घरटे जाते उडून
वारुळ जाते वाहून
मुंगी पाखरे करतात
म्हणून आत्महत्या??
जपून ठेव मनी
वाघ कधीच लाचार
होवून जगत नाही
जगण्यासाठी अनुदान
कधीच मागत नाही
जपून ठेव मनी
घरकुलासाठी मुंगी
मागत नाही गृहकर्ज
स्वतःच उभारते वारूळ
स्वाभिमानाचे मिरवते बिरुद
जपून ठेव मनी
सुगरणीला हात बघितलेत ?
चोच घेऊन जगते वेडी
स्वतःच विणते घरटे छान
मागत नाही कधी फार्म
जपून ठेव मनी
कुणीही नाही सवे
कावळोबाही सुटले
तरी तक्रार नाही कधी
निवेदन घेऊन चिमणी
फिरत नाही योजनांसाठी
जपून ठेव मनी
खाललेल्या मिठालाही
जागतो कुत्रा संरक्षणाला
धावून येतो सदा
लाईफ इन्शुरन्स ची करत नाही पर्वा
जपून ठेव मनी
बैल देतो आधार
कमावून धन हातात
सांगा बरं कुणाकडून
घेतो का निवृत्तीवेतन
जपून ठेव मनी
सूक्ष्म सूक्ष्म म्हणत
डंख भारी स्वारीचा
हेवा वाटतो त्याचा
होवून लाचार स्वाभिमान
झुकवतो मान
जपून ठेव मनी
पैसा बंगला गाडी
झोपडी सगळे हावी
एकी हेच बळ
भेद मिटे गरीब श्रीमंतहा
समान सारे आम्ही
जपून ठेव मनी
निर्धाराने जिंकू आम्ही
आयुष्याची ही लढाई
हिमतीने लढू
पाळूनि नियम परि
जपून ठेव हे मनी सारे
©मधुरा धायगुडे