माणसासाठी जितके महत्वाचे अन्न असते तितकेच कपडे हि असतात. जसे चुकीच्या अन्नग्रहणाने अपचन होऊ शकतं तसच चुकीचे कपडे लहान मुलांना घातले तर त्यांना अंगावर चट्टे उठू शकतात. त्यांना अनेक त्वचा रोगांना लहान वयातच सामोरे जावे लागते. मागच्या वेळी मी मुलांच्या खुराकाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांच्या पेहरावाबद्दल लिहित आहे.