हॉर्वर्ड लोवक्राफने आईकडून पैसे घेऊन अनेक उद्योग धंदे निर्माण केले आणि त्यांत तो पूर्णपणे अपयशी ठरला. आजोबांच्या मृत्यू नंतर त्यांच्या घराण्याची आमदनी कमी कमी होत गेली. शेवटी नोकर चाकर सुद्धा सोडून गेले. हॉर्वर्ड लोवक्राफ ने संशोधक बनण्याचा प्रयत्न केला. खूप पैसे खर्च करून ऑरगॅनिक चेमिस्री मध्ये संशोधन करण्यासाठी त्याने अनेक उपकरणे मागवली पण शेवटी गणित हा विषय न जमल्याने त्याने तो सुद्धा धंधा सोडून दिला.
हॉर्वर्ड आपल्या कथा पल्प मासिकांत म्हणजे रेल्वे स्टेशन वर वगैरे जी रिसायकल्ड पेपर वर छापलेली मासिके विकतात ना अश्या मासिकांत आपल्या कथा पाठवत होता. त्यातून पैसे विशेष नाही आले तरी त्या मासिकाच्या वाचकात तो थोडा फार प्रसिद्ध होता. हि मासिके अतिशय कमी किमतीत विकली जातात त्यामुळे रॉयल्टी वगैरे त्यातून जास्त येत नव्हतीच.
पण हॉर्वर्ड लोवक्राफ च्या फॅमिलीची आर्थिक स्थिती इतकी खालावत गेली कि शेवटी हेच एक मिळकतीचे साधन त्याच्या हातांत होते. त्याशिवाय आजोबांकडून मिळालेली थोडी फार संपत्ती विकून आई आणि मुलगा आपला संसार चालवत होते. ह्यांत हॉर्वर्ड लोवक्राफ च्या आईचे म्हणजे सुझी चे मानसिक संतुलन बिघडले ती वेडी झाली आणि शेवटी मरण पावली.
मातेच्या मरणाने हॉर्वर्ड लोवक्राफ चा फायदाच झाला. त्याचा खर्च कमी झालाच पण आता तो हळू हळू घराबाहेर सुद्धा पडू लागला. त्याचे मित्र निर्माण झाले आणि एका युवतीच्या प्रेमात तो पडला आणि लग्न सुद्धा झाला.
आता त्याच्या कथांचे सार्वजनिक वाचन होत होते. अनेक मित्र त्याला आपल्या कथा वाचायला बोलवत असत. पैसे नाही आले तरी किमान पोटापाण्याचा खर्च भागत होता.
हॉर्वर्ड लोवक्राफ चे लेखन त्याच्या वेळेच्या तुलनेत अतिशय वेगळे होते. भूत पिशाचच इत्यादींपेक्षा त्याच्या भयकथातील भीती वेगळी होती. त्याचे खलनायक हे वैश्विक स्थरावरचे दानव होते. कुंथुलू हा त्याचा खलनायक विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या कथांत मानव हा पृथीवरचा आधुनिक प्राणी आहे. मानवाच्या आधी अनेक देव आणि दानव ह्या पृथीवर विहार करत होते. कुंथुलू हा असाच एक देव किंवा दानव पृथ्वीच्या गर्भांत चीर निद्रा घेत अनेक लक्षावधी वर्षे झोपत पडला आहे. काळाच्या ओघांत पृथीवर फक्त मानव असला तरी कुंथुलू च्या निद्रेचा परिणाम मानवी मनावर होत आहे. आम्हाला रात्रीला पडणारी स्वप्ने अंधाराचे भय इतकेच नाही तर विचार क्षमता सुद्धा कुंथुलू मुळे आहे. कुंथुलू निव्वल विचाराने संपूर्ण मानवजातीचा संहार करू शकतो आणि असा हा कुंथुलू अंटार्टिकाच्या खाली काळ्याशार दगडांच्या एका गुफेत चीर निद्रा घेत आहे. कुंथुलूच्या रूपाबद्दल सुद्धा तो लिहितो. सिंह, माणूस, ऑकटोपस, ड्रॅगन इत्यादींच्या सर्वांचे अवयव घेऊन जन्मलेला १०० मीटर उंच असा कुंथुलू.
लोवक्राफ्ट ने कथुलू बद्दल प्रचंड लिखाण केले. तो पृथ्वीवर कसा आला, त्याच्या पेक्षा जास्त शक्तिशाली जीव विश्वांत कोण आहेत, कुंथुलू मूले जांगांत का यप्रभाव निर्माण झाला इत्यादी. इतकेच नाही तर त्याने भूतकाळांत ज्या कथा लिहिल्या होत्या त्यातील सुद्धा काही अगम्य गोष्टी कुंथुलू मुळे घडल्या होत्या असे लोवक्राफ्ट ने स्पष्ट केले.
कॉल ऑफ कुंथुलू हि लोवक्राफ्टची सर्वांत लोकप्रिय कथा. ह्या कथेने त्याच्या वाचकांना हादरवून सोडले.
पण इतके असून सुद्धा लोवक्राफ्टचे सर्व लेखन स्वस्त मासिकांतच होत होते आणि मोठे प्रकाशात त्याच्या कडे ढुंकून सुद्धा पाहत नवहते.