मध्ययुगीन काळात, कर्नाटकातील धारवड येथील जवळच्या छोट्या गावात बंगूर नावाच्या ठिकाणी शिलाई मशीनची शिकवण देणाऱ्या गरीब घरातील एका मुलाचे नाव रविंद्र होते. रविंद्र आणि त्याच्या घरचे केवळ प्रामाणिक आणि कष्टकरी नव्हते; तर नव्या गोष्टींना महत्त्व देणारेदेखील होते. त्यात रविंद्र हरएक बाबीत उत्साही देखील होता. रविंद्र एका कॅफेत कामालाही जात असायचा. तो कॅफेवाला मालकदेखील एक चांगला माणूस होता. आणि तो रविंद्रच्या कार्यावर अतिशय खूष होता. रविंद्र कॅफेत आनंदाने मन लावून चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवून दिवसभरात काम करायचा. त्या कॅफेच्या मालकाची "स्नेहलता" नावाची एक सुंदर मुलगी होती. आणि मुळातचं रविंद्रचं स्वप्न होतं की, एक दिवस ती मुलगी अर्थात स्नेहलता त्याच्याशी लग्न करेल. परंतु, कफेच्या मालकाच्या मुलीच्या स्वत:च्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना मालकाने स्वप्न रंगवून ठेवल्या होत्या. 
आणि स्नेहलताचीही अशी इच्छा होती की, तिने एखाद्या श्रीमंत आणि समृद्ध माणसाशी लग्न करावे. ज्यामधे तिला आयुष्यात स्थिरता मिळेल. एके दिवशी, एक श्रीमंत विधवा स्त्री कॅफेत आली होती. त्या स्त्रिला बऱ्याचदा एखाद्याच्या मनातली धांदल ओळखता येत असायची. नेमकं त्यावेळी स्नेहलता कॅफेत एका खुर्चीवर येऊन बसली होती. आणि तिच्या तिथे असण्याने रविंद्र जरासा चलबिचल मनस्थितीत काम करत होता. त्याच्या एकूणएक हालचालींवर ती विधवा स्त्री बारिक लक्ष ठेवून होती. त्या विधवा स्त्रीने लवकरचं रविंद्रच्या मनातला भाव लक्षात घेऊन त्याला एक सहजकरवी नंतर भेटण्याचा इशारा केला. त्या इशाऱ्याने तो जरासा चकीत झाला परंतु काहीतरी नक्कीच महत्वाचं असेल हा विचार करून तो त्या स्त्रीला बाहेर नंतर भेटण्यास गेला. त्यानंतर जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा विधवा स्त्रीने रविंद्रला थेट विचारले की, "त्याचं त्या कॅफे मालकाच्या मुलीवर प्रेम आहे का?" तो या प्रश्नाने आधी थोडासा गोंधळला नंतर सावरत म्हणाला, "प्रेम आहे वगैरे असं मी म्हणू शकेन की नाही याची खात्री नाही पण तिच्याशी थेट विवाहाची स्वप्ने नक्कीच पाहतो मी." त्यावर ती विधवा स्त्री म्हणाली ठीक आहे तुझी इच्छा पुर्ण व्हायला तुला अगोदर तिच्या मनातली तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलची प्रतिमा माहित करुन घ्यायला हवी. रविंद्र म्हणाला, "ते खरयं पण मुळात हे मी करणारं कसं? इतकी वर्षे इथेच काम करत असलो तरी अजून स्वत:च घर स्थिरावूही शकलो नाही आणि महत्वाचं म्हणजे तिच्याशी कधीच बोलण्याचा प्रसंगही उद्भवला नाही." 
            या बोलण्यातून त्या विधवा स्त्रीला रविंद्रची हतबलता  स्पष्ट झाली. तेव्हा तिने एक युक्ती करून पुढील दहा दिवसात तिच्या मनातल्या होणाऱ्या नवऱ्याविषयीच्या कल्पना जाणून घेऊन रविंद्रला सांगितल्या. त्या कल्पना आणि स्नेहलताच्या मनातील एखाद्या स्थिर असणाऱ्या कुटुंबबाबतचा भाव जाणून रविंद्रच्या तिच्याशी लग्न होण्याच्या आशा जवळपास मावळल्यात जमा झाल्या. अर्थात एका दृष्टीने त्याने सर्व आशा गमावल्या. त्यानंतर त्याने थोडासा स्वतःला वेळ देण्यासाठी आणि गावाबाहेरील खासकरून शहरातील काही अनुभव घेण्यासाठी म्हणून कॅफेतली नोकरी सोडली. आणि तो आपला एका नव्या दिशेच्या प्रवासात निघाला. काही दिवस एकामागून एक जात राहिले पण स्नेहलताचे भाव काही त्याच्या मनाचा कोपरा सोडायला तयार होत नव्हते. तिच्या स्वप्नातला राजकुमार जो तिच्या व स्वत:च्या घराला अशी स्थिरता प्रदान करेल ज्याने वैयक्तिक तिला कधीच अडचणींचा सामना करावा लागणार नाही; असं काही अफाट इतक्यात त्याच्याच्याने करणं होणारं नव्हतं. आणि या कारणास्तव स्नेहलताला त्याची पत्नी बनण्याची इच्छा कधीच होणार नाही या विचारांनी तो अधिकच उदास राहिला. त्यानंतर मध्यंतरी एक सात ते आठ महिन्यांचा खडतर काळ निघून गेला. खडतरं काळ रविंद्रच्या मनासाठी असला तरी त्या काळाने रविंद्र व त्याच्या कुटूंबात बऱ्यापैकी गोष्टी या अगदी अथांग आनंद घेऊन येणाऱ्या व समाधानाच्या देऊन गेल्या. रविंद्र जो आधिपासूनच एक चिकित्सक वृत्तीचा मुलगा राहिला होता त्याने काॅमिक्स लेखनात स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं होतं. बेंगळुरू शहरात तो कमालीचा प्रसिद्ध झाला होता, त्याच्या कथा काॅमिक्समधून लोकांच्या ह्रदयाला साद घालू लागल्या होत्या. इकडे काही गोष्टी स्नेहलताच्या आयुष्यात नकारात्मक घडल्या होत्या. आणि त्या गोष्टींनी तिची स्थिरता असणाऱ्या जीवणाची समजूत थेट बदलून टाकली होती. तिला अनेक प्रसंगांना खंबीरपणे सामोरं जावं लागलं होतं. तिच्या वडीलांवर कॅफे विकण्याचीही वेळ येऊन ठेपली होती, पण  स्नेहलताने जिच्या की ह्रदयात एक न उभारी भेटलेली जिद्द लपून होती, तिने त्या जिद्दीचा दमखम दाखवत कॅफेचा लिलाव थांबवला होता. तिच्या वडीलांना गेल्या एक महिन्यांपूर्वी पॅरॅलिसिसचा अटॅक येऊन गेल्यापासून हल्ली कॅफे ती स्वत:च चालवत आहे.
                   एके दिवशी रविंद्र स्वत:च्या गावात घराजवळील गर्द झाडी असलेल्या एका कट्ट्यावर बसला होता. सहज त्याची नजर दूरवरून वाटेने जाणाऱ्या त्याला भेटलेल्या त्या पुर्वीच्या विधवा स्त्रीवर पडली. तिला पाहून त्याच्या जुनाट आठवणी पुन्हा ताज्या झाल्या नी त्याने विचार केला नाही म्हटलं तर किमान कॅफेच्या मालकाला तरी भेटून येऊ. तेवढचं त्यांनाही समाधान वाटेलं नी त्यांची खुशालिही कळेल. मग रविंद्र ठरवून कॅफेच्या वाटेने निघाला, दारापर्यंत जाईसतोवर त्याच्या मनात  स्नेहलताच्या विचारांचे अखंड वारे हेलत राहिले. तो कॅफेच्या आत गेला आणि समोर पाहतोच तर स्नेहलता एका खुर्चीवरील व्यक्तीची आर्डर देत आहे. त्याच्यासाठी हे दृश्य जरा विचित्रचं होतं. त्याला पाहता स्नेहलताने विचारलं, "तुम्हाला काय हवयं?" ती कदाचित बहुदा त्या दोघांची पहिली चर्चा ठरली असेल. त्यावर त्याने प्रतिसाद दिला, मी यापूर्वी येथे काम करायचो आणि मालकांना खास भेटण्यासाठी आलो होतो; ते इथे नसतात का हल्ली? हा प्रश्नही त्याने तिला केला. त्यावर तिने तिची काही महिन्यांपूर्वी घडलेली गोष्ट सांगितली. ते ऐकून रविंद्रला जरासं वाईटचं वाटलं पण तो चक्क स्नेहलताच्या सध्याच्या विचारांनी अगदी स्तब्ध झाला होता. त्याला क्षणार्धात कळून चुकलं होतं की, मला हवी असणारी मुलगी विचारांनी बदलली आणि या गोष्टीने माझा थोडासा का असेना फायदा नक्कीच होईल. तो मनोमन अगदीच आता स्वप्नरंजन करू लागला होता. त्याने त्याचवेळी कॅफे मालकाची भेटही घेतली. आणि त्यानंतर घरी येऊन विचार करू लागला. विचाराअंती शेवटी मनाने पक्क ठरवलं आणि पुढे अल्पावधीत रविंद्र आणि स्नेहलता यांच लग्न झालं. दोघेही आज सुखी आयुष्य जगत आहेत. स्वत:च्या वैयक्तिक कामाव्यतिरिक्त कॅफेदेखील रविंद्रचं पाहत आहे आणि स्नेहलता त्याला त्याच्या हरएक निर्णयात मदत करते आहे. तिला जीवणात एक कळालं की, आयुष्यात स्थिरता नसते प्रवाहासोबत माणसाला वेळ येईल तसं जगावं लागतं. अर्थात कुठल्याच किंवा कुणाच्याही जीवणात स्थिरता नसतेच पण आपण आयुष्य एका भ्रमात घालवतो, हेदेखील खरंय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel