एकदा एका किड्याचे पोर आपल्या आईला म्हणाले, 'आई, मला आता दिसू लागलं.' तेव्हा परीक्षा पाहण्यासाठी त्याच्यापुढे एक जायफळ ठेवून त्याची आई म्हणाली, 'अरे, हे काय आहे, बरं.' पोर म्हणाले, 'आई हा वाटोळा दगड आहे.' हे ऐकून त्याची आई म्हणाली, 'अरे बाळा, तुला दिसू तर लागलं नाहीच पण अजून वासही समजू लागला नाही.'

तात्पर्य

- माणूस आपले एक व्यंग लपवू पाहतो, पण बर्‍याच वेळा त्याचे दुसरे व्यंगही उघडकीस येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel