गणाधीश, गणांचा अधीपती गजवदन गणपती भाद्रपद चतुर्थीला गणेश प्रतिष्ठापना केली जाते. पुराणकाळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा धार्मिक भावनेतून जोपसण्याचे संस्कार मूलभूत आपल्या भारतीय परंपरेत प्रकर्षाने जाणवतात.
कुठेतरी नतमस्तक होण्यासाठी काही निसर्गनिर्मित तत्व नकळत पाळत असतो. परमेश्वर सगळ्या चरामध्ये भरून व्यापलेला आहे. एक शक्ती जी मानवाने कधीच अमान्य केली नाही करणार ही नाही तरीही या ईश ईश्वरी संकल्पनेला मानवी मन मी, माझ्या, आम्ही, अशा प्रतिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करते मग इथेच कुठेतरी भावना दुखावण्याचे शल्य मानवी मनाला जाणवते
देवाची प्रतिमा ही प्रतिष्ठतेच्या कोंदणात अडकलेली नसावी ती सर्वव्यापी संकल्पना ठरावी तरच हा उत्सव खऱ्या अर्थाने मने जोडणारा ठरेल
विदित असलेल्या संकल्पनेला उत्सवाचे स्वरूप आणल्यामुळे घराघरात पोचलेला हा गणेशोत्सव.
दहा अकरा दिवस प्रत्येकाच्या मनात विराजमान होवून नकळत मानवी संवेदना व्यक्तीनुसार टिपणारा बाप्पा विराजित होतो आणि चैतन्याची स्वप्नाची झालर पसरवून मनामनातही पोहचतो.
बदलत्या परिस्थितीनुसार गणेशउत्सवाचे स्वरूप पद्धती बदलली तरी मूळ संकल्पना भावना श्रद्धा सर्वमानवीय एकच आहेत फक्त त्यातील कंगोरे समाज जाणीवा नुसार
बदलत जातात अगदी नास्तिक व्यक्तीही या दहादिवसातले चैतन्य टिपतोच नतमस्तक होतोच.
गणेशउत्सवात सेवाभावाने काम करणारे आणि प्रतिष्ठा जपणारे ही गणेशभक्त एक होवून एकाच शक्तीने कधी प्रेरित होतात हे त्यांनाही कळत नाही. तो गणाधीश मी ला आपल्या आनंदात कधी बदलवतो हे कळत ही नाही. असा हा गणेशोत्सव मनामनांद्वारे जनाजनात पोहोचला.
परमेश्वरी चैतन्य या दहा दिवसात पृथ्वीवर अवतरते आणि एक उत्साह पसरतो. विशेष म्हणजे उत्सवाच्यामुळे आर्थिक उलाढाली होतात त्यामुळे लक्ष्मीची बरसात करून देणारी
मानवी मनांना संवादाच्या रूपाने जवळ आणते. सर्वभूलोकीचे कल्याण करणारी सृजनशीलता हि या उत्सवाच्या रूपाने वृद्धिंगत होते.
*गणाधीश* सर्व देवतात अग्रमांनाकन प्राप्त देवता या उत्सव काळाव्यतिरिक्त हि तिचे पूजन आपण करत असतोच. त्याला उत्सवाचे रूप देताना प्रथम प्रतिष्ठापना नंतर सामाजिक चळवळीचे रूप देताना हेतू एकच संघभावना, एकत्रीकरण, सशक्त सामाजिकीकरण यामार्फत समजप्रबोधन मग दोन्ही विचारधारा तेवढ्याच महत्वाच्या उत्सव रूपात जास्त फुलणाऱ्या एकाच श्रद्धेने प्रेरित सर्व मानवाचे कल्याण व्हावे उत्तम आरोग्य लाभावे याच प्रार्थनेने श्री गणधीशाची प्रतिष्ठापना करूयात.
!!गणपती बाप्पा मोरया!!
©मधुरा धायगुडे