रामजी -  धनी, आपले फार उपकार आहेत. मी पुन्हां येईन छोटे साहेबांस भेटावयास ! तेव्हां आमच्या देवीचा अंगाराहि आणीन.

विश्राम -   मी पण येईन. मी वाळकं आणीन.

लक्ष्मीधरपंत -  (कारकूनास) या पोरास तीं चार केळीं व तें डाळिंब द्या.

नारायण -  बाबा, तीं दोन्हीं डाळिंब द्या. विश्रामच्या आईला होतील; ती आजारी आहे ना ?

रामजी -  नको, नको !

लक्ष्मीधरपंत -  रामजी, नको म्हणूं नको. घे. (कारकून देतो.)
विश्राम, घे; केळीं खा.

विश्राम -  मी खालीं अंगणांत खाईन.
(राघू येतो.)

लक्ष्मीधरपंत -  ये, राघू ये. आतां हें घर तुझंच आहे. आज कसा स्वच्छ कपडे घालून आला आहेस ! अगदीं स्पृश्य दिसतोस तूं !

नारायण -  बाबा, देवानं तुम्हांस एकाएकीं कसं हो थोर केलं ! धन्य आहांत तुम्हीं ! काय हें भयंकर रुपांतर !

लक्ष्मीधरपंत - बाळ, हा तुझ्या आचरणाचा परिणाम. राघू, घरीं खुशाल आहेत सारीं ?

राघू -  देवाच्या कृपेनं सारीं खूशाल आहेत.

लक्ष्मीधरपंत -  राघू, तूं हल्लीं काय करतोस ? तूं आमच्याकडे रहा, शाळेंत जा.

राघू -  मी सूत काढीत असतो; आतां विणकाम शिकणार आहे.

नारायण -  माझ्या रात्रीच्या शाळेंत तो शिकेल. मीं देशभक्तांची चित्रें दाखवीन, त्यांच्या गोष्टी सांगेन ! राघू गाणींही शिकवीन तुला बरं का ?

राघू -  मी एक गाणं शिकलोही आहे.

नारायण -  कोणतें रें ? म्हण पाहूं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel