एक रिकामा घोडा व पाठीवर लादलेले गाढव असे दोघे रस्त्याने चालत होते. त्यांच्या मागून त्यांचा मालक त्यांना हाकीत होता. चालता चालता ओझ्याने गाढव अगदी खचून गेले व ते घोड्यास म्हणाले, मित्रा, मी फार दमलो रे. माझ्या पाठीवरचं थोडं ओझं जर तू घेशील, तर माझ्या वर उपकार होतील.' त्या कठोर मनाच्या घोड्याने गाढवाची ही विनंती मान्य केली नाही. पुढे काही वेळाने ते गाढव रस्त्यातच ठेच लागून पडले व मरण पावले. मग त्याच्या मालकाने त्याच्या पाठीवरचे ओझे व त्याचे प्रेत घोड्याच्या पाठीवर लादले व त्याला हाकीत आपल्या घराकडे निघाला.

तात्पर्य

- व्यवहारात माणसाने परस्परांना मदत केली नाही तर व्यवहार चालणार नाही. इतकेच नव्हे तर प्रसंगी एखाद्यास मदत करण्याचे टाळले असता मागाहून पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel