वसलसुत्तं
एवं मे सुतं | एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे || अथ खो भगवा पुब्बण्डसमयं निवासेत्वा पत्तचीवरं आदाय सावत्थियं पिण्डाय पाविसि || तेन खो पन समयेन अग्गिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स निवेसने आग्गि पज्जलितो होति आहुति पग्गहिता || अथ खो भगवा सावत्थियं सपदानं पिण्डाय चरमानो येन अग्गिकभारद्वाजस्य ब्राह्मणस्स निवेसनं तेनुपसंकमि || अद्दसा खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं दूरतोव आगच्छंन्त | दिस्वान भगवन्तं एतदवोच | तत्रेव मुण्डक तत्रेव समणक तत्रेव वसलक तिट्ठाही ति | एवं वुत्ते भगवा अग्गिकभारद्वाजं ब्राह्मणं एतदवोच | जानासि पन त्वं ब्राह्मण वसलं वा वसलकरणे वा धम्मे ति || न ख्वाहं भो गोतम जानामि वसलं वा वसलकरणे वा धम्मे || साधु मे भवं गोतमो तथा धम्मं देसेतु यथाहं जानेय्यं वसलं वा वसलकरणे वा धम्मे ति || तेन हि ब्राह्मण सुणाहि साधुंक मनसि करोहि भासिस्सामी ति || एवं भो ति खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवतो पच्चस्सोसि || भगवा एतदवोच-
असें मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता || तेव्हां भगवान सकाळच्या प्रहारीं कपडे करून व पात्र आणि चीवर घेऊन श्रावस्तींत पिण्डपातासाठीं गेला || त्या समयीं आग्निक भारद्वाजाच्या घरीं आग्नि प्रज्वलित केला होता, व आहुति देण्यांत येत होती || तेव्हा भगवान् श्रीवस्तीमध्यें घरोघरी भिक्षेसाठीं फिरत असतां आग्निक भारद्वाजाच्या घरीं आला || आग्निक भारद्वाजानें भगवंन्ताला दुरूनच पाहिलें | पाहून तो भगवन्ताला म्हणाला | हे मुण्डक, हे श्रमणक, हे वृषलक, तेथेंच रहा || असें बोलल्यावर भगवान् आग्निक भारद्वाज ब्राह्मणाला असें बोलला | हे ब्राह्मण, तुला वृषल कोण आणि वृषलाचे गुण कोणते तें माहित आहे काय ?|| भो गोतम, वृषल कोण आणि वृषलाचे गुण कोणते हें मी जाणत नाहीं | आपण मला असा धर्मोपदेश करा कीं, जेणें करून वृषल कोण व वृषलाचे गुण कोणते हें मी जाणूं शकेन || असें जर आहे तर, हे ब्राह्मण, माझें म्हणणे ऐक, आणि नीट लक्ष्यांत घें, मीं आतां बोलतों || ठीक आहे असें आग्निक भारद्वाजानें भगवन्ताला उत्तर दिलें || भगवान् म्हणाला -
कोधनो उपनाही च पापमक्खी च यो नरो |
विपन्नदिट्ठि मायावी तं जञ्ञा वसलो इति ||१||
रागीट, सूड उगविण्याची बुद्धि धरणारा, गुणी जनास दोष लावणारा पापी, मिथ्यादृष्टी आणि मायावी, असा जो मनुष्य, त्याला वृषल समजावें ||१||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.