देवे भक्तालागी उपचार मांडिले । शांति सुखासनी माने बैसविले । धरुनि तन्मयाची छ्त्रे गौरविले । ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले ॥१॥

सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी । माझी ऎश्र्वर्य हे सर्वांगी लेऊनी । मिरवा भूषणे ही यश कीर्ती दोन्ही । माझी आयुधे ही देतो संतोषोनी वो ॥२॥

शांती विरक्ति हे मूर्तिमंत दया । क्षमा नित्यानंदे तुम्हा अर्पिलिया । अखंड नैराश्यता सेवे तुमचिया । ठेविली निकट वासे न वजती आन ठाय वो ॥३॥

निळा म्हणॆ ऎसा भक्तांचा समुदाये । देवे आनंदविला प्रितीच्या उत्साहे । म्हणे निर्भय असा जवळिच मी आहे । भोगा सुख माझे निजाचे अद्वय वो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel