विक्रमार्क वडाच्या झाडाजवळ गेला. शाढा- बरून ते लटकणारे प्रेत काढून खांचावर टाकले आणि नंतर पुन्हां स्मशानाची वाट धरली. नियमाप्रमाणे शांतील वेताळ बोल लागला. म्हणाला "राजा! इतक्या दिव- सांच्या परिचयामुळे आपण मित्र बनलो आहोत. आतां सांग बरे, तुला तो स्मशानांतील भिकारी मोठा वाटतो की मी मोठा वाटतो! अशा प्रकारच्या शंका कुशंका मनुष्याच्या मनांत उठतात. अशाच प्रकारची शंका विध्यदेशाच्या सेनापतींची मुलगी लावली हिच्या मनांत थैमान पालीत होती. ती गोष्ट तुला सांगतो." असे सांगून वेताळाने गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. विध्यदेशाच्या राजाच्या दरबारी श्रीमंत नांयाचा एक सेनापति होता. विध्यदेशाच्या एका भागांत चोरी लूटमार फार होत असे. सेनापति श्रीमंताने आपल्या सैन्यानिशीं कित्येक वेळा त्या प्रदेशाची पाहाणी केली. रात्रंदिवस चोरांचा सुगावा लावण्यासाठी झटत राहिला. पण कशाचाच कोठे पत्ता लागला नाही. ही काळजी त्याच्या मागे होतीच आणि आतां दुसरी काळजी म्हणजे त्याच्या मुलीच्या लयाची काळजी त्याला वाढू लागली. रत्नावली फार सुंदर व बुद्धिमान होती. म्हणून तिच्याशी लम करण्याच्या इच्छेनें कित्येक युवक येत असत. त्यांत राजसिंह नावाचा एक तरुणहि होता. परंतु तो रखावलीशी लम परण्याच्या हेतूने श्रीमंताकडे आल्य नव्हता. तो आला होता श्रीमंताच्या कडून काही मदत मागण्यासाठी. कारण त्याचा किला होता चोरांच्या भागांत. चोरांनी अद्याप त्याच्या किल्ल्यावर हल्ला केला नव्हता, तरी वेळी सावध झालेले बरें आणि जमल्यास चोरांना पकडून राजाच्या स्वाधीन करावे असा विचार करून तो श्रीमंताकडे आला होता. राजसिंह सेनापतीला म्हणाला-"महा- राज, आपण आपली सेना माझ्या मदतीला दिलीत तर मी तिचा सर्व खर्च देईन. चोरांना पकडण्याच्या कामी तिचा उपयोग होईल." सेनापतीने अद्याप काय करावे याचा विचार केला नव्हता. या अवधीतच रखावली राजसिंहाच्या नजरेस पडली. तिला पाहतांच तिच्याशी लग्न करावेसें त्याला वाटले. त्याने सेनापतीला तसे स्पष्ट विचारलेहि. सेनापतीला तो तरुण पसंत पडला. तो चांगल्या कुळांतला होता. तसेच शूर, सुंदर व साहसी होता. शिवाय सेनापतीला वाटले की या चोरटेन्यांच्या प्रदेशांत आपला कोणी संबंधी असेल तर बचक राहील लोकांवर, परंतु आपल्या मुलीला त्या उटेयांच्या प्रदेशांत पाठवतांना त्याचे मन कच खाऊ लागले. भोडा विचार केल्यावर त्याने आपली मुलगी राजसिंहाला यावयाचे ठरविले आणि लझानंतरहि काही दिवस तिला घरीच ठेवून घेण्याचा निश्चय केला. चोरांचा त्रास कमी झाल्यावर तिला सासरी पाठविण्याचा त्यानें बेत केला. झाले. रलावलीचे ला ठरले. मोठ्या थाटामाटाने या सोहळा पार पडला. स्या- नंतर थोडे सैन्य घेऊन जेव्हा राजसिंह परी जाण्यास निघाला तेव्हा रजावलीहि निषण्यास तयार झाली. ते पाहून सेनापति म्हणाला- "बाळे, तू आतांच कशाला जातेस ! जेव्हां तुला नवऱ्याकडे जावेसे वाटेल तेव्हां तुझा पति येऊन घेऊन जाईल तुला. सध्या त्या भागांत अराजकता माजली आहे. थोपांच दिवसांत तेथील वातावरण शांत होईल मग पाठयीन तुला." 'बाचा! एकदा लमाच्या अक्षता डोक्यावर पडल्या म्हणजे मुलीने आपल्या पत्तीबरोबर जाणे तिचा धर्म नाही का? मला जेव्हा आपणास भेटावेसे वाटेल तेव्हां मी येऊन भेटून जाईन आणि पतीबरोबर असल्यावर भीति कसली?" असे सांगून ती पतीबरोबर निघून गेली. रत्नावली सासरी आल्यापासून तिला एक दिवस सुद्धा शान्तपणाने झोप लागली नाही. दररोज तिच्या कानावर चोय दरोग्याच्या गोष्टी येत असत. खून, मारामारीच्या बातम्या येत असत. त्यामुळे ती अगदी घाबरून जात असे. ती राहात असलेला किला खूप मोठा होता. पण दिवसा तेथे पुष्कळ नोकरचाकर वावरत असल्यामुळे भीती वाटत नसे. पण रात्री तेथे चिटपांखरूहि नसे. त्यांतून राजसिंहसुद्धां चोरांना पकडण्यासाठी म्हणून राजींच बाहेर पडत असे. विचारी रलावली जीव मुठीत धरून रात्र घालवीत असे. जरा कुठेख बाजलें की ती कावरी बावरी होई. तिच्या सोबतीला तिच्या मोहरची एक जुनी दासी मात्र होती. चोरांच्या टोळीचा एक नायक होता. त्याच्या विषयी अशा काही आश्चर्यकारक घटना ऐकू येत असत की त्यावर विश्वासच होत नसे आणि अशा त्या नायकाला पकडून आणच्याच्या कामासाठीच राजसिंह रोज रात्री बाहेर पडत असे, तो जायला निघाला की स्नावली त्याच्या रक्षणासाठी देवाची प्रार्थना करीत बसत असे. राजसिंह जी सेना आपल्या सासऱ्या- कडून घेऊन आला होता ती किच्यांतच पाहारा देत असे. परंतु त्यामुळे गांवांतील लोकांचा त्रास मात्र कमी झाला नव्हता आणि गंमत अशी की एवढा मोठा किल्ला, पण त्याच्याकडे कोणाची ही नजर वळली नव्हती. दिवसामागून दिवस जात होते. एक वर्ष लोटलें, रजावलीला मुलगा झाला. त्यामुळे सर्व आनंदांत होते.एक दिवस दाई घावया यावन्या रत्नावली- कडे आली व म्हणाली-“अहो! चोर चोर म्हणून इतक्या दिवसापासून आपण जे ऐकत होतो त्यांना मी आज प्रत्यक्ष पाहिले. ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या किल्ल्या- तीलच नोकर माणसे आहेत आणि त्यांचा नायकहि किल्ल्याचा मालकच आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता आपल्याला थोडा वेळ सुद्धा येथे राहाणे सुखाचे होणार नाही." दाई बोलणे ऐकून ती थोडी घाबरली. पण थोडा विचार केल्यावर तिला वाटलें 'असेल दाईचे म्हणणे खरें' आणि म्हणूनच बाहेर एवढ्या चोच्या झाल्या तरी किडयांत काहीहि झाले नाही. म्हणूनच चोरांना पकडण्यासाठी गेले असतां राजसिंह सुस्वरूप परत येत असे आणि म्हणूनच त्याला की चोरांचा नायक मिळाला नाही आणि म्हणूनच राजसिंहाने बाहेरून आण- लेल्या सेनेला किल्लयांतच डांबवून ठेवले आहे. म्हणजे राजसिंह आपत्त्या वडिलांशी कपटी नाटक खेळत आहे. त्यासाठीच तो आपल्याला येथे घेऊन आला आहे. ठीक आहे. पण प्रत्यक्ष आपण पाहिल्या-शिवाय काही करावयाचे नाही, असे तिने ठरविले. राजसिंहाचे तिच्यावर अतिशय प्रेम होते. मुलगा तर त्याला जीव की प्राण होता आणि असा राजसिंह चोर, हरपारा, ठक असेल ही कल्पनाच तिला करवेना. पण खरी गोष्ट कळावी म्हणून ती राजसिंहाच्या प्रत्येक हालचालीवर फार लक्ष ठेवू लागली. एक दिवस राजसिंह नित्याप्रमाणे रात्री बाहेर निघाला असतां रत्नावलीने त्याला अडविलें. तो तेव्हां थांबला. परंतु मध्यरात्री तो हळून उठला व चोर पावलांनी बाहेर निघून गेला. रलावलीने नुसते डोळे मिटून घेतले होते. तो बाहेर पडताच ही सुद्धा एक काळी ओढणी घेऊन त्याच्या मागोमाग निघाली. तो फिलयाच्या बाहेर पडतांच ही पण किल्याबाहेर गेली. नंतर तिने दुरून पाहिले. तिचा पति