नाहीं एसें गांठी पुण्य । जेणें घडे दरुषण करुनी चिंतन । काळ सारुं या रीती ॥१॥

नाचेन या संतांपुढें । लाज सांडुनी उघडें । सेवीन तो कोडें । उच्छिष्ठाचा प्रसाद ॥२॥

घालूनियां कास । होइन मोकळा उदास । करुं ब्रह्मरस । सेवन हा आनंदें ॥३॥

आला तोचि घ्यावा । होइल संचिताचा ठेवा । पुढिलाचा हेवा । तुका म्हणे अनुचित ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel