( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो. दुसरा एक प्रतिनिधी- "श्री खोचक प्रश्नविचारे" त्याच्या डोक्यावर जोरात रॉड म्हणजे एक लोखंडी सळई मारून फेकतो. तो बाजूला होतो. सळई माईक ला लागून खाली पडते)
आक्रमकः ( सळई हातात घेवून) "नमस्कार. आपण पाहात आहात, 'तकतक सेव्हन लाईव्ह'. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. कार्यक्रमाचा विषय आहे, सळई आणि साई. ओह माय गॉड. मला आता ही सळई लागलीच असती. थोडक्यात वाचलो. हुशश!! आपल्याला काय वाटले, की आम्ही खरेच भांडायला लागलोत? नाही. हा एक प्रयोग होता, तुम्हाला घाबरवण्यासाठी. हे दाखवण्यासाठी की सळई नुसती माणसाला मारली तरी तो किती हैराण होतो आणि...
खोचक: (हसत हसत येतो व आक्रमकचे बोलणे पुढे सुरू ठेवतो) " आणि, एका माणसाच्या तर पोटातून आरपार सळई गेली तरी तो वाचला, आणि आणखी एका माणसाच्या मानेतून सळई आरपार गेली तरी तो वाचला. शहारलात ना? (असे म्हणून तो सळई तलवारीसारखी सप सप हवेत फिरवीतो. सळई डोक्याला लागते. घाबरून सळई बाजूला फेकतो आणि म्हणतो) त्यासाठी आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये बोलावले आहे "डॉ. वृत्तवहिनीकर" यांना. नमस्कार डॉक्टर! "
डॉ. वृत्तवाहिनीकर: "नमस्कार. "
आक्रमकः आणि कोणत्याही घटनेचा सर्वंकष सगळया अंगांनी व बाजूंनी विचार मांडणाऱ्या आमच्या वहिनींचे सॉरी वाहिनीचे आम्ही प्रतिनिधी असल्याने, ज्योतिषीय अंगाने विचार करण्यासाठी आम्ही स्टुडीओत बोलावले आहे, प्रसिद्ध ज्योतिषी "श्री. भविष्यभुंगे" यांना. तसेच आपल्यासोबत आता येत आहेत प्रसिद्ध लोहार " श्री. लोखंड वाकवे"
वाकवे तेथे येतात आणि खोचकाचा माईक खोचकपणे हातात घेवून नव्वद अंशात वाकवतात व तो माईक गरागरा फिरवून कॅमेऱ्यावर भिरकावून देतात. कॅमेरा थोडक्यात फुटता फुटता वाचतो.
आक्रमक : (आक्रमकपणे) : लोहारजी समजले आम्हाला आपुले काम... तुम्ही छान प्रात्यक्षिक करून दाखवले दर्शकांना. बसा. बसा.
खोचक : ( खोचकपणे हसून म्हणतो) " आणि आता आपल्यासमोर आणखी काही पाहूणे आलेत, त्यांचे नाव आहे "टाटा टोटल लोखंड प्रोडक्टस" चे अध्यक्ष श्री जतन टाटा, बा़जीगर चित्रपटाचे कलाकार, शाहृरुख आणि दिलीप ताहील आणि योगासनाचे प्रमुख सामदेव बाबा.
टाटा: नमस्कार.
शाहृरुख: न न न न नमस्कार, स स सगळ्यांना...!
सामदेव बाबा: नमस्कार... (विचित्र आवाज काढतात) हुशं हुशं शु.... हं... हुश्श्श...
आक्रमकः काय झाले बाबा? असा आवाज का?
सामदेवः " व्यायामाचा प्रकार होता तो. "
खोचकः आपल्याला वाटत असेल की येथे शाहरुख आणि दिलीप ताहील चे काय काम आहे, ते आपल्याला लवकरच कळेल... ब्रेकनंतर.
( आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. )
ब्रेकमध्ये जाहीरात येते: " वापरा सुपर टाटा सळया. कितीही वाकवा पण तुटणार नाही. सुपर सळई.... घराचे बांधकाम मजबूत बनवी..... पुढच्या एका कार्यक्रमाची खाली पट्टी सरकत असते....
गायी कुठे गेल्या..... पुण्यात गाय गवत खाते, आणि कुठे जाते?...... गाय गोठ्यात नाही..... गोठा रिकामा..... पुण्यातले गोठे सुन्न..... परग्रहावर दुधाची कमतरता..... चितळे दुध तेथे पोचवण्याची व्यवस्था नसल्याने गायीच चोरून नेल्या..... चितळे बंधूंचा सनसनीखेज खुलासा..... चितळे ना धमकी...... पाचशे कोटी लिटर दुध मंगळावर पाठवा, नाहीतर, गायी पळवू..... अशी इमेल द्वारे मिळाली धमकी..... थोडयाच वेळात पाहा... एक्स्लुजिव्ह रिपोर्ट..... चितळेंना मंगळावरून आली धमकी... पाहा थोड्याच वेळात!
(ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत)
खोचकः : एका माणसाच्या डोक्यातून आरपार सळई गेली, आणि तरीही तो वाचला. काय कारण असू शकतं?
डॉ. वृत्तवाहिनीकर: " डॉक्टराचे प्रयत्न..... "
सामदेव बाबा: : "नाही, रुग्णाची इच्छाशक्ती.. "
वाकवे: "नाही, ही आम्हा कामगारांची कमाल. "
भविष्यभुंगे: (हातातली माळ हवेत भिरभिरवत राहातो आणि विचित्र हातवारे करतो व म्हणतो) "नाही, त्यावेळेस त्या व्यक्तीचा गुरू-शुक्राचा चंद्र-मंगळाशी शी प्रतियोग होवून त्याची दृष्टी राहू केतूं वर पडली.... आणि त्यावेळेस सूर्याने शनीला आणि यमाला थोबाडीत मारली, त्याच वेळेस हनुमान तेथून जात होता त्याने ते भांडण पाहीले आणि ते भांडतात तोपर्यंत त्याने साईबाबांना हा सगळा प्रकार सांगितला, त्यांनी यम भांडणात बिझी असेपर्यंत साईबाबांनी त्या माणसाला वाचवले. "
शाहरुख : "न न न न नाही. तो माणुस हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या ब ब ब ब बाजीगर चित्रपटाचा शेवटचा सी सी सी सीन बघत होता. त्यात दिलीप ताहील माझ्या शरीरात मो मो मो मो मोठ्ठी सळई आरपार घुसवतो. तरीही, मी तशा स्थितीत ती सळई दिलीप च्या शरिरात घु घु घु घु घुसवतो. दिलीप मरतो. मी मात्र जीवंत राहातो. त्यामुळे रुग्णाची मनाची श श श श शक्ती वाढली आणि तो वा वा वा वाचला. "
टाटा: "नाही. आमची सळई चांगल्या क्वालिटीची नसल्याने तो माणूस वाचला. "
सगळे आपापल्या मुद्द्यांवर भांडू लागतात. एकमेकांना सळया मारू लागतात. वाकवे संतापून खोचक चा हात वाकवून टाकतो. खोचक बेशुद्ध पडतो. डॉक्टर सगळ्या सळया एकत्र करून बांधतात व त्या चॅनेलचे एडीटर " भजत कुर्मा" यांना देतात. ते अदालत सोडून मध्येच धावत येतात. शेवटी तेथे एक फोन येतो.
" नमस्कार, मी बिरबल बोलतोय. तुम्ही सगळे चूक आहात. एका थंड पाण्याच्या तळ्यात उभे राहून दूर असलेल्या छोट्या दिव्यामुळे रात्रभर एक माणुस पाण्यात राहू शकला, हा युक्तीवाद जसा मी खोडून काढला तसेच मला यावेळेस असे सांगावेसे वाटते की, सगळ्या गोष्टींचा एकत्रीत परिणाम झाल्याने तो माणूस वाचला. आता सगळे जण भांडू नका आणि आपापल्या घरी जा. "

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.