असन्तस्स पिया होन्ति, सन्ते न कुरुते पियं |
असतं धम्मं रोचेति, तं पराभवतो मुखं ||४||


त्याला खल आवडतात| सज्जनाविषयीं प्रेम नसतें| खलांचा धर्म रुचतो| हे पराभवाचें कारण होय ||४||

इति हेतं विजानाम, दुतियो सो पराभवो|
तितियं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||५||

हा दुसरा पराभव आम्हांस समजला| भगवन् तिसरें पराभवाचें कारण कोणतें हें सांग ||५||

निद्दासीली सभासीली अनुट्ठाता च यो नरो|
अलसो कोधपञ्ञाणो, तं पराभवतो मुखं ||६||

निद्राशील, सभाप्रिय, प्रत्यय न करणारा, आळशी आणि क्रोधाविष्ट जो मनुष्य होतो| तें (त्याच्या) पराभवाचे कारण होय ||६||

इति होतं विजानांम, तितियो सो पराभवो |
चतुत्थं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||७||

हा तिसरा पराभव आम्हांस समजला | भगवन् चवथें पराभवाचें कारण कोणतें तें सांग ||७||

यो मातरं वा पितरं वा जिण्णकं गतयोब्बनं|
पहु सन्तो न भरति, तं पराभवतो मुखं ||८||

जो समर्थ असून वयातील वृद्ध आईबापांचा सांभाळ करीत नाही | ते त्याच्या पराभवाचे कारण होय ||८||

इति हेतं विजानाम, चतुत्थो सो पराभवो |
पञ्चमं भगवा ब्रूही, किं पराभवतो मुखं ||९||


हा चवथा पराभव आम्हांस समजला | भगवन् पाचवें पराभवाचे कारण कोणतें तें सांग ||९||
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel