सुरुढभक्ती एक । श्रीपादाचा सेवक । होता जातीचा रजक । नित्य एकभावें वंदी ॥१॥

तो नमूनी त्या गुरुवर्या । वस्त्रें धूतां भूपैश्वर्या । देखे इच्छी स्वयें तथा । गुरुराया तें जाणत ॥२॥

त्या बोलती तूं भक्ता । सुखें राज्य करीं आतां । पुढें देऊं कीं वद आता । तो म्हणे झालो वृद्ध ॥३॥

पुढें मला द्या यौवनीं । असो तुझी स्मृती मनीं । गुरु बोले म्लेंच्छसदनीं । राजा होसी अंती भेटूं ॥४॥

इति श्री०प०प०वा०स०वि०स० रजकवरप्रदानं नाम नवमो०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel