“ या ! मधुकरराव, या ! मला नव्हतं बाटलं आपण साहेबाप्रमाणं वक्तशीर असाल असं." 


"पण आपण कां बरं इथं बोलावलंत ? ते जाणण्याच्या जिज्ञासेनंच मला इतक्या लवकर इथं आणलं. 


कमळाकर व मधुकर या दोघांमध्ये वरील प्रश्नोत्तरे झाली. मधुकर एके दिवशी आपल्या घरी असतांना कमळाकराचे एक पत्र त्याला मिळाले. त्यांत त्याने मधुकराला काही कामाकरितां म्हणून लोणाव ळ्यास 'शांतिगृहांत ' बोलाविले होते. कमळाकराने कोणत्या कामा साठी बोलाविले असावे, याचा तर्क मधुकराला होईना. परंतु काही तरी तसल्याच महत्त्वाच्या कामाकरितां त्याने आपणांस बोलाविले असावें म्हणून त्याने तिकडे जाण्यांत बिलकुल दिरंगाई केली नाही. 


" दुसरं कशासाठी बोलावणार ? सध्या मुंबईच्या वातावरणांत दुम दुमत असणाऱ्या त्या एकाच गोष्टीपुरता केवळ आपला संबंध या वेळी आहे. पुढं दुसऱ्या गोष्टीचा संबंध येईल ती गोष्ट वेगळी. पण आपण आपला सध्यापुरता विचार करूया.” कमळाकर मधुकराला बसावयास खुर्ची देत व आपणही जवळच एका खुर्चीवर बसून म्हणाला, “तुम्ही कधी तिच्या नवऱ्याला-किनखाप्यांना पाहिलं होतं का ? " 
"छे! कधीच नाही." 

" ते व्यापारी होते व नेहमी दौऱ्यावर असत असं मी ऐकलं होतं. त्यांचा दौरा तरी कुठल्या बाजूस असे हे तरी माहित आहे का ?" । __" नाही व तें विचारण्याचीही इच्छा कधी मला झाली नाही. पण व्यापाराच्या निमित्तानं त्यांना केव्हां केव्हां महिनेच्या महिने बाहेर घालवावे लागत व त्यामळं विचाया सरलेला मात्र एकांतांत बसन दिवस घालवण्याची पाळी येत असे, हे मात्र खरं.” 

"तिला काही मलबाळ होतं का?" 

"नाही. तिचं लग्न होऊन पांचसहा वर्ष झाली होती, तरी तिला मूल झालं नाही. आणि खरं सांगायचं, म्हणजे सरलाही आपल्या नव-या विषयी अभिमानानं अगर विशेष कळकळीनं बोलत असल्याचं आढळन येत नव्हतं. कारण आपला नवरा आपणापासून काही तरी लपवून ठेवीत असावा, असा तिला संशय येत होता, नव्हे,-तिची जवळ जवळ तशी खात्रीच होती.” 

कमळाकगर्ने आपल्या सिगारेटकेसमधून एक सिगारेट काढन मधुकरास दिली व दुसरी आपण ओढू लागला. हवेत धुराचे फवारे सोडीत असतांना त्याच्या मनांत कोणते तरी विचार चालले असावेत असें दिसले. 

" हो. माझाच तर्क बरोबर असावा, यांत शंका नाही.” एक लांबच लांब दाट असा धुराचा लोट हवेत सोडन तो थोड्या वेळाने म्हणाला, " ह्या किनखाप्यांसंबंधानं काही तरी गूढ असावं असं मला वाटतं बुवा ! ते ज्या अर्थी आपल्या पत्नीला आपले हितसंबंध कळवीत नसत, तिज पासून काही तरी चोरून ठेवण्याचा त्यांचा यत्न असे, त्याअर्थी ते मोठे विलक्षण माणूस असावेत यांत शंका नाही. तुला नाही असं वाटत ? कारण मनष्य कोणत्याही धंद्यांत पडणारा असला,तरी लग्नानंतर आपल्या पत्नीला एकटंच मार्ग ठेवून कैक महिनेच्या महिने देशांतरी फिरत राहील असं मला तरी वाटत नाही. शिवाय आज सरलेचा खून होऊन इतके दिवस होत आले, तरी ते तिची चौकशी करायलासुद्धा इथं आले नाहीत. त्यांना अंतःकरण आहे की नाही हेच मला समजत नाही!" 

"आपणां दोघांशिवाय इथं आतां कुणीही नाही." कमळाकर विषय बदलून म्हणाला, " तेव्हा तुम्ही आतां अगदी स्पष्टपणे व मनमोकळे पणानं बोलायला सुरवात करा." 

"कशाविषयी ?" " तुमची मला माहिती-" 

" माझीही तुमच्या बाबतीत तीच इच्छा आहे." मधुकर कमळा करास पुरतें बोलू न देतां मध्येच म्हणाला. 

" उं:, त्यांत कांहींच नाही." कमळाकर पुन्हा एकदा धुराचा मोठा फवारा वातावरणांत सोडून म्हणाला, " नलिनीच्या सांगण्यावरून तुम्हाला मदत करण्यासाठी मी इथं आलों आहे.” । __ " म्हणजे ! मला मदत ? ती कसली ? तुमचं बोलणं अद्यापि माझ्या लक्षात आलं नाही." 

" कळेल. लवकरच कळेल. शरय माझी वाग्दत्त वधू आहे हे तुम्हाला माहित असेलच आणि आपल्या नलिनीची ती जीवश्वकंठश्च मैत्रिण आहे. आलं का आतां लक्षांत सर्व? तुम्हाला ग्रासं पाहणाऱ्या संकटरूपी राहुकेतपासून आपलं रक्षण करण्याला आम्हाला बाईसाहे. बांची व नलिनीची आज्ञा झाली आहे.” __ कमळाकराचे बोलणे ऐकून मधुकर तर अगदों थक्क झाला. 

" तुम्ही माझं रक्षण करूं म्हणतां ते कोणत्या बाबतींत ? कोणत्या राहुकेतूनं मला ग्रासलं आहे ?" त्याने थोड्या वेळाने विचारले. 

"आतां आपण मित्राच्या नात्यानं बांधले गेलो आहोत, तेव्हां एक वचनच वापरतों, बरं का?" कमळाकर म्हणाला, "तुझ्याविषयी सर्व काही मला नलिनीनं सांगितलं आहे. तुझ्याभोंवतीं विणल्या गेलेल्या जाळ्यांतून बाहेर काढण्यास तिला कुणा तरी जिव्हाळ्याच्या माण साची मदत हवी झाली. मग सांग पाहूं, माझी मदत तिनं घेतली ही तिची चूक आहे का ? " 

" काय !" आश्चर्याचा झटका आल्यामुळे आपल्या जाग्यावरून उठून मधुकर म्हणाला, “नलिनीनं तुम्हांला--!" 

" सर्व काही सांगितलं." कमळाकराने त्याचे वाक्य तितक्याच शांत वृत्तीने परें केलें. "माझ्या शरयूची अगदी जिवाभावाची मैत्रिण ना ती? मग तिचं हित तेच आम्हां सर्वोचं हित नव्हे का? मी विचारल्या. वरून तिनं काहीं एक लपवन न ठेवतां सर्व काही मला सांगितलं. तूं त्या रात्री रत्नमहालांत कसा गेलास, तसंच स्वयंपाक्याला मिळालेला तो रत्नजडित खंजीर वगैरे सर्व माहिती मला तिनं दिली, पण तेवढ्यावरूनच भागण्यासारखं नाही. तिच्या हकीकतींतून राहून गेलेले काही भाग तं मला सांगितले पाहिजेस." 

ही हकीकत ऐकून मधुकरास बरे वाटले नाही. कमळाकरासारख्या त्रयस्थ माणसाने आपल्या भानगडीत पडावें हे त्याला रुचलें नाही. परंतु कमळाकराचा तो प्रेमळ, कपटहीन निस्पृह व कळकळीचा असा चेहरा पाहतांच त्याच्या मनांतील हे विचार पार नाहीसे झाले. कृतज्ञतेच्या भावनेने त्याने कमळाकराचे दोन्ही हात आपल्या हाती घेऊन म्हटले, " खरं आहे. कमळाकर, तुझी मदत घेण्याशिवाय मला आतां गत्यंतर नाही. पण-पण हे खुनाचं गूढ उकलण्याकरता मी एका रहस्यभेदकाची नेमणूक यापूर्वीच केली आहे.” ___“ आणि ते मला माहित आहे. मधुकर, तुझ्या त्या गुप्तपोलिसा पेक्षाही मी तुला निरपेक्ष व मनापासून मदत करीन. मात्र तूं मजवर पूर्ण विश्वास ठेवून मजपासून काहीही चोरून ठेवता कामा नये.” ___ "पण आता मला तुला विशेष असं काहीच सांगण्यासारखं राहिलेलं 

नाहीं; कारण तें काम नलिनीनं पूर्वीच केलं आहे." __ "एँ ! बायकांच्या आणि पुरुषांच्या सांगण्यांत किती तरी फरक असतो. हकीकत सांगते वेळी नलिनी इतके हुंदके देत होती की, तिच्या शब्दांचा मला नीटसा बोध झाला नाही. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून जे काही घडलं असेल तें सरळ मनानं सांगून टाक. ईश्वर तुला यांतन खात्रीनं सोडवील.” __ " पण-पण मजवर असला काही तरी गहजब होईल असं तुला वाटतं का?" 

 

" ऐकलेल्या हकीकतीवरून तरी मला तसं वाटतं खरं." " पण मी alibi दाखवली तरी?" "शाबास ! तीच कशी दाखवशील, ती सांग पाहूं." 

" ती अशी. त्या रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या खोलीत झोंपूनच होतो. आणि त्यानंतर मी थिएटरांत गेलो. तिचा खून झाला तो आठ आणि नऊ या दरम्यान झाला असल्यामुळं मी तिथं नव्हतों हे सिद्ध होणार नाही का ?" __ " ते खरं.” कमळाकर म्हणाला, “ पण त्यांनंतर तूं रत्नमहालांत गेला होतास; तसंच तिच्या मत्यमुळं तिच्या दौलतीचा तझ्याकडे येणारा वारसा, शिवाय नाटकांत तूं वापरतोस तो तुझा खंजीर, इत्यादि पुरावे तुझ्याविरुद्ध जाणार नाहीत का ?" 

" पण-पण कमळाकर, मी अगदी शपथपूर्वक, सांगतों की, तिला रत्नमहालांत मी प्रथम पाहिली ती प्रेतवत स्थितीत पाहिली." __ " मग त्याच वेळी तूं ही वर्दी पोलिसांत कां दिली नाहींस ?' 

___“ कारण तो देखावा पाहतांच माझी मति अगदी गुंग होऊन काय करावं ते मला सुचेना.'' मधुकराने त्रासून उत्तर दिले. .. " इथंच चुकलं." कमळाकर मान हालवून म्हणाला, " जर त्याच वेळी तूं पोलिसाला बोलावून आपण रत्नमहालांत का व कसे आलों, आल्यानंतर तो प्रकार कसा दृष्टीस पडला वगैरे हकीकत स्पष्टपणे कळ. वली असतीस तर आज तुला कसलीच भीति नव्हती." __ " पण हा कोण या वेळी आम्हांला त्रास द्यायला आला बवा!" दरवाजा बाहेर कोणी तरी ठोकलेला ऐकून कमलाकर ओरडला. 

"कोणी तरी बाहेर आलं असेल.” असें म्हणून मधुकराने बाहेर जाऊन दरवाजा उघडला. दरवाजांतच रामसिंगाला पाहून त्या दोघां नाही अत्यंत आश्चर्य वाटले. 

“कोण ? रामसिंग !” असा आश्चर्योद्गार दोघांच्याही तोंडन एकदम बाहेर आला. 

 

थोड्याच वेळांत रामसिंगाची स्वारी कमळाकर होता त्या जागेपाशी यऊन थडकली. त्याने त्या वेळी पूर्ण साहेबी थाटाचा पोशाख केला असून त्याच्या तोंडांत एक भला थोरला चिरूट जळत होता. आंत येतांच मधुकर व कमळाकर या दोघांना तेथे असल्याचे पाहून त्याने 

अत्यंत आश्चर्य दर्शविलें. __ "काय ! तुम्हीही इथंच आहांत का ?" तो साश्चर्य म्हणाला, "तुम्हीं या वेळी इथं असाल अशी माझी मुळीच कल्पना नव्हती. खरोखर विलक्षण योगायोग आहे हा ! मी सहज ही जागा तपासण्याकरता 

आलो होतो. काय हो कमळाकर, तुम्ही इथं कसे ?” कमळाकराकडे वळन त्याने विचारले. 

“ अंऽअं ! ! तुम्हांला माझं नावही ठाऊक आहे ! ” कमळाकराने दचकून विचारले. 

" उं:, त्यांत एवढं आश्चर्य ते कोणतं ? एकदा मी मास्तरांच्या घरी असतांना तुम्ही कुणा मुलीबरोबर बोलत त्यांच्या दारावरून चालला होता, त्या वेळी मला त्यांनी सांगितलेलं तुमचं नांव माझ्या ध्यानांत आहे." __ " हो. हेही खरंच. एकूण तुम्ही मला ओळखतां तर ! alright. मी इथं कां आलों तें सांगतो. ह्या गुन्ह्याचा तपास लावायचं काम मी हाती घेतलं आहे, म्हणून मी त्याच कामाकरतां याला इथं घेऊन 

आलो आहे." 

रामसिंगाची मुद्रा जरा त्रासिक दिसू लागली, व त्याने प्रश्नसूचक दृष्टीने मधुकराकडे पाहिले. ___“ पण तुम्ही हे काम माझ्याकडे सोपवलं आहे, मधुकरराव." तो थोड्या वेळाने थोड्याशा कुत्सित शब्दांत म्हणाला. ___ "मग, नाहीं कोण म्हणतो?" मधुकराला बोलण्यास अवसर न देती त्याच्या आधीच कमळाकराने सुरवात केली, " त्यानं तुम्हांला नेमलं आहे यांत किमपिही शंका नाही. पण तुमच्यांत व माझ्यांत एवढाच 

 

फरक आहे की, तुम्ही हे काम पैशामुळं करीत आहां, पण मी तेच काम हौसेनं करीत आहे." 

" पण-कोणाच्याही मदतीशिवाय काम करायचा माझा निश्चय आहे." रामसिंग जरा घुश्शांतच म्हणाला. ___“ मग तो अढळच ठेवा. तुमच्या निश्चयाच्या आड यायची माझी मुळीच इच्छा नाही. तुमचा समज थोडा चुकीचा झाला. आम्हीही आमच्या इच्छेप्रमाणं नव्या धर्तीवर व अगदी स्वतंत्र रीतीनं कामाला लागणार आहोत. यावर तुमची काही सूचना ?" __रामसिंग तरी यावर काय बोलणार ? मनांतला राग आंतल्या आंतच जिरविण्याखेरीज त्याला गत्यंतरच नव्हते. तो मुकाट्याने मधुकराकडे वळून म्हणाला, 

" रावसाहेब, केलेल्या कामाचा तपशील आतां तुमच्याजवळ द्यावा अशी तुमची इच्छा आहे का ?" 

" होय. माझी तयारी आहे." मधुकराने उत्तर दिले. रामसिंगाची खवळलेली वृत्ति पाहून त्याला मनापासून संतोष होत होता. 

" पण तुमच्या एकट्यापाशींच तो सांगण्याची माझी इच्छा आहे." मधुकराने कमळाकराकडे पाहिले.त्यानेही कुचेष्टेने आपले खांदे उडविले. 

" बहोत अच्छा !” त्याने मधुकराच्या मूक प्रश्नास उत्तर दिले, " तुमचं चालू द्या, तोपर्यंत मी आपला बागेत जरा फेरफटका करून येतो." तो बाहेर पडतांच रामसिंगाने आपले ओंठ कडकडून चावले. 

"हं रामसिंग, करा सरवात आतां." 

" तुमचा मजवर विश्वास नाही का ?” रामसिंगाने बोलण्यास सर वात केली. तो या वेळी मधुकराकडे कुढया नजरेने पाहत होता. __" तो कसा ? " मधुकराने विचारले. 

"तुम्हाला कदाचित् तसं वाटत असेल." रामसिंगाने सांगण्यास सुरवात केली, " पण सध्या तुम्ही कोणत्या संकटांत आहांत, हे तुम्हाला माहित आहे का ? मास्तरसाहेबांची काकदृष्टि तुम्हाला मिळा. लेल्या पैशांवर खिळलेली आहे. तुम्हांला ती मिळालेली त्यांच्यानं 

 

पाहवत नाही. म्हणून काहींना काही तरी कुरापत काढून तो तुमच्यावर 

खटला करूं पाहत आहे.” ___तसं करणं त्याला अशक्य होईल. कां बरं ? तुम्हाला तो त्या बाबतींत त्रास देतो का?" 

"तो मला स्वतःला मदत करायला सांगत आहे.” रामसिंगाने घुम्या आवाजात उत्तर दिले, " पण ज्या अर्थी मी तुमचा नोकर आहे, त्या अर्थी मी तुमच्याच बाजूनं नेहमी राहणार. तुमच्यापाशी जितका पैसा आहे तितका त्याजपाशी नाही." 

" ठीक.” मधुकराने उडत उडतच उत्तर दिले. " पुढं ?'' 

"त्याला आपल्याविरुद्ध पुराव्याच्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत." रामसिंग थोडा वेळ थांबन आपल्या बोलण्याचा मधुकराच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो हे पाहूं लागला. थोड्या वेळाने त्याने विचारले, ___ " त्या रात्री पोलिसशिपायाबरोबर बोलत उभे राहणारे तुम्हींच नाही का ? बंगल्याच्या मुख्य दरवाजाची किल्लीही तुमच्यापाशीच होती." 

" हे तुम्ही कशावरून म्हणता ?” मधुकराने शांतपणाने विचारले. 

" प्रत्यक्ष पुराव्याशिवाय मी हे काही बोलत नाही." असे म्हणून रामसिंगाने आपणास असलेली सर्व माहिती मधुकराला सांगितली. 

" त्या मास्तराला हे सर्व माहित झालं ?" मधुकराने थोड्या वेळाने प्रश्न केला. __ " होय. या सर्व गोष्टी माहित झाल्यापासून मास्तरसाहेबांची स्वारी ही बातमी पोलिसांत देण्याकरता अत्यंत उतावीळ झालेली आहे; पण त्यांना मी अजूनपर्यंत समजूत घालून थोपवून धरलेलं आहे.". __ " या बाबतीत तुमचं काय मत आहे, रामसिंग ?" थोड्या वेळाने 

तो म्हणाला. 

'" खुनासारखं निर्दय कृत्य तुमच्या हातून घडलेलं असेल असं मला वाटत नाही.

 

" तुम्ही म्हणतां ते बरोबर आहे." आपल्या मुद्रेवर उसने हास्य माणन मधुकर म्हणाला, "तुमच्या कल्पनेप्रमाणं मी खरोखर निरप राधी आहे. कारण तिचा खन नवांपूर्वी झाला असं डॉक्टर सांगतात." 

" होय. डॉक्टराचं तसं म्हणणं आहे खरं.'' 

" आता तुम्ही जर माझ्या घरवाल्याला जाऊन विचाराल, तर तुम्हाला मी आपल्या घरी नऊ वाजून जाईपर्यंत झोपून होतो असं समजून येईल. पण त्यानंतर थिएटरांतील एक नोकरच मला थिए टरांत बोलावण्याकरतां आला. माझा हस्तक एकाएकी आजारी पडल्यामुळं तें काम करायला ताबडतोब येण्याविषयी मॅनेजरनं मला विनंती केली होती. त्या माणसाबरोबरच मी नाटकगृहांत गेलो.” ___ " होय, ते मला माहित आहे. पण त्यानंतर तुम्ही तिकडे 

गेला होता ?" __ " होय, नलिनी बंगल्यांत माझी वाट पाहत असेल, या समजुतीनं मी बंगल्यांत गेलों; पण तो भयंकर प्रकार नजरेस पडतांच, तिचा खन मीच केला या आरोपावरून कदाचित् मला पकडतील, या भीतीनं मी तसाच बाहेर पडलो. तो खंजीर तिथं कसा आला याचं तुम्हांला आश्चर्य वाटत असेल. त्या खंजीराची हकीकत अशी:-सरलेचा खून होण्यापूर्वी काही दिवस मी तिला भेटायला गेलो असतां तो खंजीर तिला दाखवण्याकरता म्हणून मी बरोबर नेला होता. पण येते वेळी घाईनं निघाल्यामळं तो तिच्याकडेच विसरून राहिला. तेव्हां खनाच्या रात्री ती जेव्हां रत्नमहालांत गेली, तेव्हां कांहीं तरी कारणाकरतां तिनं तो. खंजीर बरोबर घेतला असावा." __ " खरोखरच, आपल्या या हकीकतीवरून आपण पूर्ण निरपराधी 

आहां अशी कुणाचीही सहज खात्री पटेल. " रामसिंग म्हणाला. 

नंतर रामसिंगाने मधुकराला कमळाकराने विचारले होते तसे बरेच, प्रश्न विचारले; परंतु त्यापासून काहीच फायदा न होता तो अधिक गोंधळांत मात्र पडला. मधुकरानेही त्याला खुनी इसम नी. असावी असें कमळाकराचे मत सांगितले. 

 

" छे, हे शक्यच नाही." रामसिंग म्हणाला, " इतकी छाती कुणा -स्त्रीची होणं शक्य नाही. तरीही मला यावर विचार केला पाहिजे. 

कारण रमाबाईचाही इथं थोडाबहुत संबंध आहे.” - " काय म्हणता ? तिचा संबंध ! " मधुकराने आश्चर्याने परंतु त्याच वेळी कोपयुक्त होऊन विचारले. __ " होय. त्यांचा इथं काही तरी संबंध असला पाहिजे. खन झाला त्या रात्री गात असणाऱ्याचा आवाज त्यांच्या आवाजासारखाच असून चाललेलं पदही तिच्या आवडीचंच होतं " 

" तुमचे आपले काहीं तरीच तर्क, रामसिंग !” रामसिंगाची विधाने न आवडून मधुकर एकदम ओरडला. ___“ रामसिंग म्हणतात तेंच बरोबर आहे व माझ्याच मोटरीतून ती आपल्या घरी पळाली.” कमलाकर एकदम खोलीत घसून म्हणाला, " खून स्त्रीच्याच हातून झाला यांत आतां शंका नाही व ती रमाबाईच होय.” 

" अगदी अशक्य !" मधुकर ओरडून म्हणाला, “तुम्ही काय बोलतां याचा विचार केला आहे का ? या गोष्टीवर माझा मुळींच विश्वास बसणार नाही.” 

" कसं बरं अशक्य ? ” कमळाकराने म्हटले, “ रमाबाईसारख्या स्त्रीला सरलेसारखी नाजुक तरुणी जगांतन उठवायला अवकाश का लागणार आहे ?" 

" पण बिचाऱ्या निरपराध सरलेची हत्त्या करायचं तिला कारण काय ?" ___“ सर्पाला दंश करायला यत्किचित कारणही पुरेसं होतं. येनकेन प्रकारेण तो आरोप तुझ्यावर ढकलन तुझा आणि नलिनीचा विवाह रद्द व्हावा हेच !” 

"ऊं: ! अगदीच भरमसाट कल्पना ! एवढयाकरतां तिनं सरलेचा खन का करावा? शिवाय रमाबाई त्या वेळी चौपाटीवर होती ना?"

“ मग नाहीं कोण म्हणतो ? ती चौपाटीवर गेली . ती माझ्याच मोटरमधून." 

"पण तुमची मोटर ठाणे स्टेशनजवळ मिळाली.” रामसिंग म्हणाला. ___ "त्यांतच तर गंमत आहे. नाही तरी रमाबाईसुद्धा मोठी हुषार व चाणाक्ष श्री आहे खरी! ठाण्याहून शेवटची गाडी बरोबर १२ ची आहे. मधुकरानं तो बंगला ११ च्या सुमारला सोडला. तो परत येणार नाहीं अशी खात्री होतांच ती बाहेर पडली. पण तिला ती शेवटची गाडी साधायची होती; मधुकरामुळं तिची खोटी झाली. रस्त्यावर येतांच तिला दूर माझी मोटर दिसली. त्यांतून ती लोकांना चकवण्याकरता ठाण्याला गेली व तिथून घरी गेली. तिला मोटर चांगली हाकता येते, हे मला माहित आहे."

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel