मासिकपाळी चुकली म्हणजे गरोदरपणाची चाहूल लागते. त्यानंतर सकाळी मळमळणे व उलटया सुरु होतात. एखादया वेळी चक्करही येते. पहिल्या गरोदरपणी हा त्रास जास्त होतो. पहिले तीन महिने हा त्रास होऊ शकतो. काही स्त्रियांना हा त्रास कमी होतो तर काहींना जास्त होतो. या काळात वारंवार लघवीला जावेसे वाटते. स्तनांची वाढ होऊ लागते आणि ओटी पोटात दुखते, मासिक पाळी चुकल्यानंतर काही दिवसांत वरील लक्षणे दिसू लागल्यास ती स्त्री गरोदर आहे असे ओळखावे.
- तुमची मासिक पाळी खूप सौम्य होते किंवा बंद पडते.
- मळमळ किंवा सुक्या उलटया होतात. असं म्हणतात की हे केवळ सकाळच्या वळेत होते पण ते दिवसाच्या कोणत्याही प्रहरात होऊ शकते.
- स्तनांना मुंग्या येणे, त्यांना सुजा येणे किंवा त्यांचं आकारमान वाढू लागतं.
- तुमची स्तनाग्रे किंवा त्या भोवतीची जागा गडद व संवेदनशील होऊ लागते.
- वारंवार लघवीला होते.
- खूप थकवा येतो.
- तुमचे पोट खराब होऊ शकते.
- मळमळणे आणि उलट्या होणे
- छातीत जळजळ
- बध्दकोष्ठ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.