एका चिंचेच्या झाडापर्यंत गेला व तेथून एकदम दिसे- नासा झाला. ती त्या झाडापर्यंत गेली. तेथे तिला एक मोठी विहीर दिसली. त्यांत अंधार होता. तरी तिचा पति तेथेच गेला होता. म्हणून | रत्नावली सुद्धा आंत उतरली. तेथे विहिरीच्या भिंतीजवळ काही झाडे पावलेली होती. त्याच्या पाठीमागून कोणी बोलल्यासारखा आवाज येत होता. ती हळू हळू त्या झाडांच्या जवळ गेली. तेथे तिला एक लहान दार दिसले. त्याच्या पलीकडे एक दुमजली इमारत होती. तेथें राजसिंह होता आणि त्याच्या आसपास किड्यांतील सर्व नोवर होते. राजसिंह त्यांना काही तरी सांगत होता आणि ते नोकर त्याच्या अंगावर ओरडत होते. स्लावली थोडी पुढे सरकली व त्यांचे संभाषण ऐकू लागली. तिच्या कानावर शब्द पडत होते-“मी तुमचा सरदार आहे, माहीत आहेना! जर कोणी माझा हुकुम मानला नाही तर हे पहा माझ्या हातांत काय आहे ते." असे म्हणून राजसिंहाने आपल्या नोकरांना तलबार दाखविली. आपण सैन्य आणल्यापासून आमचा आपल्यावरचा विश्वास पार उडाला आहे. आम्हाला असे वाटू लागले आहे की आपण ल्या सैन्याच्या हातीच आम्हांला देणार आहात. म्हणून आम्ही आतां दुसरा सरदार निवडणार आहोत." हे सांगणारा किल्ल्याचा धोबी होता.राजसिंहाने आपली तल्यार उपसली आणि धोव्याच्या अंगावर धावून गेला. त्या बरोबर चार पांच भाल्यांची टोकें त्याच्या छातीवर रोखली गेली. हे पाहातांच रत्ना- वलीने एक किंकाळी फोडली व ती बेशुद्ध होऊन खाली पडली. रत्नावलीने जेव्हां डोळे उघडले तेव्हां ती आपत्या घरी पलंगावर निजलेली होती. राज- सिंह तिच्या जवळच बसला होता. आपला पति सुखरूप असल्याचे पाहून तिला आनंद झाला. . रत्नावली सावध झाल्यावर राजसिंह तिला म्हणाला-"तुझी प्रकृति फार विघड-लेली आहे. म्हणून तूं काही दिवस आपल्या माहेरी जा. तुम्हां दोघांना मी उद्यांच पाठवून देतो. दुसन्या दिवशी रलावली आपल्या माहेरच्या सर्व लव्याजम्यानिशी माहेरी गेली. वाटेत तिला प्रश्न पडला की आपल्या बडिलांना काय सांगावें। आपल्या पती विषयी सर्व सांगून टाकावे की नाही ? एवढी गोष्ट सांगून येताळाने राजास विचारले-“राजा जो विचार रनावलीच्या मनांत आला, ती शंका मलाहि वाटते. ती वडिलांची आज्ञाधारी मुलगी आहे. तेव्हा प्रजेचा शत्रु असलेल्या आपल्या पतीविषयी खरीखुरी माहिती पित्याला देईल की पतिव्रता म्हणून त्याच्या विषयी आपल्या वडिलांना कांही कळू देणार नाही! का ज्या उद्देशाने तिच्या वडिलांनी तिचे लग्न राजसिंहाबरोबर लावलें होतें तो उद्देशच उडवून लावील ?
जर तूं माहीत असून ठीक उत्तर दिले नाहीस तर तुझे डोके फुटेल. तुला माहीत आहे ना! " असे म्हणतात की लमाच्या मुलींना पितृआज्ञाच शिरसावंद्य असते. परंतु विवाहा नंतर पति देवतातुल्य असतो आणि चोरांना पकडण्याचे काम सेनापतीचे आहे. तिचे नव्हें, म्हणून ती जबाबदारी तिची नाही, ही गोष्ट राजसिंहाला पकी माहीत होती. म्हणूनच आपला भेद बायकोला समजला असतां सुद्धा तिला त्याने माहेरी पाठवून दिले. त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणून रत्नावलीला आपल्या पतीचा भेद पिल्याला कळविण्याची जरूरी नाही." राजाने आपले मत सांगितलें. अशा तम्हेनें राजाचे मौन भंग होतांच वेताळ शवासह अदृश्य झाला व पूर्ववत् वडाच्या झाडावर लटकू लागला. (कल्पित)