पहिली माझी ओवी
पहिला माझा नेम
तुळशीखाली राम
पोथी वाची ॥१॥
पहिली माझी ओवी
पहिल्यापासून
आली रथात बसून
अंबाबाई ॥२॥
पहिली माझी ओवी
वहिला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा
राजबिंडा ॥३॥
दुसरी माझी ओवी
दूध नाही कोठे
ध्यानी मनी भेटे
पांडुरंग ॥४॥
तिसरी माझी ओवी
तीन त्रिकुटाच्या परी
ब्रह्मविष्णुशिवावरी
बिल्वपत्र ॥५॥
चौथी माझी ओवी
चवथीच्या चंद्रा
मखमली गेंदा
रंग बहू ॥६॥
पाचवी माझी ओवी
पाच पांडवांना
पाठीच्या भावंडांना
राज्य येवो ॥७॥
सहावी माझी ओवी
सहावीची छाया पडे
तुझ्या गर्भ तेज चढे
उषाताई ॥८॥
सातवी माझी ओवी
सात सप्तर्षी
कौसल्येच्या कुशी
रामचंद्र ॥९॥
आठवी माझी ओवी
आठ आटेपाटे
देवाजीचे ओटे
रंगविले ॥१०॥
नववी माझी ओवी
नऊ खंडी गहू
फेरीला किती घेऊ
देवाजीच्या ॥११॥
दहावी माझी ओवी
दशांगुळे मी गाईन
लक्ष्मी होईन
संसारात ॥१२॥
अकरावी माझी ओवी
अकरा हे गं गडू
जेवला बुंदीलाडू
गोपूबाळ ॥१३॥
बारावी माझी ओवी
बारा आदितवार
सूर्याला नमस्कार
घालू गेले ॥१४॥
तेरावी माझी ओवी
तेरा तेरियाची
पालखी हिरियाची
देवाजींची ॥१५॥
चौदावी माझी ओवी
चौदा चौकड्यांची
पालखी हलकड्यांची
देवाजींची ॥१६॥
पंधरावी माझी ओवी
पंधरा की गं काड्या
रंगविल्या साड्या
सीताबाईच्या ॥१७॥
सोळावी माझी ओवी
सोळा कोशिंबिरी
आज आहे माझ्या घरी
भाऊबीज ॥१८॥
सतरावी माझी ओवी
सतरा धंदे करु नये
ऐकावे माझे सये
हितासाठी ॥१९॥
अठरावी माझी ओवी
अठरा धान्यांचे कडेबोळे
शेजीशी बर्या बोले
वाग बाई ॥२०॥
एकोणिसावी माझी ओवी
एकूण एक करा
संसारी नित्य स्मरा
गणेराया ॥२१॥
विसावी माझी ओवी
विसावा माहेराला
आईच्या आसर्याला
सुखशांती ॥२२॥
एकविसावी माझी ओवी
एकवीस दुर्वा आणा
वाहा देव गजानना
लंबोदरा ॥२३॥
पहिली माझी ओवी
जगाच्या पालका
रक्षिता बालका
देवराया ॥२४॥
दुसरी माझी ओवी
दुजा नको भाव
तरीच पावे देव
संसारात ॥२५॥
तिसरी माझी ओवी
भीकबाळे तीन मोती
संसारी रमापती
आठवावा ॥२६॥
चौथी माझी ओवी
चांडाळचौकडी
त्यांची कधी गडी
करु नये ॥२७॥
पाचवी माझी ओवी
आपुली पाच बोटे
त्यांनी कधी कर्म खोटे
करु नये ॥२८॥
सहावी माझी ओवी
सहा महाशास्त्रे
निर्मिली विचित्रे
ऋषिमुनींनी ॥२९॥
सातवी माझी ओवी
साता आठवड्याचे वार
आहे हा संसार
संकटाचा ॥३०॥
आठवी माझी ओवी
आठवा देवकीचा
सखा द्रौपदीचा
कृष्णनाथ ॥३१॥
नववी माझी ओवी
आहेत नवग्रह
संसारी आग्रह
धरु नये ॥३२॥
दहावी माझी ओवी
आहेत दहा दिशा
चंद्रामुळे निशा
शोभतसे ॥३३॥
अकरावी माझी ओवी
अकरावा अवतार
मानू ज्ञानेश्वर
आळंदीचे ॥३४॥
अकरावी माझी ओवी
अक्राळ आसूर
नखरा न कर
उषाताई ॥३५॥
बारावी माझी ओवी
संसारी बारा वाटा
पुण्याचा करी साठा
क्षणोक्षणी ॥३६॥
तेरावी माझी ओवी
तीन तेरा होती
जरी न जपती
जगी लोक ॥३७॥
चौदावी माझी ओवी
चौदा चौकड्यांचा
नाश झाला रावणाचा
गर्व होता ॥३८॥
पंधरावी माझी ओवी
पंधरा दिवसांचा पक्ष
संसारात दक्ष
राही सदा ॥३९॥
सोळावी माझी ओवी
सोळा चंद्रकला
पतीच्या ग कला
सांभाळावे ॥४०॥
सतरावी माझी ओवी
सतरावीचे दूध
योगी पीती शुद्ध
समाधीत ॥४१॥
अठरावी माझी ओवी
अठरा पुराणे
लिहिली व्यासाने
लोकांसाठी ॥४२॥
अठरावी माझी ओवी
अठरापगड जाती
गावात नांदती
आनंदाने ॥४३॥
एकोणिसावी माझ ओवी
एकोणीस वर्षे
नेली मी गं हर्षे
संसारात ॥४४॥
विसावी माझी ओवी
विसाण पाण्याचे
निशाण रामाचे
उभे केले ॥४५॥
विसावी माझी ओवी
वीस मणी खंडी
नास्तिक पाखंडी
होऊ नये ॥४६॥
एकविसावी माझी ओवी
एकवीस मोदक
तेणे सिद्धीविनायक
सुप्रसन्न ॥४७॥
पहिली माझी ओवी
पहिला माझा नेम
गायिले निधान
पांडुरंग ॥४८॥
दुसरी माझी ओवी
दुजे नाही कोठे
पाहीन मी विटे
पांडुरंग ॥४९॥
तिसरी माझी ओवी
त्रिगुणा शरीरा
गाईन सोयरा
पांडुरंग ॥५०॥
चवथी माझी ओवी
चतुर्भुज मूर्ती
गाईला श्रीपती
पांडुरंग ॥५१॥
पाचवी माझी ओवी
पाची पराक्रम
गाईन आत्माराम
पांडुरंग ॥५२॥
सहावी माझी ओवी
सहा मास लोटले
साक्षात भेटले
पांडुरंग ॥५३॥
सातवी माझी ओवी
सप्त द्वीपांठायी
लक्ष्य तुझ्या पायी
पांडुरंग ॥५४॥
आठवी माझी ओवी
अठ्ठावीस युगे
विटेवरी उभे
पांडुरंग ॥५५॥
नववी माझी ओवी
नवविधा भक्ती
गाईन श्रीपती
पांडुरंग ॥५६॥
दहावी माझी ओवी
दाही अवतारा
घाली संवसारा
तुका म्हणे ॥५७॥
चौथी माझी ओवी
चौसंगे दाटली
प्रसंगे भेटली
मायबाई ॥५८॥
बारावी माझी ओवी
बारा वाटा गं संसारी
आठवा कंसारी
भय नाही ॥५९॥
तिसरी माझी ओवी
तीन पावली वामन
व्यापितो त्रिभुवन
देवांसाठी ॥६०॥
सहावी माझी ओवी
सहा हे गं ऋतू
वसंत परंतु
त्यांचा राजा ॥६१॥
सहावी माझी ओवी
सहा तोंडे षडानना
नमू देवा गजानना
त्याच्या भावा ॥६२॥
एकटी दुसरी
तिसरीला चिंधी
चवथीला बिंदी
उषाताईला ॥६३॥
एकटी दुसरी
तिसरीला माळ
चवथीला चंद्रहार
घालू गेला ॥६४॥
पहिली माझी ओवी
पहिले वहिले
भक्ती वंदिले
मायबाप ॥६५॥
पहिली माझी ओवी
पहिली कामाला
स्मरते रामाला
अंतरंगी ॥६६॥
पहिली माझी ओवी
पहिला गं पुत्र
व्हावा संसारात
म्हणतात ॥६७॥
दहावी माझी ओवी
दश इंद्रियांचा
अकराव्या मनाचा
खेळ सारा ॥६८॥
बारावी माझी ओवी
बारा अक्षरांचा मंत्र
ध्रुव बाळाने पवित्र
जप केला ॥६९॥
सरसकट माझी ओवी
सरसकट सहा देवा
आरती महादेवा
कापुराची ॥७०॥
पहिली माझी ओवी
सदा एकीचे पालन
घरी बेकी होता जाण
राज्य गेले ॥७१॥
दुसरी माझी ओवी
दुहीला मिळता वाव
परक्यांनी डाव
साधियेला ॥७२॥
तिसरी माझी ओवी
लाभ तिसर्याचा
दोघांच्या भांडणाचा
शेवट हा ॥७३॥
चवथी माझी ओवी
चारांचे ऐकावे
हट्टाला सोडावे
संसारात ॥७४॥
ओवीला आरंभ केला
पेटीला कप्पे कप्पे
लिहिणार माझे सख्खे
भाईराया ॥७५॥
ओवीला आरंभ केला
पेटीला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा
भाईरायाचा ॥७६॥
पहिला माझा नेम
तुळशीखाली राम
पोथी वाची ॥१॥
पहिली माझी ओवी
पहिल्यापासून
आली रथात बसून
अंबाबाई ॥२॥
पहिली माझी ओवी
वहिला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा
राजबिंडा ॥३॥
दुसरी माझी ओवी
दूध नाही कोठे
ध्यानी मनी भेटे
पांडुरंग ॥४॥
तिसरी माझी ओवी
तीन त्रिकुटाच्या परी
ब्रह्मविष्णुशिवावरी
बिल्वपत्र ॥५॥
चौथी माझी ओवी
चवथीच्या चंद्रा
मखमली गेंदा
रंग बहू ॥६॥
पाचवी माझी ओवी
पाच पांडवांना
पाठीच्या भावंडांना
राज्य येवो ॥७॥
सहावी माझी ओवी
सहावीची छाया पडे
तुझ्या गर्भ तेज चढे
उषाताई ॥८॥
सातवी माझी ओवी
सात सप्तर्षी
कौसल्येच्या कुशी
रामचंद्र ॥९॥
आठवी माझी ओवी
आठ आटेपाटे
देवाजीचे ओटे
रंगविले ॥१०॥
नववी माझी ओवी
नऊ खंडी गहू
फेरीला किती घेऊ
देवाजीच्या ॥११॥
दहावी माझी ओवी
दशांगुळे मी गाईन
लक्ष्मी होईन
संसारात ॥१२॥
अकरावी माझी ओवी
अकरा हे गं गडू
जेवला बुंदीलाडू
गोपूबाळ ॥१३॥
बारावी माझी ओवी
बारा आदितवार
सूर्याला नमस्कार
घालू गेले ॥१४॥
तेरावी माझी ओवी
तेरा तेरियाची
पालखी हिरियाची
देवाजींची ॥१५॥
चौदावी माझी ओवी
चौदा चौकड्यांची
पालखी हलकड्यांची
देवाजींची ॥१६॥
पंधरावी माझी ओवी
पंधरा की गं काड्या
रंगविल्या साड्या
सीताबाईच्या ॥१७॥
सोळावी माझी ओवी
सोळा कोशिंबिरी
आज आहे माझ्या घरी
भाऊबीज ॥१८॥
सतरावी माझी ओवी
सतरा धंदे करु नये
ऐकावे माझे सये
हितासाठी ॥१९॥
अठरावी माझी ओवी
अठरा धान्यांचे कडेबोळे
शेजीशी बर्या बोले
वाग बाई ॥२०॥
एकोणिसावी माझी ओवी
एकूण एक करा
संसारी नित्य स्मरा
गणेराया ॥२१॥
विसावी माझी ओवी
विसावा माहेराला
आईच्या आसर्याला
सुखशांती ॥२२॥
एकविसावी माझी ओवी
एकवीस दुर्वा आणा
वाहा देव गजानना
लंबोदरा ॥२३॥
पहिली माझी ओवी
जगाच्या पालका
रक्षिता बालका
देवराया ॥२४॥
दुसरी माझी ओवी
दुजा नको भाव
तरीच पावे देव
संसारात ॥२५॥
तिसरी माझी ओवी
भीकबाळे तीन मोती
संसारी रमापती
आठवावा ॥२६॥
चौथी माझी ओवी
चांडाळचौकडी
त्यांची कधी गडी
करु नये ॥२७॥
पाचवी माझी ओवी
आपुली पाच बोटे
त्यांनी कधी कर्म खोटे
करु नये ॥२८॥
सहावी माझी ओवी
सहा महाशास्त्रे
निर्मिली विचित्रे
ऋषिमुनींनी ॥२९॥
सातवी माझी ओवी
साता आठवड्याचे वार
आहे हा संसार
संकटाचा ॥३०॥
आठवी माझी ओवी
आठवा देवकीचा
सखा द्रौपदीचा
कृष्णनाथ ॥३१॥
नववी माझी ओवी
आहेत नवग्रह
संसारी आग्रह
धरु नये ॥३२॥
दहावी माझी ओवी
आहेत दहा दिशा
चंद्रामुळे निशा
शोभतसे ॥३३॥
अकरावी माझी ओवी
अकरावा अवतार
मानू ज्ञानेश्वर
आळंदीचे ॥३४॥
अकरावी माझी ओवी
अक्राळ आसूर
नखरा न कर
उषाताई ॥३५॥
बारावी माझी ओवी
संसारी बारा वाटा
पुण्याचा करी साठा
क्षणोक्षणी ॥३६॥
तेरावी माझी ओवी
तीन तेरा होती
जरी न जपती
जगी लोक ॥३७॥
चौदावी माझी ओवी
चौदा चौकड्यांचा
नाश झाला रावणाचा
गर्व होता ॥३८॥
पंधरावी माझी ओवी
पंधरा दिवसांचा पक्ष
संसारात दक्ष
राही सदा ॥३९॥
सोळावी माझी ओवी
सोळा चंद्रकला
पतीच्या ग कला
सांभाळावे ॥४०॥
सतरावी माझी ओवी
सतरावीचे दूध
योगी पीती शुद्ध
समाधीत ॥४१॥
अठरावी माझी ओवी
अठरा पुराणे
लिहिली व्यासाने
लोकांसाठी ॥४२॥
अठरावी माझी ओवी
अठरापगड जाती
गावात नांदती
आनंदाने ॥४३॥
एकोणिसावी माझ ओवी
एकोणीस वर्षे
नेली मी गं हर्षे
संसारात ॥४४॥
विसावी माझी ओवी
विसाण पाण्याचे
निशाण रामाचे
उभे केले ॥४५॥
विसावी माझी ओवी
वीस मणी खंडी
नास्तिक पाखंडी
होऊ नये ॥४६॥
एकविसावी माझी ओवी
एकवीस मोदक
तेणे सिद्धीविनायक
सुप्रसन्न ॥४७॥
पहिली माझी ओवी
पहिला माझा नेम
गायिले निधान
पांडुरंग ॥४८॥
दुसरी माझी ओवी
दुजे नाही कोठे
पाहीन मी विटे
पांडुरंग ॥४९॥
तिसरी माझी ओवी
त्रिगुणा शरीरा
गाईन सोयरा
पांडुरंग ॥५०॥
चवथी माझी ओवी
चतुर्भुज मूर्ती
गाईला श्रीपती
पांडुरंग ॥५१॥
पाचवी माझी ओवी
पाची पराक्रम
गाईन आत्माराम
पांडुरंग ॥५२॥
सहावी माझी ओवी
सहा मास लोटले
साक्षात भेटले
पांडुरंग ॥५३॥
सातवी माझी ओवी
सप्त द्वीपांठायी
लक्ष्य तुझ्या पायी
पांडुरंग ॥५४॥
आठवी माझी ओवी
अठ्ठावीस युगे
विटेवरी उभे
पांडुरंग ॥५५॥
नववी माझी ओवी
नवविधा भक्ती
गाईन श्रीपती
पांडुरंग ॥५६॥
दहावी माझी ओवी
दाही अवतारा
घाली संवसारा
तुका म्हणे ॥५७॥
चौथी माझी ओवी
चौसंगे दाटली
प्रसंगे भेटली
मायबाई ॥५८॥
बारावी माझी ओवी
बारा वाटा गं संसारी
आठवा कंसारी
भय नाही ॥५९॥
तिसरी माझी ओवी
तीन पावली वामन
व्यापितो त्रिभुवन
देवांसाठी ॥६०॥
सहावी माझी ओवी
सहा हे गं ऋतू
वसंत परंतु
त्यांचा राजा ॥६१॥
सहावी माझी ओवी
सहा तोंडे षडानना
नमू देवा गजानना
त्याच्या भावा ॥६२॥
एकटी दुसरी
तिसरीला चिंधी
चवथीला बिंदी
उषाताईला ॥६३॥
एकटी दुसरी
तिसरीला माळ
चवथीला चंद्रहार
घालू गेला ॥६४॥
पहिली माझी ओवी
पहिले वहिले
भक्ती वंदिले
मायबाप ॥६५॥
पहिली माझी ओवी
पहिली कामाला
स्मरते रामाला
अंतरंगी ॥६६॥
पहिली माझी ओवी
पहिला गं पुत्र
व्हावा संसारात
म्हणतात ॥६७॥
दहावी माझी ओवी
दश इंद्रियांचा
अकराव्या मनाचा
खेळ सारा ॥६८॥
बारावी माझी ओवी
बारा अक्षरांचा मंत्र
ध्रुव बाळाने पवित्र
जप केला ॥६९॥
सरसकट माझी ओवी
सरसकट सहा देवा
आरती महादेवा
कापुराची ॥७०॥
पहिली माझी ओवी
सदा एकीचे पालन
घरी बेकी होता जाण
राज्य गेले ॥७१॥
दुसरी माझी ओवी
दुहीला मिळता वाव
परक्यांनी डाव
साधियेला ॥७२॥
तिसरी माझी ओवी
लाभ तिसर्याचा
दोघांच्या भांडणाचा
शेवट हा ॥७३॥
चवथी माझी ओवी
चारांचे ऐकावे
हट्टाला सोडावे
संसारात ॥७४॥
ओवीला आरंभ केला
पेटीला कप्पे कप्पे
लिहिणार माझे सख्खे
भाईराया ॥७५॥
ओवीला आरंभ केला
पेटीला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा
भाईरायाचा ॥७६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.