यात सासूबाईनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला ,अग वरच्या डब्यातून कुरडया काढ 5 - 6 मस्त कुरड्याची भाजी करूया , तुझ्या नवऱ्याला पण खूप आवडते .
तिला एकदम आठवले , मागच्या वर्षी सासूबाईनी कुरड् यांचा घाट घातला तेव्हा तिने किती त्रागा केला होता ते ...

2 . अरे बापरे हातात कॅश तर काहीच नाही , ATM मधले पैसे देखील संपलेत आणि आता ड्रायव्हर पगार मागतोय
मुलगा आजारी आहे म्हणे , काय करावं ?
तो विचारच करत होता , तेवढ्यात
बाबांनी 10,000 हातात ठेवले , घे मागच्या आठवड्यात पेन्शन काढली होती
त्याला एकदम आठवले , सर्व काही ऑनलाइन असताना विनाकारण बँकेत कशाला जायचं ? यावरून त्याने बाबांशी किती तरी वेळा वाद घातला होता ते ......

3 . अगगबाई , माझ्या सगळ्या गोळ्या संपत आल्यात
आणि बाहेर तर ही पारस्थिती , सगळं बंद . आता कसं करणार ? आजीला खूप काळजी वाटत होती .
दुसऱ्या दिवशी दुपारीच एक माणूस दारात हजर , सगळी औषध घेऊन .
अग याला कुणी सांगितलं माझी औषध संपली म्हणून ?
अग ऑनलाइन ऑर्डर केली मी , नात मोबाईल नाचवत म्हणाली
आणि आज्जीला एकदम आठवलं , ' सारख मेल काय त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतेस ,  म्हणून आपण कितीतरी वेळा हिला रागावलो होतो ते ....


4 . सगळं बंद म्हणजे काय , आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं घरात बसून ? संध्याकाळी जरा मंदिराच्या आवारात बसून मित्र मित्र गप्पा मारत होतो , तर मंदिरही बंद करून टाकली , सकाळपासून आजोबांची चीड चीड चालू होती ,
संध्याकाळी नातवाने बोलावलं त्याच्या खोलीत , आणि बसवलं लॅपटॉप पुढे , आजोबांचं सगळं मित्र मंडळ जमलं होत skype वर , मग काय दोन तास गप्पांचा फड रंगला.
आणि रात्री झोपताना आजोबांना आठवलं  " तासनतास त्या कॉम्पुटर वर कोणाशी गप्पा मारत बसतो " म्हणून याचीच आपण सारखी तक्रार करायचो ते ....

5  . आता सगळं बंद
ऑफिस आता घरीच थाटल त्यानं , सुट्टी असल्यामुळे पोरही घरी , नुसता दिवसभर दंगा . त्याला काय हवं नको ते सगळं देऊन ती पोरांच्या दिमतीला दिवसभर उभीच , एक मिनिट ही बसली नाही ,
रात्री थकून भागून अंथरुणावर शांत पडलेल्या तिला पाहून त्याला आठवलं , आजवर कितीक वेळा  " घरातच तर असतेस , काय काम असतात तुला " अस तिला म्हनालो होतो  ते ......

6 . बापरे उद्यापासून सगळी घरी
तेही 21 दिवस
काटाच आला तिच्या अंगावर
नवरा करतोय वर्क फ्रॉम होम , मला मेलीला कसली सुट्टी ? ती चरफडली
दिवसभर त्याच्या कामाच्या व्यापात तो , कॉल्स घेतोय , मिटिंग , कॉन्फरन्स कॉल काय नी काय , धड जेवायला सुद्धा मिळालं नाही , चहा चारवेळा गरम केला तरी प्यायला मिळाला नाही .
हे पाहून अचानक तिला आठवलं  " तुमचा काय ऑफिसात राजेशाही थाट , मी मरतेय इथे "  अस किती तरी वेळा त्याला सूनवल होत ते .....

7 .  ती मनात विचारच करत होती , उद्यापासून सगळं बंद आता कामाला तरी कसं येणार ?
पण काम नाही तर पैसे नाही , मग लेकरांच्या पोटात काय घालू , या घालमेलीतच तिने कसंबसं काम उरकलं
आणि जाताना म्हणाली , ताई मला उद्यापासून ....
तेवढ्यात मालकीण म्हणाली अग तेच म्हणणार होते मी, उदयापासून येऊ नको आता , आणि हे घे म्हणून पुढच्या महिन्याचा पगार हातात ठेवला .
भरल्या डोळ्यांनी तिला आठवलं
" यांना काय कळणार आमच्या हातावरच पोट असणाऱ्यांच दुःख , यांचं बरंय सगळं  " असं काहीवेळापूर्वीच मनात म्हंटलं होत ते .......

8. आता काय महिनाभर सुट्ट्याच  .
शाळेत मुलं नाहीत , पेपर पण कॅन्सल , चला भरपूर मोकळा वेळ मिळणार आता , थोडं फार ऑनलाइन काम करून तिने मैत्रिणीला फोन लावला , बऱ्याच वेळा try केल्यानंतर तिचाच आला
अग emergency ward मध्ये ड्युटी आहे चोवीस तास .
घरी मुलगी आजारी आहे, आईला बोलावून घेतलंय ,
काय करणार अशा परिस्थितीत ड्युटी फर्स्ट
तिला एकदम आठवलं
 " पैसे होते तुझ्या वडिलांकडे , म्हणून झाली डॉक्टर , आमच्या नशिबी काय , तर मास्तरकी  "
  असं कितीतरी वेळा तिच्या मागे टोमणे मारले होते ते ........

सौ तनुजा सुरेश मुळे ( मानकर )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to कोरोनावरचे लेख


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत