मी जिकुंनही हरलो
ती हरुनही जिकली
तीची प्रत्येक अदा
माझ्या वेड्या मना भावली....
मला खुप गर्व होता
माझ्या प्रेमावर आता
फक्त हसुन पाहतोय
त्या गर्वाच्या राखेवर....
प्रेम करण कुठे जमल मला
सांगुच नाही शकलो कधी
मनातल तिला पण न
बोलताच ती बरच काही
बोलुन गेली....
"कधी कुणावर प्रेम नको करुस"
हे माञ सांगुन गेली
येईल का ती परत शेवटच्या शब्दाने
मला कोड्यातच टाकुन गेली...
मी जिकुंनही हरलो
ती हरुनही जिकली.....
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel