घाबरून देवा आम्ही
चरणी तुझ्या यायचो,
बंद करून डोळे
प्रार्थनाही गायचो..
बंद देवुळातून तुला
सगळं दिसत असेल,
नाती गोती विसरून
माणूस कसा जगत असेल..
कसं का असेना देवा
भरोसा तुझ्यावर ठेवायचो,
चटणी भाकर आम्ही
आनंदाने खायचो..
जगण्या वरचा विश्वास
देवा आता उडू लागला,
बंद दरवाजा करून
तूच लपू लागला
देवा आता दरवाजा
बंद कधी ठेऊ नको,
रंगलेला डाव असा
अर्ध्यावरती मोडू नको...
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.