ते दोघ पोलीस स्टेशनात पोहोचले. रवी निवृत्त पोलीस निरीक्षक असल्याने त्यांची बऱ्याचं पोलीस ठाण्यात ओळख होती. त्यांना तिथल्या पोलीस निरीक्षकांनी पूर्ण शाश्वती दिली कि, ते प्रियाच्या शोध मोहिमेत त्यांना संपूर्ण सहकार्य करतील. रवी तोपर्यंत पोलीस निरिक्षकाशी बोलत होता. तिथल्या पोलीस निरीक्षकाने  एका हवालदाराला यांची तक्रार नोंदवून घ्यायला सांगितली.

माधव तक्रार नोंदवायला गेला.  तो हवालदारासमोर बसला. हवालदार त्रासलेल्या नजरेने माधवकडे बघत होता. 

"आज कालची पोरं आई बापाला जाम टेन्शन देतात. हो ना भाऊ..??"

शेवटी हवालदारच तो...!! समोर कोण आहे याची तमा न बाळगता बडबडला.

"बर नाव सांगा." हवालदार म्हणाला

"प्रिया माधव जोशी" माधव म्हणाला.

"वय.रंग, आणि बॉडीवर काय निशाण आहे? एक फोटो द्या लेटेस."

"वय तेवीस रंग गोरा आणि डाव्या हाताच्या कोपराजवळ लहानपणी खरचटल्याची खुण आहे. हा घ्या फोटो." माधवने आपल्या पिशवीतून प्रियाचे लग्नासाठी काढलेले फोटो 

" बरं मी काय म्हणतो कुनी लवर वगरे होता का तिचा.. म्हणजे लफडं वगरे. म्हणजे लग्नाला आलेल्या पोरी आपल्या मर्जी शिवाय लग्न ठरवलं कि पळून जातात." हवालदार म्हणाला

 "हे काय बोलताय तुम्ही साहेब? माझी मुलगी अशी नाहीये." माधव रागाने लाल झाले.

"सगळ्या आई बापाला तेच वाटतं. आज कालची पोरी ऐकत नाहीत कुनाच" 

"असं काही नाहीये प्लीज तुम्ही फक्त कम्प्लेंट लिहून घ्या." माधव त्रस्त होऊन म्हणाला. त्याच्या मनाची अवस्था कुणाला कळणार नव्हती.

 "अरे शांत व्हा साहेब. रुटीन इन्क्वायरी आहे. आम्हाला विचराव लागतं...!" हवालदार बोलला.

"हे बघा, आम्ही खूप टेन्शन मध्ये आहोत. कृपया रिपोर्ट लिहा आणि आम्हाला तिला शोधण्यास मदत करा." माधव म्हणाला

 "हो, ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला आमचे काम समजावू नका.... आम्ही करतो काम चला रवी साहेबांना बोलतो मे [पुढचं काय सापडेल ते. कधी बॉडी सापडली तर ओळखपटवायला यायला लागेल.” हवालदाराच्या शेवटच्या वाक्याने माधवच्या पायाखालची जमीन सरकली. तो बाहेर गेला. रवी ही पोलीस निरिक्षकाशी बोलून मागोमाग बाहेर पडला.

"माधव, काळजी करू नकोस. आपल्याला प्रिया लवकर सापडेल. चल घरी जाऊया. वहिनींना तुझी काळजी वाटायला लागली असेल. हिंमत ठेवा." रवीनी त्याला समजावून सांगितले.

आज आठवडा उलटला होता. माधव या वेळात २ वेळा शवागृहात बॉडीची ओळख पटवायला गेला होता. प्रियाबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती. मेघनाची प्रकृती खराब होत चालली होती.

मेघनाने प्रियाच्या हरवण्याचा धसकाच घेतला होता.

एक दिवस होता जेव्हा ती प्रियाच्या लग्नाची तयारी करत होती आणि आज तिच्या घरी परतण्याची वात पाहत होती. रवी ही चिंतेत होता. सागर तर ती हरवल्या दिवसापासून निःशब्द झाला होता. त्याची बालपणीची मैत्रीण हरवली होती. प्रिया हरवल्या दिवसापासून तो कुणाशी ही बोलत नव्हता. त्याची अवस्थाही सर्वांना समजत होती.

आता महिना झाला होता. माधवला शवागृहाची जणू सवयच झाली होती. रवीही हतबल होता. आपल्या परीने तो सगळे प्रयत्न करत होता पण यश येत नव्हते.

मेघनाला शेजार पाजाऱ्यांची खूप बोलणी लावली होती. शेजारी येत जाता विचारू लागले होते.

“तुमच्या मुलीचेच प्रकरण नव्हते ना कुठे...?”

“आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही...!”

“आमच्या सोसायटीची अशी बदनामी करण्याची काय गरज होती?”

आता संपूर्ण कॉलनीत चर्चा होत होती की प्रिया कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली होती. याला आपल्या समाजाची विचारसरणी कारणीभूत आहे.

लग्न जवळ आले होते, त्यामुळे खरच ती आपल्या प्रियकरासोबत गेली असेल असे अंदाज बांधले जाऊ लागले होते.

पोलिसांनी सुद्धा आत्तापर्यंत कोणतीही खबर दिली नव्हती. माधव पोलिसांकडे जाऊन जाऊन निराश आणि हतबल झालं होता. .

महिन्यामागून महिने गेले.

आता तर मेघना आणि माधवच्या डोळ्यातील अश्रूही सुकले होते. आता ते यावर विश्वास ठेवण्यास हि भाग पाडले होते कि, कदाचित प्रिया एखाद्या मुलासोबत पळून गेली असावी. पण त्याचे मन हे स्विकारायला तयार नव्हते. मेघनाला तिने केलेल्या संस्कारांवर आणि शिकवणीवर संपूर्ण विश्वास होता. त्यांच्यावर असा बिकट प्रसंग ओढवला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel