आर्थर स्चिमेर


एक पादरी- विश्वासू असायला हवा. पण त्याने फक्त एक नाही तर आपल्या दोन बायकांचा खून केला होता. आणि त्याने सर्व गु्न्हे असे केले की अगदी आरामात तो सगळ्या आरोपांपासून वाचला. २०१३ मध्ये ६४ वर्षांचा  स्चिर्मेर त्याची दुसरी बायको बेट्टी हीच्या २००८ मध्ये खूनाच्या आरोपाच पकडला गेला. तेव्हा हे ही कळलं की जसा बेट्टीचा खून झाला होता तसाच १९९९ साली त्याची पहिली बायको ज्वेल हीचा ही खून झाला होता. स्चिर्मेरच्या मते त्याची ३१ वर्षांची बायको बेट्टी ही व्हॅक्यूम क्लिनरने घर साफताना जिन्यावरून पडून मेली. त्याने सांगितलं की ज्वेल त्याला जिन्याखाली सापडली आणि व्हॅक्यूम क्लिनरची वायर तिच्या पायाला गुंडाळली गेलेली दिसली. आणि तपास केल्यावर समजलं की १९९९ सालची ही घटना आणि २००८ मध्ये बेट्टीचा मृत्यू यात साम्य होतं. स्चिर्मेरने बेट्टीला क्रोव्बारने मारलं होतं आणि नंतर तिला आपल्या गाडीत बसवून ही एक दुर्घटना असल्याचं भासवलं होतं. त्याच्या वकिलाच्या बेट्टीच्या मृत्यूच्या आधी स्चिर्मेरचे दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध होतेया खुलास्याने ही केस अजुनंच गुंतागुंतीची झाली.

 

तपासकर्त्यांना अनेक असे पुरावे सापडले ज्यातून पादरी हा खरोखर एक खुनी असल्याचं सिद्ध होत होतं आणि २०१४ मध्ये त्याने आपल्या पहिल्या बायकोच्या मृत्यूचा आरोप मान्य केल्याने आधीपासुनंच चालु असणाऱ्या शिक्षेत अजुन २० - ४० वर्षांची भर पडली.

 



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel