उदयननें वासवदत्तेला पळवून आणल्यावर त्या दोघांच लम झाले. काही दिवस आनंदोत्सवांत गेले. दोर्य जणुं कांहीं साया जगाला विसरली होती. राजाचे लक्ष विलासांत गुंतलें म्हणजे राज्यावर संकट ओढवणारच. तेंच दत्सराज्याच्या बांटणीस आलें. अरुणी नावाच्या एका महत्वाकांक्षी यक्तीने वत्सराज्याचा एक एक भाग करून बराच भाग बळकावला. नंतर त्याने राज- घानी कौशाम्बी नगरावर पण हला केला. उदयनचे जें राज्य अरुणीने गिळंकृत केले तें आता परत कसे मिळविता येईल ? या विषयी दवारांत विचार विनिमय झाला. स्यांत सर्वांचे मत पडले की मगध राजाची मदत घेतली, तरच वत्सराज्य परत मिळू शकेल. पण ती मदत मिळणार कशी? त्याला फक्त एकच उपाय, आणि तो म्हणजे दोन्ही राज्यांचा संबंध जोडणे. मगध देशाचा राजा दर्शक याची एक बहीण होती. उदयनर्ने जर तिच्याशी ला केलें तरच त्याची मदत मिळेल. पण वासवदत्ता आहे, तो पर्यंत उदयन दुसरें लग करणार नाही, हे सर्वांना माहीत होते. ती असे पर्वत दर्शक राजा सुद्धा आपली वहीण उदयनला द्यावयास तयार नव्हता. यावर तोड म्हणून त्यांनी एक नाटक रचण्याचे ठरविलें, बांत यौगन्धराय तर होताच, वासवदत्तेने सुद्धां भाग घेतला होता. एकदां राजा उदयन शिकारीला गेला होता. तो आपल्या बीणेच्या नादावर इत्तींना गुंगवण्यांत गर्क झाला होता. त्याच वेळी त्याचे दोघे मंत्री धांवत येत असलेले त्याला दिसले. ते म्हणाले- “अचानक शिबिराला आग लागली.

महाराणी वासयदचा आंत होत्या. त्यांना आहेर काढण्यासाठी यौगन्धराय आंत गेला. परंतु दोघेहि शिविराबाहेर येऊ शकली नाहीत. राजा घाईघाईनेंच शिविराकडे आला. तेथे येऊन पाहातो तो खरोखरच त्याला वासवदता आणि यौगन्धराय दिसले नाहीत. त्याला फार दुःख झाले. बासवदत्तेच्या विरहाने ती जवळ जवळ वेडा झाला. इकडे यौगन्धरायाने साधूना वेश घेतला व वासवदत्ताने ब्राह्मण स्त्रीचा. बत्सराज राजधानीत येतांच ती दोघे बाहेर पडली, व सरळ मगध राज्याच्या राजधानीत राज- वाड्याच्या बाहेरील आश्रमांत येऊन पोहोचली. त्याच वेळी राजाची बहीण पद्मावती आश्रमाच्या पाहाणीस आली होती. त्या दोघांना फार आनंद झाला. आपले काम आलां फत्ते होणार याची त्यांना खात्री बाटली. पद्मावतीने आश्रमांतील स्त्रियांची विचारपूस केली. ही संचि पाहन यौगन्धराय पुढे आला. म्हणाला-"माझी एक प्रार्थना आहे. ही माझी बहीण आहे. हिचा पति विदेशी गेला आहे. म्हणून माझी अशी विनंति आहे. की हिला मी परत येईपर्यंत राजकुमारीने आपल्या सेवेशी ठेवून प्यावें." राजकुमारीने ही गोष्ट मान्य केली. याच वेळी लावणकहून एक विद्यार्थी आला. तो राजगृहाचाच राहणारा होता. परंतु वेदाध्ययनासाठी तो लायणकला गेला होता. त्याने शिबिराला आग लागून ल्यांत वासवदत्ता यौगन्धराय वगैरे जळून गेल्याचे सांगितले. तो म्हणाला-"उदयन राजा शिकार सोडून परत आला व आपल्या बायकोचे दागिने छातीशी धरून दसढसा रडला, अमीत उडी घेऊन त्याने आत्म- हत्येचा प्रयल कसन पाहिला. पण सर्वांनी त्यांना अडविले. महाराज जवळ जवळ बेशुद्धच झाले. विद्यार्थी वर्तमान सांगत असतां वासवदत्तेच्या डोळ्यांतून टि गळू लागली. सर्वांना वाटले की ती फारच हळव्या मनाची आहे. जेव्हा त्या विद्यार्थ्याने सांगितले की मंत्र्यांनी नानाविध उपचार केले आणि आता त्यांची प्रकृति ठीक आहे तेव्हा सर्वांना हायसे वाटले. पद्मावती हि एक दीर्घ सुस्कारा सोडून आपली सहानुभूति दर्शविली. अशा प्रकारें यौगन्धराय वासवदत्ताला पद्मावतीच्या स्वाधीन करून निघून गेला. 

एकदा कामानिमित्त उदयन राजगृहाच्या बाजूला आला होता. दर्शक राजाने त्याचे तेज, रूप व तारुण्य पाहिले तेव्हा त्याला वाटले की हा पद्मावतीसाठी अगदी योग्य वर आहे. त्या प्रमाणे त्याने आपली इच्छा उदयनला सांगितली. त्याने हि विरोध न करतां कबूल केलें. झाले, त्या दोघांचे लवा ठरलें. जसजसा लामाचा दिवस जवळ जवळ येऊ लागलो तसतशी बासवदत्ताची परिस्थिति फार विचित्र होऊ लागली. ती शक्यतोवर एकांतांत राहू लागली. लयाच्या दिवशी तर तिचा आपल्यावरील ताबाच जणू गेला. ती दूर बार्गेत एका झाडाखाली जाऊन बसली. पण गंमत पहा, तेथे सुद्धा एक दासी येऊन पोहोचली. तिनें वरीचशी फुले तिच्या पुढे ठेवून नवथामुलीसाठी सुंदर गजरा आणि हार करून देण्यास सांगितले. आपल्या मनांतील चलबिचल ती कोणास सांगणार! तिने थरथरत्या हाताने ती माळ ओवून दिली. तीच माळ पद्मावतीने समाच्या वेळी उदयनच्या गळ्यांत घातली. एकदां पद्मावती, वासवदता व त्यांची एक सखी बागेत बसून गप्पा मारीत होत्या. 

तेव्हां बासबदतेनें पद्मावतीचे उदयनवर किनी प्रेम आहे हे आजमावण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलतां पद्मावती म्हणाली- "तुम्ही साल गडे, पण खरेच सांगते. किनई हे जवळ नसले ना की मला अगर्दी एकटं एकटं वाटतं. त्यांनी सारसं डोळ्या समोर असावं असं वाटतं. वासवदत्ता तरी त्यांच्यावर असं प्रेम करीत असेल का? असाच विचार माझ्या मनात येतो." "तिचे प्रेम निराळेच होते. त्याची कशाला तुलना." वासवदत्ताच्या तोडून शब्द निघून गेले. 'अवन्तिके, तुला ग काय ते माहीत !" पद्मावतीने विचारले. बासबदत्ता थोडी गुटमळली. परंतु स्वतःला साबरून घेऊन ती म्हणाली-" म्हणजे काय? तिचे उदयन महाराजांवर अतिशय प्रेम होते म्हणूनच नाही का ती घर सोडून त्यांच्या बरोबर निघून गेली." नंतर पद्मावती म्हणाली-" खरोखरच वासवदत्तेला विसरले नाहीत बत्सराज. मी एक दिवस बीणा वाजवीत होते. तर त्यांना तिची आठवण होऊन दीर्घ उसासा सोडून ते अंतरिक्षांकडे पहात बसले." हे ऐकून वासवदत्ताला धन्यता वाटली. त्याच वेळी उदयन य वसंतक पद्मावतीला शोधीत उद्यानांत आले. बासवदत्ता बरोबर असल्याने पद्मावतीला पतीची भेट घेण्याचे साहस झाले नाही. ती जवळच असलेल्या कुंज कुटिरांत शिरली. तिच्याबरोबर तिच्या सखीहि होत्या. वसन्तक तिला शोधण्या- साठी गेला. पण एका सखीचा भका एका मधमाशांच्या पोळ्याला लागल्यामुळे तो तेथूनच परतला. नंतर ते दोघेहि एका 'जांत बसून गप्पा मारू लागले. पसन्तक विदूषकच होता. त्याने मोठ्या ऐटीत राजाची परवानगी घेऊन प्रश्न विचारला. म्हणाला- "पद्मावती व वासवदत्ता यांत आपली जास्त लाडकी राणी कोणती?" राजानें वसंतकला कांहींच उत्तर दिले नाही. त्यावरून पद्मावतीने ताडलेच, पण वसंतकनेंहि राजाच्या तोंडून पदविलें. तें ऐकल्यावर तर शंकाच राहिली नाही. " आतां तरी महाराजांनी असे म्हणावें का!" एक दासी म्हणाली. अग त्यांत वाईट काय आहे. ते गुणवती वासवदत्तेला विसरू शकले नाहीत. ही तर कौतुकाची गोष्ट आहे." पद्मावती महणाली. "किती थोर मन आहे तुमचं." वासब- दत्ता म्हणाली. नंतर पद्मावतीला राजाकडे पाठवून ती दुसरीकडे निघून गेली. काही दिवस अशाच लन्हेंनें विलासांत गेले. एके दिवशी मात्र पद्मावतीचे डोके फार दुखू लागले. तिने आपल्या अवंतिका नांवाच्या दासीला बोलावून आणण्यास सांगितले, म्हणजे ती गोष्टी सांगून तिची करमणूक करील. दुसन्या दासीने ही बातमी राजाला सांगितली.

निरोप कळतांच उदयन वसंतकाबरोबर तेथे गेला. परंतु त्या महालांत पद्मावती अजून आलेली नव्हती. उदयन पलंगावर आडवा झाला आणि बसंतकाला करमणुकी साठी गोष्ट सांगावयास सांगितले. गोष्ट ऐकता ऐकता राजाला झोप लागली, म्हणून तो निघून गेला. निरोप मिळतांच वासवदताहि तेथे आली. ते उनेटासाठी फक्त एक पती जळत होती. या उजेडात तिला पलंगावर कोणी तरी निजलेले दिसले, तिला वाटले पद्मावतीच निजली आहे. “बिचारीका एकटीला सोडून सर्व जणी कशा निघून गेल्या ?" असे म्हणत ती जवळ गेली व हळूच पलंगावर बसली. त्याच वेळी उदयन स्वप्नांत ओरडला-"वासवदत्ता! वासवदत्ता !!" "हे तर वत्सराज आहेत. पावती नाही." ती मनाशीच पुटपुटली-"अग बाई ! मला बोनों पाहिले तर नाही ना! यौगन्ध- रायाची सारी युक्ति फुकट जाईल.” पण तेथे कोणी नसल्याने ती निघून गेली नाही. आपल्या पतीकडे पहात तेथेच उभी राहिली. उदयन स्वप्नांत काही परळत होता. याची उत्तरे तिने दिली. पलंगाबाहेर आलेला त्याचा हात नीट पलंगावर सरक- विला आणि आतां कदाचित त्याची झोप मोडेल असें वाहन ती तेथून निघून गेली. त्याच वेळी उदयन उठला व यासवदतेकडे पाहून तिला हाक मारली. पण ती थांबली नाही. तो उठून वासवदतेच्या मार्गे थांवला. पण झोपेत असल्याने त्याला दरवाज्याची चौकट लागली. तेव्हा आपण स्वम पहात असल्याचे त्याला कळले. राजाचा आवाज ऐकून वसन्तक धांवत आला. राजाने सांगितलेली हकीगत ऐकून म्हणाला-"अहो, ते सर्व स्वाव होते." त्याच सुमारास उदयनचा मंत्री रुमण्वन्त सेना गोळा करून अरुणीशी युद्ध करण्याच्या तयारीने आला. दर्शक राजानेहि आपली सेना सज करून उदयनच्या मदतीला पाठविण्याचे ठरविलें. उदयनला निरोप कळ- तांच तो युद्धाच्या तयारीसाठी निघून गेला. ठरल्याप्रमाणे युद्ध झाले. उदयनचा जय होऊन त्याचे गेलेले राज्य त्याला परत मिळाले. एवढेच काय पण योगायोग असा की त्याची बीणा 'घोषवती'तीदेखील त्याला परत मिळाली. ती नर्मदा नदीच्या कांठी पडलेली कोणाला तरी मिळाली. तो ती वाजवीत कौशाम्बीच्या राजवाड्या- जवळून जात असतां उदयनने तिचा आवाज ओळखला, तेव्हां त्याला वासवदत्ताची आठ- बण झाली. तिचा विरह त्याला असा झाला. त्याच वेळी प्रयोत राजाने बासवदत्ताव उदयन यांची चित्रे पाठविली. ती चित्रं ठेवूनच प्रद्योतने आपल्या कन्येचें लग लावले होते. वासवदत्ताचे चित्र पाहतांच पद्मावतीने अवन्तिकेला ओळखले. तिने विचारलें-" वासवदत्त आणि ह्या चित्रांत काही साम्य आहे?" " हे वासवदतेचेच चित्र आहे." तो म्हणाला. होय का! मग ह्या चित्रासारखीच एक स्त्री येथे आहे." असे समजतांच राजाने तिला बोलावून आणण्यास सांगितले. पद्मावती अवन्तिकेला घेऊन आली. तिच्याबरोबर साधूच्या वेषांत यौगन्धराय पण आला. त्याने राजाला सर्व हकीगत सांगितली व या नाटकाबद्दल क्षमा मागितली. अर्थातच त्याच्या बुद्धिनातुर्याचे राजानें कौतुक केलें. त्या नंतर राजा उदयन आपल्या दोन्ही राण्यांसह आनंदाने राहू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel