माहुली गडाच्या पायथ्याशी दाखल होताच एक दुचाकी स्वार आमच्या जवळ आला. रात्रीच्या काळोखात त्या गृहस्थाचा चेहरा ही नीट दिसत नव्हता,ओळख करून देताना म्हणाला 'मी ठाकरे’(नाव जरी ठाकरे असलं तरी स्वभाव मात्र तसा नव्हता बर ) 'इथेच माझ छोटस हॉटेल आहे. जेवण, नाश्ता,पाणी काहीही लागल तरी कधीही सांगा.व्हेज , नॉन-व्हेज , ओम्लेट सर्व काही मिळेल (ओम्लेट व्हेज कि नॉन - व्हेज हा प्रश्न त्याला ही पडला असावा).

अगदी रात्री वाटेत काही लागलं, कुठं चुकलात तरी कधीही हक्काने फोन करा’ हे आपुलकीने सांगायला ही तो विसरला नाही. गड चढताना लागणारी वाट अगदी नम्रपणे दाखवून तो आपल्या मार्गी लागला.

किल्ले माहुलीवर पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं. गडसंवर्धनाला थोडा हातभार व गडफेरीचा आस्वाद घेण्यासाठी आम्हीही आसनगाव ,शहापूर नजीकच्या या गडावर जाण्याची मोहीम ठरवली. गडस्वारीसाठी नेहमी सोबत असणाऱ्या आमच्यातल्या काही जणांनी ऎनवेळेस टांग दिली तरीही आम्ही आमचा बेत काही बदलला नाही.गडावर पोहचायला उशीर झाल्यामुळे आम्हाला काही सह्याद्री प्रतिष्ठानच्या त्या सत्कार्यात प्रत्यक्षरीत्या सहभागी होता आलं नसलं, तरी आमच्या परीने आम्ही जमेल तशी स्वच्छता मोहीम राबवली .

अंधाराचं साम्राज्य चहुबाजूला पसरलं होत. गडाखाली शंकराचं सुंदर मंदिर आहे, तिथे थोडा विसावा घेत गड स्वारीला सुरवात केली.वाटेत इतरही काही मंदिर लागली.थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही वाट चुकल्याचं लक्षात आलं .सह्याद्री प्रतिष्ठानच्या काही व्यक्तींशी फोनवर संवाद साधून गडावर जाण्याची माहिती मिळवली अन आम्ही पुन्हा त्याच वाटेन माघारी फिरलो ,पुढच्या टप्प्यावर आम्हीं एका कोरड्या ओढ्यापाशी येउन पोहचलो जो आम्हाला वाटेत सुरवातीला लागलाच नव्हता. आमच्यातील काही जण त्याला 'चकवा' समजू लागली ,मी मात्र त्याला 'रात्रीस खेळ चाले' म्हणत पुढच्या वाटेस लागलो.

इथून पुढे खऱ्याखुऱ्या गड चढाईला सुरवात झाली असं म्हणता यॆईल. सोबतीस टपोऱ्या चांदण्यातली रात्र अन वायुलहरी, रातकिड्यांची अंगाई होतीच. शारीरीक तयारी नसली तरीही मानसिक बळाच्या जोरावर आमच्यातील एकजण गडफेरीसाठी आला होता. त्याला पावलागणिक लागणाऱ्या थकव्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणी थांबवं लागलं, त्यामुळे आमची पुरती दमछाक झाली हे मात्र खरं... पुढे हाच हरहुन्नरी मित्र शंकर महादेवनची 'कोई तो मिल तो मुझे ऐसा लगता है... ' अशी एका दमातली गाणी ऐकवताना मात्र दमला नाही (थट्टा मस्करीचा भाग असल्यामुळे दमवणाऱ्याने दमानं घ्यावं..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel