सुखद सांजवेळ चिरंतन चिंतनाची
विसावली किरणे क्षिताजावरी भास्कराची
दिसे धुसर आभा त्या सोनेरी किरणांची
मनाच्या गाभ्यातील शब्दांना वाट स्मृतिंची||
एकटेच शब्द माझे सोबतीला सूर नाही
झुळुक वा-याची सोबती वाजे समेवरी
ताल -सूर शब्दांचा हा सोहळा या सांजवेळी
कधी संवेदना जागवी कधी रुक्षता कवितेची ||
जमली गुंफण सहजची मनातल्या शब्दांची
संवेदना कुठुनशी आली साक्ष या आभेची
पंगत जमली शब्दांची शांत आर्जव अंतरीची ||
© मधुरा धायगुडे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.