रात्री घडलेल्या प्रसंगा नंतर निर्मला आणि जानकीबाई  वाड्यात घाबरून वावरू लागल्या.कालिंदीच अस्तित्व त्यांना जाणवू लागलं होतं.एके रात्री जेवण घेऊन जानकीबाई संग्रामाच्या खोलीजवळ गेल्या तर त्यांना आतून बोलण्याचा आवाज आला" कालिंदी आली तू तुझीच वाट होतो." संग्राम कोणाशी तरी बोलत होता.जानकीबाईंना वाटलं की वेड लागल्याने तो अस बोलत असावा पण तितक्यात एक घोगरा स्त्रीचा आवज आला" व्हय मालक म्या आली हाय, या साऱ्यांचा बदला घ्यायचा आहे आपल्याले " तो घोगरा अमानवी आवज कालिंदी चा होता त्या आवाजात खूप चीड,राग आणि बदल्याची भावना होती..


       जानकीबाई घाबरून तश्याच माघारी फिरल्या त्यांनी ही गोष्ट भाऊंना सांगितली पण भाऊंना यावर विश्वास बसत नव्हता. रावसाहेब तर पार थकून गेले होते. निर्मला तर राधाच्या आठवणीत रडत बसायची.वाड्यात  भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.जानकीबाई आणि निर्मला बरोबर गडी माणसांना ही  कालिंदी दिसू लागली होती. त्यामुळे वाड्यावरचे गडी माणसं ही हळूहळू काम सोडून जाऊ लागली केवळ एक गडी वाड्यावर होता तो म्हणजे दामू. जनाचे वडील .गावात  सगळीकडे बातमी पसरली की कालिंदी च भूत वाड्यात वावरत आहे. गावकरी पण घाबरू लागले.  भाऊंना तर या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून ते काही केल्या ऐकून घेत नव्हते.आता केवळ परमेश्वराचाच आधार होता. जानकीबाईंनी सुरक्षा कवच म्हणून रुद्राक्षाच्या माळी सोमनाथच्या मंदिरातून सगळ्यांसाठी आणल्या.रावसाहेब, भाऊ,निर्मला आणि दामू या सगळ्यांना त्यांनी त्या माळी घालायला लावल्या. एक दिवस दुपारचं जेवण घेऊन दामू संग्रामच्या खोली जवळ गेला तर रात्री दिलेलं ताट तसंच होत. म्हणून त्याने दार ठोठावल पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता .म्हणून दामू धावत भाऊंना सांगायला गेला.भाऊ लगेच वर आले त्यांनी पण संग्रामला आवाज दिला पण सगळं शांत मग भाऊंनी आणि दामू नी मिळून दार तोडले .निर्मला ,जानकीबाई आणि रावसाहेब ही वर आले होते. जसे दार तोडले तसा अत्यंत घाणेरडा कुबट वास बाहेर पडला.
खोलीची अवस्था  खूप वाईट होती .त्या मागच्या खोलीत जस काळ्या जादूच साहित्य होत तसच संग्रामाच्या या खोलीत ही पडलं होतं आणि तिथे एक फोटो पडला होता हा तोच फोटो जो तुम्हाला वरच्या खोलीत सापडला ज्याच्यावर लाल असे वर्तुळ केले होते. आणि संग्राम डोळे सताड उघडे ठेवून निपचित पडला होता. संग्राम मेला होता. त्याला बघून रावसाहेब तर चक्कर येऊन कोसळेल. निर्मलाला मात्र जराही वाईट वाटलं नव्हते. पोटच्या मुलीला त्याने निर्घृणपणे मारलं होत. भाऊ पण दुःखी झाले. संग्रामचा अंत्यविधी करण्यात आला.
      संग्रामच्या अंताने वाटलं होतं की वाड्यातील दृष्ट चक्र संपलं पण तसं काहीच झाले नव्हते .आता कालिंदीच्या आत्माच्या सोबत संग्रामचा दृष्ट आत्मा ही सगळ्यांना त्रास द्यायला आला होता.आणि बाहेर जे हे दोन दृष्ट आत्मे आहेत तेच हे संग्राम आणि कालिंदी. जिवंतपणी त्यांना जे मिळवता आलं नाही ते मेल्यानंतर मिळवायचं होत. कालिंदी ला माहिती होत की आपण गावकऱ्यांच्या हातून आता जिवंत राहणार नाही म्हणून तिने स्वतःला संपवलं आणि तिच्या मरणाने संग्राम वेडा झाला ,पण तो वेडा झाला जरी होता तरी कालिंदी ने त्याला शिकवलेली काळी विद्या तो विसरला नव्हता आणि त्याचाच वापर करून त्याने कालिंदी ला परत बोलावलं होतं. पण आजरपणा मुळे त्याच शरीर खंगल होत आणि त्यातच त्याचाही मृत्यू झाला.  दोघांचा एकच उद्देश या वाड्यातील लोकांना संपवायचं होत.संग्रामाच्या मनात लहानपणापासून भाऊंन बद्दल जो तिरस्कार होता तो वाढतच गेला त्याच्या मृत्यू नंतरही तो संपला नव्हता. संग्रामच्या आईने त्याच्या मनात भाऊंन बद्दल राग,द्वेष निर्माण केला होता तो त्याने शेवट पर्यंत वाढवला ,सगळं चांगलं असूनही संग्रामला कधी आनंद घेता आला नाही. कालिंदी च्या नादी लागून त्याने स्वतःचा संसार मोडला ,लहानग्या मुलीला मारण्याच पाप केलं होतं.
  कालिंदी ने ही तेच केलं पाटील घराण्याचा सूड घेण्याकरिता  काय काय नाही केल. रावसाहेब आणि भाऊ ह्यांनी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं तरीही संग्राम सारखा दृष्ट व्यक्ती त्यांच्या घरी जन्मल्याच फळ त्यांना मिळत होत संग्राम मुळे मनस्ताप, मानहानी त्यांना सहन करावी लागत होती. अजून बरच काही भोगायच बाकी होत सगळ्यांना. एका रात्री निर्मला तिच्या खोलीत झोपलेली होती आणि अचानक दरवाज्यावर थाप पडली.निर्मला दचकून जागी झाली. तिने घाबरत घाबरत दार उघडलं तर समोर जानकीबाई होत्या.त्यांना बघून तिच्या जीवात जीव आला पण आज जानकीबाईंची नजर काही वेगळीच वाटत होती. निर्मलाने त्यांना काय झालं विचारलं तेंव्हा जानकीबाई म्हणाल्या की "निर्मला तुझ्या गळ्यातील ही रुद्राक्षाची माळ काढून टाक, आपल्या गुरूंनी सांगितलं आहे की ही या माळेने काहीच फरक पडणार नाही आहे,उलट आपण ही माळ घातल्याने त्या दोन अमानवी शक्ती अजून आपल्या ला त्रास देतील.बघ मी ही रुद्राक्षाची माळ काढून टाकली आहे तू पण काढून टाक" जानकीबाई नेहमी सारख्या वाटत नव्हत्या ,निर्मलानी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि गळ्यातली माळ काढून टाकली. जानकीबाई निघून गेल्या . दुसऱ्या दिवशी सकाळचे आठ वाजले तरी निर्मलाच्या खोलीचं दार बंद होत इतक्या वेळ कधीच निर्मला झोपत नाही म्हणून जानकीबाई काळजीने तिच्या खोलीचं दार वाजवू लागल्या पण निर्मलाने दार उघडलं नाही. जानकीबाई घाबरल्या भाऊ ,दामू दोघांनी दार तोडले. सगळे आत गेले .समोरच दृश्य बघून जानकीबाई जोऱ्याने किंचाळल्या त्यांची लाडकी निर्मला समोर मरून पडली होती.तिच्या गळ्यातील माळ खाली तुटून पडली होती. जानकीबाईंचा आकांत तर पाहवत नव्हता.रावसाहेबांना आणखीन एक मोठा धक्का बसला होता.निर्मलाच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण गाव हळहळला होता. त्या रात्री जानकीबाईंच्या रुपात कालिंदी निर्मलाच्या खोलीत आली होती आणि तिनेच ती माळ निर्मलाला काढायला लावली ,कालिंदी आणि संग्राम ने मिळून निर्मला चा जीव घेतला.
    निर्मलाच्या जाण्याने जानकीबाई चा आधार गेला होता.कधी तरी मंदिराप्रमाणे पवित्र वाटणारा वाडा आता स्मशाना प्रमाणे  वाटू लागला होता .आता पुढे हे सत्र असच सुरू राहील याची जाणीव रावसाहेबांना झाली होती म्हणून त्यांनी तातडीने भाऊंना घेऊन त्यांचे गुरू आनंद स्वामींकडे जायचे ठरवले ,इथून वीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे चंदनपुरी तिथे एक टेकडी आहे त्या टेकडीवर स्वामींचा आश्रम आहे .स्वामी महादेवाचे भक्त होते.  त्यांच्याकडे दिव्य शक्ती होती .कुठलीही अमानवी शक्ती त्यांच्यापुढे टिकत नसे.पण स्वामी स्वतःच वाड्यावर आले संकटाची चाहूल त्यांना पूर्वीच लागली होती ,परंतु ते साधनेकरिता खूप दूर गेले होते ,आश्रमात परतताच ते वाड्यावर आले. इथे पाऊल टाकताच त्यांना त्या अभद्र शक्ती अवतीभवती जाणवु लागली. स्वामींनी रावसाहेबांना सांगितलं की तुमच्या जीवाला अत्यंत धोका आहे. संग्राम आणि कालिंदी ची  ताकद अफाट आहे .स्वामींनी आपल्या साधनेने कालिंदीच्या आत्म्याला मागच्या अंगणातील त्या खोलीत आणि संग्रामला वरच्या खोलीत कैद करून टाकले पण एक सांगितले की रावसाहेबांनी जानकीबाई आणि भाऊं सकट हा वाडा सोडून जावा कारण या वाड्यात भाऊंचा वंश पुढे वाढणार नाही. त्या दृष्ट आत्मा फसवून बाहेर पडतील आणि सगळ्यांचे जीव घेतील.आणि अजून एक सांगितले की वाड्याला या अमानवी शक्तींपासून भाऊंचा वारसच मुक्त करेल..त्यात ती दैवी शक्ती असेल ज्याने तो संग्राम आणि कालिंदीच्या आत्म्याला वाड्यातून नष्ट करेल पण त्या करता वाट पाहावी लागेल आणि सद्य परिस्थितीत हा वाडा सोडून जावं लागेल. रावसाहेब आणि भाऊंनी काळजावर दगड ठेवून हा वाडा सोडला ,वाडाच नाही तर हे गाव सुध्दा सोडलं .गावकऱ्यांनी खूप समजावलं ,गयावया केली पण रावसाहेबांचं मन आता काही केल्या इथे लागणार नव्हतं म्हणून इथून दूर गावी जाऊन राहू लागले आणि भाऊंना ही परत या गावी येऊ दिले नाही.दामू सगळा कारभार पाहायचा. रावसाहेब आपल्या कुटुंबासकट जेव्हा पासून वाडा सोडून गेले तेव्हा पासून इकडे कोणी यायची हिम्मत केली नाही. ना पुन्हा भाऊ आले ना त्यांची मुलं .वाडा असाच ओसाड पडला आहे वाट पाहतो की कधी या अमानवी शक्तींपासून मुक्ती मिळेल
    या वाड्या बरोबर आणखी एक व्यक्ती वाडा मुक्त होण्याची वाट पाहत आहे ती म्हणजे निर्मला...समीर बाळा ती निर्मला म्हणजे मीच .

"काय ...म्हणजे तुम्ही निर्मला आजी आहात" समीर

" हो बाळा मीच निर्मला" निर्मला

" पण आजी तू अशी इथे" समीर

"समीर माझं मरण ही  अकाली होत ,मारलं होत मला.माझी राधा तिलाही मारलं या क्रूर लोकांनी. रावसाहेब, भाऊ,जानकीबाईंना हा वाडा सोडून जावा लागला मग कशी मुक्ती  मिळेल माझ्या आत्म्याला .तू जोवर त्या दोघांचा नाश करणार नाही तोवर माझ्या आत्म्यास मुक्ती नाही "..निर्मला

"आजी तुला वचन देतो मी  आपल्या या वाड्याला मुक्त करेल पण हे सगळं मी कसं करू ,अमोलची माळ हरवली आहे त्याच्या जीवाला ही धोका आहे" समीर

" मी मला शक्य आहे तीतकी मदत करेल,पण तुम्ही जास्त वेळ इथे सुरक्षित नाही,दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दोघांची ताकद वाढेल ,त्यात अमोलच्या शरीरावर ताबा मिळवून संग्रामचा आत्मा अधिक शक्तिशाली बनेल मग काहीच करता येणार नाही" निर्मला


  तेवढ्यात दारावर ठकठक होते जनाचा आवज येत असतो.सगळ्यांना वाटत की जनाकाका आले. समीर दार उघणारच की निर्मला त्याला थांबवते . बाहेर खरच जनाकाका असतील की त्या दोन दृष्ट शक्तीची काही चाल असेल समीरला बाहेर काढण्याची??

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel