खाण्याचे हाल, अति थंडी, गणितप्रेमी सोडले तर इतर इंग्रज समाजाची नैसर्गिक अलिप्तवृत्ति व त्यामुळे एकलकोंडेपणा, भारतातून येणाऱ्या पत्रातून, सासूसुनांची भांडणे व कटकटींच्याच बातम्या, या सर्वांच्या परिणामी रामानुजमची प्रकृति वरचेवर बिघडू लागली. सर्दी, खोकला, ताप या चक्रात तो सापडला. हार्डीने त्याच्या औषधपाण्याची सोय केली पण खाण्याचे हाल निवारत नव्हते. हळूहळू दुखणे बळावत जाऊन क्षयावर गेले. हॉस्पिटलमध्ये काही महिने गेले. तेव्हा इंग्लंडमध्येहि क्षयावर फारसे उपचार उपलब्ध नव्हते. पौष्टिक खाण्याअभावी सुधारणा होत नव्हती. हार्डी वरचेवर भेटत असे. थोडें बरे वाटून रामानुजम बाहेर आला. प्रकृति सुधारतच नव्हती
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.