काही लोकं ही बाभळीसारखी कुरूप असतात...कुरूप विचारांची ... कुरूप मानसिकतेची ... दिवसागणीक आणखी वठणारी....शापीत बाभळीसारखीच दुस-यांचं जिणं शापीत करू पहाणारी.... अंगावर बोट बोट लांबीचे काटे गुंडाळून काळ्या अंतरंगाने एकटीच पडलेली .... पुन्हा नव्या धामुक्यांच्या अंकुरण्याने नव्या बाभूळ रोपांना जन्म देणारी .... बाभळीचे गुणधर्म लेऊन जन्माला आलेली रोपटी देखील काटेरी... ओरबाडणारी ....
ज्या बांधावर उगवली त्या बांधावर काटे पसरवणारी.... पायात खोलवर आपला काटा रुतवून आसूरी आनंदाने मोहरून येणारी...रक्ताच्या थेंबाची आस लागलेली....
दुख: कुरवाळायची सवय लागलेली...सतत एखाद्या issue साठी झपाटलेली....लपून छपून चोरून ऐकणारी.... ध चा मा करणारी...ऐकणारा भेटला की त्याच्या डोक्यात काटे पेरणारी....अशी मंडळी अवतीभवतीने असली की आयुष्य उत्सव व्हायच्या ऐवजी काटा रुतून खोलवर जिभाळी लागलेली वेदना व्हायला वेळ लागत नाही..... वेळीच उपाय नाही केला तर काट्याचा नायटा आणि मग कुरूप व्हायला सुरूवात होते...मग एक वेदना बाभळीसारखी वठायला लागते....
रघू व्यवहारे
औरंगाबाद

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.