परिशिष्ट दुसरे
वज्जींच्या अभ्युन्नतीचे सात नियम
भगवान राजगृह येथे गृध्रकूट पर्वतावर राहत होता. त्या वेळी अजातशत्रू राजा वज्जींवर स्वारी करण्याच्या विचारात होता. त्या बाबतीत बुद्ध भगवंताचे मत काय हे जाणण्यासाठी त्याने आपल्या वस्सकार नावाच्या ब्राह्मण अमात्याला भगवंताजवळ पाठविले. त्या अमात्याने अजातशत्रूचा बेत भगवंताला निवेदन केला. तेव्हा आनंद भगवंताला वारा घालीत होता. त्याजकडे वळून भगवान् म्हणाला, ‘‘आनंदा, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असे तू एटकले आहेस काय?’’
आ॰- होय भदन्त, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असे मी एटकले आहे.
भ॰- वज्जी समग्र एकत्र होतात, समग्र उठतात आणि समग्रपणे आपली कामे करतात काय?
आ॰- होय भदन्त, असे मी एटकले आहे.
भ॰- वज्जी आपण न केलेला कायदा केला आहे असे म्हणत नाहीत ना? किंवा केलेल्या कायद्याचा भंग करीत नाहीत ना? वज्जींच्या कायद्याला अनुसरून ते वागत आहेत काय?
आ॰- होय भदन्त, वज्जी कायदेशीरपणे वागतात, असे माझ्या एटकण्यात आले आहे.
भ॰- बुद्ध राजकारणी पुरुषांना वज्जी मान देतात काय? आणि त्यांचा सल्ला स्वीकारतात काय?
आ॰- होय भदन्त, वज्जी वृद्ध राजकारणी पुरुषांचा मान ठेवतात व त्यांचे सांगणे ऐकतात.
भ॰- ते आपल्या राज्यातील विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी करीत नाहीत ना?
आ॰- भदन्त, वज्जींच्या राज्यात स्त्रियांवर जबरदस्ती होत नाही, असे मी ऐकले आहे.
भ॰- वज्जींच्या नगरातील आणि नगराबाहेरील देवस्थानांची ते योग्य जोपासना करतात ना?
आ॰- ते आपल्या देवस्थानांची योग्य काळजी घेतात, असे मी ऐकले आहे.
भ॰- आपल्या राज्यात आलेले अर्हन्त सुखाने राहावे व न आलेल्या अर्हन्तांना राज्यात येण्यास उत्तेजन मिळावे, यास्तव अर्हन्तांना कोणत्याही प्रकारे ताप पोचू नये याबद्दल वज्जी व्यवस्था ठेवतात ना?
आ॰- होय भदन्त, अर्हन्तांना ताप पोचू नये याबद्दल वज्जी दक्षता बाळगतात, असे मी ऐकले आहे.
तेव्हा भगवान वस्सकार अमात्याला म्हणाला, ‘‘हे ब्राह्मणा, एके वेळी मी वैशालीमध्ये राहत असता अभ्युन्नतीचे हे सात नियम वज्जींना उपदेशिले. जोपर्यंत या नियमांना अनुसरून वज्जी वागतील, तोपर्यंत त्यांची उन्नतीच होईल, अवनति होणार नाही.’’
वस्सकार म्हणाला, ‘‘भो गोतम, यांपैकी एका नियमाला जरी वज्जी अनुसरले तरी त्यांची उन्नती होईल, अवनति होणार नाही. तर मग त्यांनी सातही नियम पाळले, तर त्यांची उन्नति होईल हे सांगायलाच नको.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.