एक प्रश्न आजही आहे. मंदाकिनी आकाशगंगेत ताऱ्यांचे ग्रह तर आहेत, परंतु किती ग्रहांवर जीवन असू शकते? आणि जर जीवन असले तर किती ग्रहांवर मानवासारखे बुद्धिमान जीवन आहे? परग्रहावरील साजीवांशी संपर्क करण्याची कल्पना आपला समाज आणि आपल्या लेखकांना नेहमीच रोमांचित करत आली आहे. वर्तमान पत्रात किंवा टीव्ही वर यु.एफ.ओ. किंवा अनोळखी उडती तबकडी दिसल्याच्या बातम्या तर आता सामान्य झाल्या आहेत. बॉलीवूड पासून हॉलीवूड च्या अनेक चित्रपटांतून परग्रहावरील जीव पृथ्वीवर आलेले दाखवले आहेत, मग ते इंडीपेन्डेंस डेचे आक्रांता परग्रही असोत, ’एम आई बीचे आंतकी परग्रही, ’इटीके मैत्रीपूर्ण परग्रही किंवा हिन्दी च्या कोई मील गयामधला जादू !इह. जी. वेल्स ची कादंबरी "वार ऑफ द वर्ल्डस" मध्ये पृथ्वीवर मंगळ ग्राहवासियांचा हल्ला दाखवलेला आहे. ३० ऑक्टोबर १९३८ ला सी बी एस रेडीओ चा समालोचक आर्सन वेल्लेस ने या कादंबरीच्या कथेवरून हॉलोवीन च्या निमित्ताने गंमत करण्याचे ठरवले. त्याने थोड्या थोड्या वेळाने रेडियो वर संगीत थांबवून मध्ये मध्ये पृथ्वीवर मंगळ वासीयांच्या हल्ल्याच्या बातम्या देणे सुरु केले. प्रत्येक बातमीसत्रात मानवांचा पराभव आणि मानवी संस्कृतीच्या क्रमशः पतनाच्या बातम्या होत्या. प्रत्यक्षात ही केवळ एक गम्मत होती, परंतु परग्रहावरील जीवनावर आपला विश्वास एवढा दृढ आहे की लाखो अमेरिकी नागरिक हे ऐकून घाबरून गेले होते की मंगल ग्रहाची यंत्रे न्यू जर्सी इथल्या ग्रूवर मिल मध्ये उतरली आहेत आणि शहरांना उद्ध्वस्त करणारी किरणे सोडत आहेत आणि सोबतच संपूर्ण जग आपल्या ताब्यात घेत आहेत. बातमी सत्रानी नंतर ही बातमी दिली की लाखो लोकांनी आपली घरे सोडून जागा खाली केल्या होत्या, काही प्रत्यक्षदर्शींना तर विषारी वायू जाणवला होता आणि काहीना चमचमता प्रकाश दिसला होता.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel