जन्म झाला म्हणजे 
काळ तोही ठरला आहे,
जाण्याची हुरहूर कशाला 
अजुनी तो दूर आहे....

मी कैकदा जाऊन आलो 
मृत्यूलाही भेटलो आहे,
वणवा पेटावा तसा
तोही पेटलेला आहे...

दिलाही असेल शब्द एखादा 
सहज आपलं चालतांना,
नको आठवू पुन्हा जरा 
मी आता मरणात आहे...

घाबरलो नाही गोष्टी
ऐकून मरणाच्या,त्याला
पाहून अंगणात माझ्या,
आज मी थरथरत आहे...

तू माडी वरून बघ जरा
दारातून जाणार आहे,
परत येणार नाही कधी
हा प्रवास शेवटचा आहे.....

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel