एस आणि जॉन हे दोघे ऑस्ट्रेलियन तरुण शिक्षण संपवून १९६९ साली लंडनला आले. त्यानी Kings Road वरील एका फर्निचरच्या दुकानात नोकरी धरली होती. Devon मधील एका लहानशा झू मधील एका सिंहाच्या जोडीला चार बछडे झाले. एक नर तीन माद्या. त्यांतील एक नर एक मादी लंडनमधील प्रख्यात Harrods या डिपार्टमेंटल स्टोअर्मध्ये विक्रीला ठेवलेलीं यांच्या नजरेस आलीं. त्यांनी त्यांतील नर बछडा विकत घ्यायचे ठरवले. त्याला आपण कसे संभाळणार याचा अडथळा त्यांना वाटला नाहीं. ते नोकरी करत असलेल्या दुकानाच्याच वर ते दोघे रहात होते दुकानमालकाने त्यांना सिंहछावा पाळण्याची दुकानाच्या बेसमेंटचा वापर करण्याचीहि परवानगी दिली. आवाक्याबाहेरचा खर्च करून त्यानी छावा खुशाल विकत घेतला त्याचे नावख्रिश्चनठेवले. सिंहछावा संभाळायचा तर त्याला बागडण्यासाठी भरपूर मोकळी जागा हवी, तोहि प्रश्न एका धर्मगुरूने सोडवला. त्याच्या चर्चच्या मोकळ्या पण बन्दिस्त आवारात ख्रिश्चनला मोकळे सोडून त्याचे बरोबर हे दोघे खेळत! दुकानात तो सर्वत्र मोकळेपणाने वावरत असे. गिर्हाइकेंही त्याची भीति बाळगतां त्याच्याशी खेळत. त्याला संभाळण्याचा खर्च त्याना डोईजड होत होता. तो लहान होता तोंवर हे सर्व चालले होते. या काही महिन्यांच्या काळाचे अतिशय मनोरंजक वर्णन पुस्तकांत वाचावयास मिळते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel