भारत ई.स.पू. ३२६

जेव्हा मी घोडा पाहिला तेव्हा मला माहित होते की आपल्यावर एक मोठे संकट आले आहे. तो घोडा टेकडीच्या माथ्यावर पुतळ्यासारखा उभा होता. त्याने आमच्या गावाकडे खाली पाहिले.

माझे पिताश्री आमच्या राज्याचे राजा होते. त्यांनी आमच्या महालाच्या अंगणात पाऊल ठेवले. मग त्यांनी घोड्याकडे रोखून पाहिले. पिताश्रीनी घोषणा केली

"तो आला आहे आणि त्यानंतर सम्राट पोरसची सेना देखील येईल. "

आमच्या राज्यात प्रत्येकाला घोड्याच्या आगमनाचा अर्थ चांगलाच माहित होता. सम्राट कधीकधी आपले घोडे इतर राज्यात पाठवत असत. घोड्याचे आगमन एक वाईट बातमी होती. याचा अर्थ असा होता की सम्राटाने आमच्या राज्यावर हल्ला करण्याची योजना आखली आहे.

सम्राट संपूर्ण क्षेत्र काबीज करेपर्यंत तो घोडा मुक्तपणे संचार करत असे. जेव्हा युद्ध संपत असे, तेव्हा घोडा पुन्हा त्यांच्या देशात परतत असे. त्यानंतर देवांना घोड्याचा बळी देण्यात येत असे.

माझे पिता राजा सुंदर यांच्याकडे पर्याय होता. एकतर संपूर्ण ताकदीने पोरसच्या सैन्याशी लढा द्यायचा किंवा त्याला शरण जायचे.

आमचे सैनिक पिताश्रींच्या भोवती एकत्र जमले. माझी आई, जी राणी होती, राजवाड्यातून बाहेर आली आणि शांतपणे माझ्या वडिलांच्या शेजारी उभी राहिली.

घोडा राज्याच्या आमच्या दिशेने चाल करून येत होता आणि सैनिक त्याच्या मागे चालत होते. एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे ते हळूहळू उंचावरून खाली उतरत होते. त्यांची शस्त्रे पाण्यात सूर्यप्रकाश चमकतो तशी चमकत होती. काही सैनिक रथात स्वार होते. काही सैनिक पायी चालत होते

मी आमचे दुर्बल सैन्य पाहिले. आमचे सैनिक बारीक आणि कमकुवत होते. आमच्याकडे एकही रथ नव्हता. माझे वडील अभिमानाने उभे राहिले होते, परंतु त्यांचे शाही कपडे फाटलेले आणि जुने होते.

घोडा जवळ आला. तो एका खडकावर अभिमानाने उभा राहिला. त्याची काळी कातडी उन्हात चमकत होती आणि त्याची चमकदार आयाळ वाऱ्यावर उडत होती.

माझी नजर त्या घोड्यावरून हटता हटत नव्हती. त्याला पाहून मला खूप पूर्वी पाहिलेल्या घोड्याची आठवण झाली. त्या घोड्याचे नाव होते अतुल. अतुल लहान शिंगरू असल्यापासून मी त्याला पाळले होते. मी त्याला वाढवले. आम्ही प्रत्येक दिवस एकत्र घालवला आणि तो माझा चांगला मित्र होता.

पण हिवाळ्यातील एका गारठलेल्या रात्री उत्तरेकडून चोरांचा समूह आला. मी अतुलला त्याच्या तबेल्यात चारा खायला घालत होतो. चोर आमच्या घोड्यांना एका पाठोपाठ बांधून घेऊन जात होते म्हणून मी शांतपणे लपून बसलो. मी लहान होतो. खूप घाबरलो होतो. मी माझा घोडा चोरांपासून वाचवू शकलो नाही.

माझ्या पिताश्रीनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि मान हलवली जणू तेही अतुलचीच आठवण काढत होते. हे शत्रू सैनिक आपले राज्य लुटतील. ते म्हणाले, "आपले सैनिक निष्ठावान आहेत, पण ते लढण्यासाठी खूपच कमकुवत आहेत."

मी माझ्या पापण्या मिटल्या. आम्ही आमच्या महालातच शरण जाऊ, असाही तो महाल आता कोसळण्याच्या मार्गावर होता. आमची शेतं कोरडी आणि नापीक आहेत त्यामुळे तीही त्यांच्या हवाली करून टाकू आणि मग माझे वडील आता राजा नाहीत आणि मी यापुढे राजकुमार नाही.

“नाही पिताश्री!” मी अचानक डोळे उघडले आणि ओरडलो आणि त्यांच्या खांद्यावर मी हात ठेवला.

पिताश्रीनी त्वेषाने माझा हात झटकला आणि म्हणाले,

“राजकुमार ऋषीकेश, तुमची तलवार सज्ज ठेवा. आम्ही लढलो तर तुम्ही आमच्यात सामील व्हा."

मला आनंद झाला. मला शरणागती पत्करायची नव्हती पण मला लढायचे सुद्धा नव्हते. जर आपण शरण गेलो,  तर सम्राट पोरस पौरवांच्या राज्यात आपले स्वागत करेल. ते दयाळू राजा होते. ते आमचे उत्तम आदरातिथ्य करतील.

"कदाचित आपण शरणागती पत्करली पाहिजे" मी थरथर कापत पुटपुटलो. "मी आता लढण्यासाठी खूप लहान आहे."

माझे वडील माझ्या पुढ्यात जमिनीवर थुंकले. “तू भ्याड आहेस, तू राजकुमार होण्यास पात्र नाहीस."

घोडा आणि सैन्य गावात शिरताच आमचे सैनिक पुढे गेले. मी त्यांच्या मागे लपलो. माझे शरीर डोक्यापासून पायापर्यंत थरथर कापू लागले. मला भीती वाटत होती आणि मला स्वत:ची लाज सुद्धा वाटली. दोन्ही बाजूचे सैन्य आमनेसामने आले. माझे वडील त्यांच्या सैनिकांच्या समोर पुढे उभे होते.

घोड्याने आपलं डोकं खाली केलं जणू माझ्या वडिलांना नतमस्तक झाला आहे. मग घोड्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे दया, अभिमान आणि धैर्याने भरलेले होते. मला पण असेच व्हायचे होते. पण मला अभिमान वाटला नाही आणि माझी हिम्मतही झाली नाही.

तेवढ्यात एक उंच मुलगा पुढे आला.

"मी राजपुत्र मलयकेतू आहे, राजा पोरसचा मुलगा. तुम्ही तुमची शस्त्रे खाली ठेवा आणि शरण या, किंवा शस्त्र उचला आणि आमच्याशी लढा द्या."

मलयकेतू हसला आणि पुढे म्हणाला,

“पण लक्षात ठेवा तुम्ही जिंकू शकत नाही.”

माझे पिताश्री शांत उभे होते. मलयकेतुने त्यांच्याकडे पहिले आणि विचारले

"बरं, तुम्हाला काय आवडेल?"

आम्ही आमचा श्वास रोखून आमच्या राजाच्या उत्तराची वाट पाहत होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel