विकमार्क शिरल्याप्रमाणे वडाच्या झाडा- जबळ गेला. शव उतरवून खांबावर घेतले व सरळ स्मशानाच्या वाटेने चाल लागला. थोडी वाट चालल्यावर शवांतील वेताळ बोलं. लागला. म्हणाला-"राजा ! खरोखरच तुझें धैर्य अचाट आहे. तुला पाहून मला मित्रविन्दु नांवाच्या कोळ्याची आठवण येते. तुझ्या करमणुकी साठी मी तुला त्याची गोष्ट सांगतो, ऐक." त्याने गोष्ट सांगण्यास सुरवात केली. फार वर्षांपूर्वी पूर्व किनाऱ्यावरील समुद्र तटी मित्र बिंदु नावाचा एक कोळी रहात असे. रोज तो आपल्या होडीत बसून समुद्रात जात असे आणि मासे घरून आणीत असे. त्यावर बायको, पांच मुलें व तो स्वतः एवम्यांचा उदरनिर्वाह चालत असे.
समुद्रांत एका विशेष जागी मासे मिळत असत आणि ती जागा त्याला माहीत असल्याने तो नेमका तेथेच मासे धरायला बसे. मग मोठे वादळ आलेले अन् दे किंवा जोराचा पाऊस पडत असू दे, ज्या दिवशीं तो जात नसे त्या दिवशी सर्वांना उपास घटत असे. अशा तन्ड्रेनें काबाडकष्ट करून तो आपले दिवस कंठीत होता. त्याला कोणाची मदसहि मिळत नसे. स्थाची बायको जी मदत करील तेवढीच. ती त्याचे जाळे विणून देत असे, फास नीट करून देत असे.
घरांतीक सर्वे काम काज करीत असे. नवरा समुद्रावर गेला म्हणजे आपले काम काज संपवून ती त्याची वाट पाहात बसत असे. तेव्हा तिच्या मनांत येई की माशा नवरा कोणत्या संकटांत सांपडला असेल! किती श्रम करीत असेल, या विचारांनी तिच्या मनाला हुरहुर लागून रहात असे. मित्रविन्दु देखील घरांतून निघाल्या पासून आपल्या बायकोचाच विचार करीत असे. तिला करावे लागणारे कष्ट पाहून त्याला वाईट वाटे. ती दोघे नवराबायको सुखा समाधानाने रहात होती. एषादां त्याच्या शेजारचा एक गरीब माणूस मरण पावलात्यामुळे त्याची बायको व मुले निराधार शाली, मित्रबिंदूने आपल्या शेजारी एक झोपडी बांधून देऊन त्यांना तेथे रहावयास सांगितलें, ती बाई त्या झोपडीत राहून काही तरी काम बंदा करून आपले व आपल्या दोन मुलांचे पोट भरीत असे. एक दिवस मित्रभिंदु समुद्रावर जाण्यास निघाला आणि एकाएकी मोठे वादळ सुरू आले. मित्रबिंदूच्या बायकोनें मुलांना पेज पाजवून निजविले आणि ती स्वतः नवन्याची वाट पहात बसली. तिच्या मनांत बिचार आला, आपला नवरा आपल्या साठी अशा संकटांत सुद्धा त्रास सोशीत आहे. मुले मोठी झाली म्हणजे करतील बापाला मदत. मग त्याचा भार थोडा कमी होईल. पण तो पर्यंत तरी कष्ट करावयास पाहिजेत. असल्या विचारांनी तिचे मन अगदीं बिहल झाले. अर्थी रात्र झाली. तरी मित्रबिंदु आला नाही. त्याच्या बायकोचा जीव खालीवर होऊ लागला. तिने दिवटी पेटविली आणि समुद्र काठी जाऊ लागली. बाटेंत तिला त्या अनाथ बाईची झोपडी दिसली. परंतु झोपडीचे दार अर्धवट उघडे असून वाऱ्यामुळे थडथडत होते. तिला आश्चर्य वाटले की दार उघडे कां! म्हणून ती आंत शिरली. तिला समोरच त्या अनाथ बाईचे मृत शरीर दिसले. वरून तिच्या तोंडावर पाणी टिपकत होते. असें वाटे की तिच्या डोळ्यांतून आसवें गळत आहेत. जवळच कोरड्या जागेत तिची दोन्ही मुले निजली होती. तिच्या मनांत आले, बिचारी मुलें कोण आहे आता या मुलांना. कशी कशी संकटें झेलावी लागतील देव जाणे. अगोदरच बाप सोडून गेला आणि आतां आईदेखील तिकडेच गेली. तिला फार वाईट वाटलं.
त्या मुलांचा विचार मनात येतांच तिला आपल्या मुलांची आठवण झाली. त्यांना केव्हां पाहीन असे होऊन गेलें तिला. तिने लगबगीने त्या दोघां मुलांनाहि उचलले ब आपल्या घरी घेऊन आली. तिच्या पांच मुलांत त्या दोघांना निजविले. नंतर पुन्हां तिला नवऱ्याची आठवण झाली. पण ती पुन्हा समुद्राच्या बाजूला गेली नाही. घरांत बसून ती त्याची वाट पाहूं लागली. ती मनांत म्हणाली-" मी या मुलांना आणले आहे खरे, पण जर का त्यासाठी नवग्याने मारले तर त्याचा काय दोष ! अगोदरच आपला प्रपंच चालवितांना नाकी नऊ येत आहेत. त्यांतून हे दोन जीव आणले मी म्हणजे कष्टांत भर. पण अगो- दर सुखरूप घरी येऊ दे. बाहेर वादळ अगदी मी म्हणत आहे. मुसळधार पाऊस पडतो आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज येथपर्यत ऐकू येत आहे. काय होते आहे कोण जाणे." बसल्या बसल्या ती आडवी झाली. तशांतच पाहाट झाली, तिचा थोडा डोळा लागला तेवव्यांत दरवाजा खडखडला, दार उघडते तो नवरा समोर उभा. त्याला पाहून तिला बरे वाटले. त्याचे सर्व अंग व कपडे ओले चिंच झाले होते. ती म्हणाली-"मला सारखी काळजी लागून राहिली होती. देवाने कृपा केली. 'काय वादळ! काय पाऊस!! ह्या पावसांत तुमची काय अवस्था झाली असेल म्हणून माझे सर्व चित्त घरांकडे लागले होते. मला आज एक सुद्धा मासा मिळाला नाही. वाऱ्यामुळे जाळ्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. होडी देखील खिळखिळी शाली आहे. तशीच तिला पाण्यातून रेटत आणली नसती तर आज खरोखर धडगत नव्हती. पण सर्व काही देवाची कृपा." कोळी म्हणाला. ही झाली समुद्रावरची हकीगत. इकडे ती अनाथ बाई, विचारी रात्री मरून गेली. काय होईल त्या मुलांचे कोण जाणे." बायको म्हणाली. मग एवढा विचार कसला. जा घेऊन ये त्यांना आपल्या घरी.या पांचांतती आणली दोघे, आपली मुलें खातील त्यांतीलच ही दोघे खातील, जो देव आपल्या मुलांना देत आहे तो या लेकरांना नाही का देणार? काय ती आपल्याला थोडी आग मेहेनत करावी लागेल. तेवढे केलेच पाहिजे." कोळी म्हणालय.
बायको जात नाही असे पाइन. 'जात का नाहीस? जाना! तेवळ्यांत जागी झाली तर घाबरतील दोघे. त्यांचे ओझें कशाला असे वाटते आहे तुला ! जा." "तसें नाही. बघा ना आंत येऊन." ती म्हणाली. आपल्या बायकोनें त्या मुलांना आणले आहे, हे पाहून त्याला तिचे कौतुक वाटले. इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला. पुढे तो राजाला म्हणाला " राजा, मित्रबिंदु इतका मूर्ख होता की काय? आपलाच प्रपंच रेटता रेटता त्याला पुरेसे झाले होते. मग हे कशाला त्याने व्यायांच्या घोड्या- प्रमाणे गळ्यांत बांधून घेतलें ! देवावर भार समजून जर त्याने आपली जबाबदारी पाड- बिली असती तर त्याने आपली स्वतःची जबाबदारी सुद्धा का नाही देवावर टाकिली ? काय असेल कारण ! अष, उत्तर माहीत असून दिले नाहीस तर त्याचे प्रायश्चित्त काय मिळेल माहीत आहे ना?" विक्रमार्क म्हणाला-" मित्रपिंदु मूर्ख नव्हता. तो आपला प्रपंच आपल्या कष्टा- नेच चालवीत होजा. कष्टाची किंमत त्याला माहीत होती. परंतु तेवडे करून सुद्धा ओढाताण होत असल्याने त्याने देवावर भार टाकला होता. पण तो स्वस्थ बसला नव्हता. देवावर अगर दैवावर त्या मुलांचा भार टाकावयाचा असता तर त्याने ती जवाबदारी पेतलीच नसती. त्याला आप- ख्या मेहनतीचा भरंवसा होता. म्हणूनच त्याने त्या मुलांना आपल्या परी आणून ठेवून घेतले." अशा त-हेनें राजाचें मौन भंग होतांच वेताळ शवासह अदृश्य झाला व पुन्हां वडाच्या झाडावर जाऊन लटकू लागला.